मुंबई मध्ये नेस्को ड्रग्स प्रकरणात अभिनेत्री अटकेत; चित्रपटसृष्टीशी संबंध उघड, आर्थिक व्यवहारांचा तपास सुरू

मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरणाने आता आणखी गंभीर वळण घेतले असून या प्रकरणात चित्रपटसृष्टीतील संबंध उघड होत असल्याची माहिती समोर येत आहे.

मुंबई मध्ये नेस्को ड्रग्स प्रकरणात अभिनेत्री अटकेत; चित्रपटसृष्टीशी संबंध उघड, आर्थिक व्यवहारांचा तपास सुरू

NESCO Scandal

मुंबई (NESCO Scandal): मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरणाने आता आणखी गंभीर वळण घेतले असून या प्रकरणात चित्रपटसृष्टीतील संबंध उघड होत असल्याची माहिती समोर येत आहे. पोलिस तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे धक्कादायक खुलासे होत असून, या प्रकरणात मॉडेल व अभिनेत्री जिया जेकब यांना अटक करण्यात आली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, जिया जेकब यांना २३ एप्रिल रोजी पोलिसांनी अटक केली. त्या चित्रपटसृष्टीत साईड अभिनेत्री म्हणून काम करत होत्या तसेच मॉडेलिंग क्षेत्रातही सक्रिय होत्या. तपासादरम्यान त्यांच्या बँक खात्यात लाखो रुपयांचे व्यवहार झाल्याचे उघड झाले असून, या व्यवहारांचा संबंध ड्रग्स रॅकेटशी असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, नेस्को ड्रग्स प्रकरणातील इतर आरोपींकडून जिया जेकब यांच्या खात्यात मोठ्या प्रमाणात रक्कम वर्ग करण्यात आली असावी. त्यामुळे या खात्यांचा वापर ड्रग्स व्यवहारांसाठी ‘मनी ट्रान्झिट’ म्हणून करण्यात आला का, याचा तपास सुरू आहे. तसेच जिया जेकब या अमली पदार्थांच्या पुरवठा साखळीत सहभागी होत्या का, याबाबतही चौकशी सुरू आहे.

सध्या जिया जेकब यांची सखोल चौकशी सुरू असून, या चौकशीतून ड्रग्स रॅकेटमधील इतर मोठी नावे आणि आर्थिक व्यवहारांचे जाळे उघड होण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे.

नेस्को ड्रग्स प्रकरण काय आहे? जाणून घ्या सविस्तर

अलीकडेच मुंबईतील गोरेगाव परिसरातील नेस्को एक्झिबिशन सेंटर येथे मोठ्या प्रमाणावर म्युझिक कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान ड्रग्सच्या ओव्हरडोसने दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आणि ड्रग्स पुरवठा साखळीचा शोध घेण्यास सुरुवात केली.

तपासात पुढे असे समोर आले की, या म्युझिक कॉन्सर्टदरम्यान ड्रग्सची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात झाली होती. या व्यवहारांसाठी काही व्यक्तींच्या बँक खात्यांचा वापर करण्यात आला होता, ज्यामध्ये जिया जेकब यांचे खातेही समोर आले आहे.

आर्थिक व्यवहार आणि चॅट हिस्ट्रीतून धागेदोरे

पोलिस तपासात आरोपी आयुष साहित्य आणि जिया जेकब यांच्यातील चॅट हिस्ट्री पोलिसांच्या हाती लागली आहे. या चॅटमधून ड्रग्स व्यवहारांशी संबंधित संवाद झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

तसेच, आर्थिक व्यवहारांची तपशीलवार माहितीही समोर आली आहे. त्यानुसार:

  • आनंद पटेल – ६४,००० रुपये
  • विनीत गेरलानी – २२,५०० रुपये
  • शुभा अग्रवाल – १,६६,४०० रुपये
  • आयुष साहित्य – १,८४,६०० रुपये

अशा रकमा जिया जेकब यांच्या खात्यात जमा करण्यात आल्याचे उघड झाले आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हे सर्व ऑनलाइन व्यवहार म्युझिक इव्हेंटदरम्यान ड्रग्स खरेदी-विक्रीशी संबंधित असण्याची शक्यता आहे.

