भाजपा युवा मोर्चा

नांदेडमध्ये उद्या भाजपा युवा मोर्चाचे 'जनआक्रोश आंदोलन

BJP Yuva Morcha: नांदेडमध्ये भाजपा युवा मोर्चाने 'जनआक्रोश आंदोलन' आयोजित केले आहे. यात महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणलेल्या 'नारीशक्ती वंदन अधिनियम' कायद्याच्या विरोधात मतदान

नांदेडमध्ये उद्या भाजपा युवा मोर्चाचे 'जनआक्रोश आंदोलन

BJP Yuva Morcha

आंदोलनात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, शशिकांत पा. क्षीरसागर यांचे आवाहन

​नांदेड (BJP Yuva Morcha) : 'नारीशक्ती वंदन अधिनियम' कायद्याला विरोध करणाऱ्या काँग्रेस आणि विरोधी पक्षांच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी उद्या २३ एप्रिल  रोजी नांदेडमध्ये भारतीय जनता पार्टी महानगर युवा मोर्चाच्या वतीने भव्य 'जनआक्रोश आंदोलन' आयोजित करण्यात आले आहे. शहरातील आयटीआय चौक परिसरातील महात्मा ज्योतिबा फुले पुतळा येथे सकाळी १०:३० वाजता हे आंदोलन होणार आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष शशिकांत पा क्षीरसागर यांनी केले आहे.

केंद्र सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणलेल्या ऐतिहासिक 'नारीशक्ती वंदन अधिनियम' (BJP Yuva Morcha) कायद्याच्या विरोधात मतदान करणाऱ्या पक्षांचा पर्दाफाश करणे, हा या आंदोलनाचा मुख्य उद्देश आहे. ​भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष शशिकांत क्षीरसागर यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, "काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी महिला आरक्षणाला विरोध करून आपली महिला विरोधी मानसिकता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. या अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे."

​या (BJP Yuva Morcha) आंदोलनासाठी भोकर विधानसभा मतदार संघाच्या आमदार श्रीजया ताई चव्हाण व भाजपा महानगराध्यक्ष अमरनाथ राजुरकर यांची विशेष उपस्थिती असणार आहे.या जनआक्रोश आंदोलनात महिलांनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपला निषेध नोंदवावा, असे आवाहन भाजपा युवा मोर्चातर्फे त्यांनी केले आहे.

संबंधित सामग्री

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद, केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद, केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद. नांदेडमध्ये जीवित व वित्तहानी नाही.

Oct 03, 2026
नांदेडमध्ये प्रशासन अलर्ट! सरकारी सुट्टीतही अधिकारी-कर्मचाऱ्यांना कार्यालयात हजर राहण्याचे आदेश

नांदेडमध्ये प्रशासन अलर्ट! सरकारी सुट्टीतही अधिकारी-कर्मचाऱ्यांना कार्यालयात हजर राहण्याचे आदेश

नांदेड जिल्ह्यातील दुष्काळसदृश्य परिस्थिती लक्षात घेऊन २ ते ४ ऑक्टोबरच्या सरकारी सुट्टीतही अधिकारी-कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Oct 01, 2026
डीजेच्या कर्णकर्कश आवाजावर माहूर पोलिसांची दबंग कारवाई

डीजेच्या कर्णकर्कश आवाजावर माहूर पोलिसांची दबंग कारवाई

लखमापूर येथे प्रतिबंधित डीजे वापरल्याप्रकरणी माहूर पोलिसांची कारवाई; पाच गणेश मंडळांच्या सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल, १.३७ कोटींचा मुद्देमाल जप्त.

Sep 26, 2026
दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांची सुनेत्रा पवारांसमोर व्यथा; कर्जमाफी आणि मदतीचे आश्वासन

दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांची सुनेत्रा पवारांसमोर व्यथा; कर्जमाफी आणि मदतीचे आश्वासन

नांदेडच्या सोनखेडमध्ये दुष्काळी पाहणीदरम्यान शेतकऱ्यांनी व्यथा मांडल्या. सुनेत्रा पवार यांनी पंचनामे, मदत, पाणी, चारा आणि कर्जमाफीबाबत आश्वासन दिले.

Sep 26, 2026
सोयाबीनला शेंगा नाहीत, कापसाला बोंड नाही; पंकजा मुंडेंनी पाहिली शेतकऱ्यांची व्यथा

सोयाबीनला शेंगा नाहीत, कापसाला बोंड नाही; पंकजा मुंडेंनी पाहिली शेतकऱ्यांची व्यथा

महाराष्ट्रातील 265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर. जमीन महसूल, पीक कर्ज आणि कृषीपंप वीजबिलात सवलती; सुनेत्रा पवार, पंकजा मुंडेंकडून पाहणी.

Sep 26, 2026