एनसीसी CATC शिबिर

एनसीसीच्या CATC शिबिरासाठी माणिक स्मारकचे 49 विद्यार्थी रवाना

NCC CATC Camp: गांधीजांच्या MGM कॉलेजातील विद्यार्थी माणिक स्मारक आर्य विद्यालयामध्ये १० दिवसीय CATC शिबिरासाठी रवाना झाले. या शिबिरात ड्रिल, शस्त्र हाताळणी, फायरिंग

एनसीसीच्या CATC शिबिरासाठी माणिक स्मारकचे 49 विद्यार्थी रवाना

NCC CATC Camp

हिंगोली (NCC CATC Camp) : छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील गांधींले येथील MGM कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एनसीसीच्या CATC म्हणजेच Combined Annual Training Camp मध्ये सहभागी होण्यासाठी माणिक स्मारक आर्य विद्यालयातील 49 कॅडेट्स सेकंड ऑफिसर शिवराज सरनाईक यांच्या नेतृत्वात रवाना झाले आहेत. 

या दहा दिवसीय शिबिरामध्ये (NCC CATC Camp) कॅडेट्सना सैनिकी शिस्त, नेतृत्वगुण, व्यक्तिमत्त्व विकास व राष्ट्रसेवेची भावना रुजवण्यासाठी विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शिबिरादरम्यान ड्रिल प्रशिक्षण, शस्त्र हाताळणी व फायरिंग, नकाशा वाचन, फील्ड क्राफ्ट व बॅटल क्राफ्ट, शारीरिक प्रशिक्षण, योगा, सांस्कृतिक कार्यक्रम, समूह चर्चा, नेतृत्व विकास, आपत्ती व्यवस्थापन व सामाजिक सेवा उपक्रम राबवले जाणार आहेत. यासोबतच विविध स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले आहे.

या (NCC CATC Camp) प्रशिक्षणामुळे कॅडेट्समध्ये आत्मविश्वास, शिस्त, संघभावना व नेतृत्व क्षमता विकसित होण्यास मोठी मदत होणार आहे. भविष्यात संरक्षण दलांमध्ये करिअर करण्यासाठी आवश्यक प्राथमिक ज्ञान व प्रत्यक्ष अनुभवही या शिबिरातून मिळतो. दहा दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर सहभागी कॅडेट्सना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येणार आहेत.

संबंधित सामग्री

नाशिकहून चेन्नईकडे धावणार 800 टनांची ‘कांदा एक्सप्रेस’; दर घसरण्याच्या शक्यतेने शेतकरी नाराज

नाशिकहून चेन्नईकडे धावणार 800 टनांची ‘कांदा एक्सप्रेस’; दर घसरण्याच्या शक्यतेने शेतकरी नाराज

कांद्याच्या वाढलेल्या दरावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारकडून बफर स्टॉकमधील कांदा देशातील विविध बाजारपेठांमध्ये पाठवला जात आहे.

Aug 28, 2026
सरजुदेवी भिकुलाल भारुका आर्य कन्या विद्यालयात 'घर घर तिरंगा' रॅली उत्साहात

सरजुदेवी भिकुलाल भारुका आर्य कन्या विद्यालयात 'घर घर तिरंगा' रॅली उत्साहात

Ghar Ghar Tiranga: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त 12 ऑगस्ट रोजी सरजुदेवी भिकुलाल भारुका आर्य कन्या विद्यालयात 'घर घर तिरंगा' अभियानांतर्गत रॅलीचे आयोजन करण्यात आले.

Aug 12, 2026
आसोला खुर्द येथील युवक रोहित चव्हाण यांचा सन्मान!

आसोला खुर्द येथील युवक रोहित चव्हाण यांचा सन्मान!

Soldier Rohit Chavan: आसोला खुर्द येथील रोहित चव्हाण यांना भारतीय सेनेतर्फे संमानित केले. त्यांना बॉम्बे इंजीनियरिंग ट्रेनिंग बटालियन-२ मध्ये शिकवण्यासाठी निवडले गेले आहे.

Jun 30, 2026
श्री शिवाजी महाविद्यालयातील 35 कॅडेटची सैन्य व पोलीस दलात निवड; 120 विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी

श्री शिवाजी महाविद्यालयातील 35 कॅडेटची सैन्य व पोलीस दलात निवड; 120 विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी

स्थानिक श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावतीद्वारे संचालित श्री शिवाजी विज्ञान व कला महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या करिअर घडविण्यात उल्लेखनीय यश संपादन केले.

Jun 08, 2026