फरार मुख्य आरोपीशी संबंध?

दरम्यान, जिया जेकब या मागील दोन वर्षांपासून फरार असलेल्या मुख्य ड्रग्स पुरवठादारासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होत्या, अशी माहितीही तपासात समोर आली आहे. संबंधित मुख्य आरोपी सध्या परदेशात पळून गेल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

तपासाचा वेग वाढला

या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तपासाची गती वाढवली असून, ड्रग्स रॅकेटशी संबंधित इतर संशयितांचा शोध सुरू आहे. आर्थिक व्यवहार, कॉल रेकॉर्ड, चॅट डेटा आणि इव्हेंटशी संबंधित इतर पुरावे तपासून संपूर्ण नेटवर्क उघड करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

नेस्को ड्रग्स प्रकरणामुळे पुन्हा एकदा शहरातील इव्हेंट्समध्ये ड्रग्सच्या वापराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, पोलिसांनी अशा घटनांवर कडक कारवाईचा इशारा दिला आहे.

संबंधित सामग्री

अप्पापाडा BMC गार्डनमध्ये ड्रग्जचा खेळ? २० वर्षीय अमन सोनीचा मृत्यू, चार मित्र ताब्यात

अप्पापाडा BMC गार्डनमध्ये ड्रग्जचा खेळ? २० वर्षीय अमन सोनीचा मृत्यू, चार मित्र ताब्यात

मालाडच्या कुरार व्हिलेजमध्ये २० वर्षीय अमन सोनीचा ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे मृत्यू झाला. अप्पापाडा BMC गार्डनमध्ये ड्रग्जचे इंजेक्शन दिल्याचा कुटुंबीयांचा आरोप असून चार मित्र ताब्यात घेण्यात आले आह

Oct 05, 2026
गणेशमूर्ती कोसळली, मोठी दुर्घटना टळली!

गणेशमूर्ती कोसळली, मोठी दुर्घटना टळली!

Ganeshotsav: मिरवणुकीत नेली जात असलेल्या गणेशमूर्तीचा अचानक तोल जाऊन ती भाविकांच्या अंगावर कोसळली. या घटनेमुळे मिरवणुकीत काही काळ एकच गोंधळ उडाला. मात्र, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.

Sep 13, 2026
दारिद्र्याचे चटके! पोटाची भ्रांत अन् चिमुकलीचा त्याग; दीड वर्षांच्या चिमुकलीला सोडले डोंगरावर..

दारिद्र्याचे चटके! पोटाची भ्रांत अन् चिमुकलीचा त्याग; दीड वर्षांच्या चिमुकलीला सोडले डोंगरावर..

Pune Bhandara Hill girl: देहू परिसरातील भंडारा डोंगरावर दीड वर्षांची चिमुकली एकटी आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. आई-वडिलांचा शोध घेतल्यानंतर अत्यंत हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे

Sep 11, 2026
दिल्ली हादरली! सत्या निकेतनमध्ये इमारत कोसळून 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू

दिल्ली हादरली! सत्या निकेतनमध्ये इमारत कोसळून 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू

Delhi Building Disaster: दिल्लीतील सत्या निकेतन परिसरात पाच मजली इमारत कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला असून काही जण जखमी झाले आहेत. तब्बल १६ तास बचावकार्य सुरू..

Sep 07, 2026
एकाच घरात सापडले 24 मृतदेह; चिमुकलीला कवटाळलेल्या अवस्थेत आढळला आईचा मृतदेह

एकाच घरात सापडले 24 मृतदेह; चिमुकलीला कवटाळलेल्या अवस्थेत आढळला आईचा मृतदेह

Nepal Flood Rescue: नेपाळमधील पुरामुळे झालेल्या विध्वंसाच्या पार्श्वभूमीवर नुवाकोटमध्ये एक हृदयद्रावक बचावकार्य सुरू झाले. बेत्रावती गावातील एका पाण्याने भरलेल्या तीन मजली घरातून चोवीस मृतदेह...

Sep 02, 2026