सामाजिक समता सप्ताह

​नांदेडमध्ये 'सामाजिक समता सप्ताहा'निमित्त ज्येष्ठ नागरिक जनजागृती मेळावा व आरोग्य शिबिर संपन्न ​

Social Equality Week: नांदेडमध्ये सामाजिक समता सप्ताहाच्या निमित्ताने ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिर व माहिती सत्र आयोजित करण्यात आले.

​नांदेडमध्ये 'सामाजिक समता सप्ताहा'निमित्त ज्येष्ठ नागरिक जनजागृती मेळावा व आरोग्य शिबिर संपन्न ​

Social Equality Week

नांदेड (Social Equality Week) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागामार्फत ८ एप्रिल ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत 'सामाजिक समता सप्ताह' राबविण्यात येत आहे. या सप्ताहाचे औचित्य साधून सोमवार, १३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता मालेगाव रोडवरील 'संध्या छाया' संचलित रुस्तुमजी मेवालाल वृद्धाश्रमात ज्येष्ठ नागरिक जनजागृती मेळावा व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात पार पडले. ​मान्यवरांची उपस्थिती आणि सन्मान ​कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. पी.डी. जोशी पाटोदेकर होते, तर प्रमुख पाहुण्या म्हणून वृद्धाश्रमाच्या सचिव सुरेखा पाटणे मॅडम उपस्थित होत्या. समाज कल्याण विभागाचे श्री. विठ्ठल बोराटे (वरिष्ठ लिपीक), कपिल जेटलावार (कनिष्ठ लिपीक), गजानन पाम्पटवार (तालुका समन्वयक), विजय माळवतकर (तालुका समन्वयक) आणि प्रमोद गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

मान्यवरांचे स्वागत समाज कल्याण विभागाच्या वतीने 'संविधान प्रास्ताविक उद्देशिका' प्रतिमा देऊन करण्यात आले. ​तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी ​या शिबिरात ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यात आली. यामध्ये डॉ. सुप्रिया गोडघासे (स्त्रीरोग तज्ञ), डॉ. अनिकेत जोशी (त्वचारोग तज्ञ) आणि डॉ. अश्विन लव्हेकर (कान, नाक, घसा तज्ञ) यांनी उपस्थित राहून वृद्धाश्रमातील वृद्धांची सखोल आरोग्य तपासणी केली व आवश्यक वैद्यकीय सल्ला दिला. ​मार्गदर्शन आणि योजनांची माहिती ​कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजानन पाम्पटवार यांनी केले, ज्यामध्ये त्यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनाच्या व समाज कल्याण विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली.

सचिव सुरेखा पाटणे यांनी वृद्धाश्रमातील सोयी-सुविधा आणि वृद्धांच्या दिनचर्येबाबत उपस्थितांना अवगत केले. विठ्ठल बोराटे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले, तर अध्यक्ष डॉ. पी.डी. जोशी पाटोदेकर यांनी आपल्या भाषणातून ज्येष्ठ नागरिकांच्या सामाजिक भूमिकेवर प्रकाश टाकला. ​कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप फटाले यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. सुप्रिया गोडघासे यांनी मानले. ​शहरात स्वच्छता मोहीम ​समता सप्ताहाचे औचित्य साधून शहरात विविध ठिकाणी स्वच्छता मोहीमही राबवण्यात आली.

यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुर्णाकृती पुतळा परिसर, अण्णाभाऊ साठे पुतळा, राजर्षी शाहू महाराज पुतळा, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले पुतळा परिसर, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर तसेच प्रमुख रस्ते, मस्जिद परिसर आणि बौद्ध विहार या ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. ​या मोहिमेत समतादूत दिलीप सोंडारे, शेख ईर्शाद तसेच कार्यालयातील कर्मचारी विठ्ठल बोराटे, कपिल जेटलावार, श्रीमती एस.के. काळे, रहिम शेख, गणेश माळवदकर व गजानन पांपटवार यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. ​सदर सर्व उपक्रम समाज कल्याण नांदेडचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मीनगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले.

संबंधित सामग्री

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद, केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद, केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद. नांदेडमध्ये जीवित व वित्तहानी नाही.

Oct 03, 2026
नांदेडमध्ये प्रशासन अलर्ट! सरकारी सुट्टीतही अधिकारी-कर्मचाऱ्यांना कार्यालयात हजर राहण्याचे आदेश

नांदेडमध्ये प्रशासन अलर्ट! सरकारी सुट्टीतही अधिकारी-कर्मचाऱ्यांना कार्यालयात हजर राहण्याचे आदेश

नांदेड जिल्ह्यातील दुष्काळसदृश्य परिस्थिती लक्षात घेऊन २ ते ४ ऑक्टोबरच्या सरकारी सुट्टीतही अधिकारी-कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Oct 01, 2026
डीजेच्या कर्णकर्कश आवाजावर माहूर पोलिसांची दबंग कारवाई

डीजेच्या कर्णकर्कश आवाजावर माहूर पोलिसांची दबंग कारवाई

लखमापूर येथे प्रतिबंधित डीजे वापरल्याप्रकरणी माहूर पोलिसांची कारवाई; पाच गणेश मंडळांच्या सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल, १.३७ कोटींचा मुद्देमाल जप्त.

Sep 26, 2026
दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांची सुनेत्रा पवारांसमोर व्यथा; कर्जमाफी आणि मदतीचे आश्वासन

दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांची सुनेत्रा पवारांसमोर व्यथा; कर्जमाफी आणि मदतीचे आश्वासन

नांदेडच्या सोनखेडमध्ये दुष्काळी पाहणीदरम्यान शेतकऱ्यांनी व्यथा मांडल्या. सुनेत्रा पवार यांनी पंचनामे, मदत, पाणी, चारा आणि कर्जमाफीबाबत आश्वासन दिले.

Sep 26, 2026
सोयाबीनला शेंगा नाहीत, कापसाला बोंड नाही; पंकजा मुंडेंनी पाहिली शेतकऱ्यांची व्यथा

सोयाबीनला शेंगा नाहीत, कापसाला बोंड नाही; पंकजा मुंडेंनी पाहिली शेतकऱ्यांची व्यथा

महाराष्ट्रातील 265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर. जमीन महसूल, पीक कर्ज आणि कृषीपंप वीजबिलात सवलती; सुनेत्रा पवार, पंकजा मुंडेंकडून पाहणी.

Sep 26, 2026