मातंग समाज एल्गार

अनुसूचित जातीच्या आरक्षण उपवर्गीकरणासाठी नांदेडमध्ये मातंग समाजाचा एल्गार

Matang Samaj Elgar: नांदेडमध्ये मातंग समाजाने आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी धरणे आंदोलन केले. महाराष्ट्रात अनुसूचित जातीच्या आरक्षणात मातंग समाजाला न्याय मिळावा.

अनुसूचित जातीच्या आरक्षण उपवर्गीकरणासाठी नांदेडमध्ये मातंग समाजाचा एल्गार

Matang Samaj Elgar

माजी आमदार अविनाश घाटे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची महाराष्ट्रात अंमलबजावणी करण्याची मागणी

​नांदेड (Matang Samaj Elgar) : अनुसूचित जातीच्या आरक्षणात तात्काळ उपवर्गीकरण करून मातंग व इतर वंचित जातींना न्याय द्यावा, या प्रमुख मागणीसाठी मंगळवारी नांदेडमध्ये मातंग समाज आक्रमक झाला. 'मातंग समाज समन्वय समिती'च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन (Matang Samaj Elgar) करण्यात आले. जोपर्यंत उपवर्गीकरण लागू होत नाही, तोपर्यंत राज्य सरकारने सुरू केलेली मेगा नोकर भरती तात्काळ स्थगित करावी, असा इशारा माजी आमदार अविनाश घाटे यांनी  दिला.

​यावेळी बोलताना अविनाश घाटे म्हणाले की, "महाराष्ट्रात अनुसूचित जातीसाठी असलेल्या १३% आरक्षणाचा लाभ केवळ मोजक्याच २ ते ३ जातींना मिळत आहे. मातंग आणि तत्सम इतर जाती मुख्य प्रवाहापासून दूर फेकल्या गेल्या आहेत. यासाठी समाज मागील २५ वर्षांपासून संघर्ष करत आहे. १ ऑगस्ट २०२४ रोजी सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल देत राज्यांना उपवर्गीकरण करण्याचे अधिकार दिले आहेत. पंजाब, हरियाणा, तेलंगणा यांसारख्या राज्यांनी याची अंमलबजावणीही सुरू केली आहे, मात्र पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात अद्याप हे पाऊल उचलले गेलेले नाही." महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेल्या न्या. अनंत बदर समितीने आपला अहवाल सादर केला असला, तरी सरकार या प्रक्रियेत कमालीची दिरंगाई करत आहे. एकीकडे उपवर्गीकरणाचा निर्णय प्रलंबित असताना दुसरीकडे सरकारने मोठी नोकर भरती (मेगा भरती) सुरू केली आहे. यामुळे (Matang Samaj Elgar) मातंग समाजातील सुशिक्षित तरुणांचे शैक्षणिक आणि नोकरीविषयक प्रचंड नुकसान होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

​अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करून तात्काळ अंमलबजावणी सुरू करावी.जोपर्यंत आरक्षणाचे उपवर्गीकरण लागू होत नाही, तोपर्यंत कर्नाटक राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातील सर्व नोकर भरती तात्काळ स्थगित करण्यात यावी.अशी मागणी मातंग समाज समन्वय समितीच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. जर सरकारने या मागण्यांची तातडीने दखल घेतली नाही, तर आगामी काळात संपूर्ण राज्यात तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन छेडले जाईल, असा इशाराही समन्वय समितीच्या वतीने देण्यात आला आहे.

​या आंदोलनात मातंग समाज (Matang Samaj Elgar) समन्वय समितीचे राज्य समन्वयक माजी.आ.अविनाशराव घाटे,केशव शेकापूरकर, सतीश कावडे, गणेश तादलापूरकर, प्रा.जी.एल.सुर्यवंशी, देविदास इंगळे,पंडित वाघमारे,गणपतराव गायकवाड,नगरसेवक हेमंत घाटे यांच्यासह मातंग समाजातील विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित सामग्री

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींसोबतच्या भेटीत महाराष्ट्राच्या दुष्काळावर चर्चा झाल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीचे आश्वासन.

Oct 07, 2026
फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भूत काढण्याच्या बहाण्याने अघोरी विधी करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. सौरभ नाना मदने याला अटक झाली असून POCSO अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

Oct 07, 2026
तब्बल पंधरा वर्षांनंतर मिळाले आधार कार्ड; तहसीलदारांच्या हस्ते वितरीत 

तब्बल पंधरा वर्षांनंतर मिळाले आधार कार्ड; तहसीलदारांच्या हस्ते वितरीत 

Nanded Aadhar card: गत पंधरा वर्षांपासून आधार कार्ड नसल्याने विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासह दैनंदिन प्रशासकीय कामकाजात अडचणींचा सामना करणाऱ्या संजय डोमाजी दालपे यांना नितीन हातमोडे, सेतू केंद्र..

Oct 07, 2026
FDAच्या कारवाईने ‘सूरज लामा मोमोज’ चर्चेत; कधीकाळी सेलिब्रिटींचे ड्रायव्हर होते मालक

FDAच्या कारवाईने ‘सूरज लामा मोमोज’ चर्चेत; कधीकाळी सेलिब्रिटींचे ड्रायव्हर होते मालक

तुकाराम मुंढेंच्या FDAकडून कारवाई; ‘सूरज लामा मोमोज’सह ८ दुकानांचे परवाने निलंबित. कधीकाळी सेलिब्रिटी ड्रायव्हर असलेल्या सूरज लामांचा संघर्ष पुन्हा चर्चेत.

Oct 07, 2026
९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026