Nilgai Rescue

हिंगोलीत वनविभागाची तत्परता; शेततळ्यात अडकलेल्या चार निलगायांना जीवदान

हिंगोली तालुक्यातील माळहिवरा येथे पाण्याच्या शोधात आलेल्या चार निलगाय शेततळ्यात पडल्याची घटना घडली.

हिंगोलीत वनविभागाची तत्परता; शेततळ्यात अडकलेल्या चार निलगायांना जीवदान

Nilgai Rescue

हिंगोली (Nilgai Rescue) : हिंगोली तालुक्यातील माळहिवरा येथे पाण्याच्या शोधात आलेल्या चार निलगाय शेततळ्यात पडल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच वनविभागाने तातडीने बचाव मोहीम राबवून सर्व निलगायांना सुरक्षित बाहेर काढत त्यांना जीवदान दिले.

विभागीय वनाधिकारी डॉ. राजेंद्र नाळे आणि उपवनसंरक्षक माने यांच्या आदेशानुसार वनपरिक्षेत्र अधिकारी मिनाक्षी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. वनमजूर संग्राम भालेराव, राऊत तसेच स्थानिक ग्रामस्थ आणि प्राणीमित्रांच्या मदतीने अथक प्रयत्नांनंतर सर्व निलगायांना शेततळ्यातून सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

प्रथमोपचार केल्यानंतर सर्व निलगायांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. वनविभागाच्या या तत्पर कारवाईमुळे चार मुक्या जीवांना जीवदान मिळाले असून, या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

उन्हाळ्यात पाण्याच्या शोधात वन्यप्राणी शेततळ्यांकडे येत असल्याने अशा घटना टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी शेततळ्यांभोवती संरक्षक जाळी किंवा काटेरी कुंपण उभारावे, असे आवाहन वनविभागाने केले आहे.

संबंधित सामग्री

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली  येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

Oct 06, 2026
हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

Hingoli Lakshmi Life Care Hospital: हिंगोलीतील कपडा गल्ली येथे फटाका गोदामाला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या ६ रुग्णांवर लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटल, हिंगोली येथे डॉक्टर अखिल अग्रवाल

Oct 06, 2026
हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

Hingoli Firecracker Accident: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली परिसरात फटाक्यांच्या साठवणुकीच्या ठिकाणी लागलेली आग अत्यंत दुर्दैवी व गंभीर आहे. या दुर्घटनेत प्राथमिक माहितीनुसार दोन नागरिकांचा मृत्यू..

Oct 06, 2026
हिंगोली मारवाडी गल्लीतील भिषण आगीत फटाक्यांचा स्फोट, दोघांचा मृत्यू

हिंगोली मारवाडी गल्लीतील भिषण आगीत फटाक्यांचा स्फोट, दोघांचा मृत्यू

Hingoli firecracker explosion: शहरातील मारवाडी गल्ली भागामध्ये गोपाल बासटवार यांच्या घराला सोमवारी रात्री ७.४० च्या सुमारास लागलेल्या भिषण आगीत फटाक्याचा स्फोट होवुन काही जण जखमी झाल्याची घटना

Oct 06, 2026