शिवसेना परमेश्वर मांडगे

'गद्दारीला माफी नाही', हिंगोलीत पाऊल ठेवल्यास खासदार आष्टीकरांचे तोंड काळे करू

ShivSena Parmeshwar Mandge: उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे उपजिल्हाप्रमुख परमेश्वर मांडगे, खासदार नागेश पाटील आष्टीकराला गद्दारीची आरोप करत शिवसेनेच्या विरोधात इशारा देऊन हिंगोलीत गाजावाजा सुरू

'गद्दारीला माफी नाही', हिंगोलीत पाऊल ठेवल्यास खासदार आष्टीकरांचे तोंड काळे करू

ShivSena Parmeshwar Mandge

 

उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेचा थेट इशारा

हिंगोली (ShivSena Parmeshwar Mandge) : नांदेड येथे मोठ्या गाजावाजात शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या हिंगोलीचे खासदार आष्टीकरांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने जोरदार हल्लाबोल केला आहे. 'मतदारांशी प्रतारणा करून स्वतःचे मत विकले, निष्ठेची किंमत शून्य केली,' असा संतप्त आरोप करत शिवसेना उपजिल्हाप्रमुख परमेश्वर मांडगे यांनी खासदारांना हिंगोलीत प्रवेश बंदीचा इशारा दिला आहे.

उपजिल्हाप्रमुख परमेश्वर मांडगे (ShivSena Parmeshwar Mandge) म्हणाले, 'नांदेडमध्ये कितीही गाजावाजा झाला असला तरी खा. नागेश पाटील आष्टीकर यांनी आमच्या हक्काच्या मतांचा बाजार मांडला आहे. जर त्यांच्यात हिंमत असती तर त्यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन पक्षांतर करायला हवे होते. पक्षाशी आणि मतदारांशी केलेल्या या गद्दारीमुळे सर्वसामान्य शिवसैनिकांच्या काळजावर खोल घाव घातला गेला आहे. नुकताच नांदेड येथे झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यावेळी स्थानिक शिवसैनिकांनीही खासदारां विरोधात जोरदार घोषणाबाजी करत रोष व्यक्त केला होता. या घटनेनंतर हिंगोली जिल्ह्यातील उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे.

'आम्ही अहोरात्र कष्ट करून, मतदारांच्या विश्वासावर या खासदाराला निवडून आणले होते. मात्र, त्यांनी स्वार्थासाठी पाऊल उचलल्याने निष्ठावंत शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या आहेत. पदाचा राजीनामा देऊन गेले असते तर इतके वाईट वाटले नसते,' असे मांडगे यांनी स्पष्ट केले. खासदारकीचा राजीनामा न देता पक्षांतर केल्यामुळे हिंगोली लोकसभा मतदारसंघातील जनतेमध्ये कमालीचा असंतोष पसरला आहे. या पार्श्वभूमीवर परमेश्वर मांडगे यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांनी इशारा दिला की, 'संबंधित खासदारांना आता हिंगोलीचा विसर पडला आहे. पण ज्या दिवशी ते हिंगोली जिल्ह्यात पाऊल ठेवतील, त्या दिवशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने त्यांना तीव्र विरोधाला सामोरे जावे लागेल आणि त्यांचे तोंड काळे केले जाईल. या आक्रमक इशाऱ्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

गद्दारीचे परिणाम भोगावे लागणार- परमेश्वर मांडगे

सर्वांनी लोकसभेच्या निवडणूकीत उबाठाचे नागेश पाटील आष्टीकर यांना निवडूण आणण्याकरीता जीवापाड प्रयत्न केले. त्यामुळेच हा विजय प्राप्त झाला. खा. आष्टीकरांनी पक्षासोबत गद्दारी केल्याने त्याचे परिणाम त्यांना निश्चित भोगावे असा इशारा उबाठा शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख (ShivSena Parmeshwar Mandge) परमेश्वर मांडगे यांनी दिला आहे.

संबंधित सामग्री

आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर ज्ञानेश कुमारांचा दौरा स्थगित; आता राजीनामा देणार?

आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर ज्ञानेश कुमारांचा दौरा स्थगित; आता राजीनामा देणार?

ज्ञानेश कुमार यांचा छत्तीसगड दौरा स्थगित झाला असून त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Oct 07, 2026
जतच्या रास्ता रोको आंदोलनावर पोलिसांची कारवाई; २ माजी आमदारांसह ४० जणांविरोधात गुन्हा

जतच्या रास्ता रोको आंदोलनावर पोलिसांची कारवाई; २ माजी आमदारांसह ४० जणांविरोधात गुन्हा

जत तालुक्याच्या नामांतरासह पाण्याच्या मागणीसाठी करण्यात आलेल्या सर्वपक्षीय आंदोलनानंतर सांगली जिल्ह्यातील जत येथे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

Aug 29, 2026
जि.प. शाळेत विनापरवानगी प्रवेश; शिक्षकांना धमकावले!

जि.प. शाळेत विनापरवानगी प्रवेश; शिक्षकांना धमकावले!

CJP Abhijit Deepke: कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दिपके यांच्या २० ऑगस्ट रोजी झालेल्या लातूर जिल्हा दौऱ्यादरम्यान औसा शहरातील जिल्हा परिषद शाळेत विनापरवानगी प्रवेश करून शासकीय कामकाजात अडथळा

Aug 23, 2026
'मोदी सरकारवरील माझा विश्वास उडाला!', सोनम वांगचुकांचा मोठा दावा

'मोदी सरकारवरील माझा विश्वास उडाला!', सोनम वांगचुकांचा मोठा दावा

Sonam Wangchuk: सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आपला 26 दिवसांचा उपवास संपवल्यानंतर एक महत्त्वपूर्ण दावा केला आहे. त्यांचा आरोप आहे की, सरकारने आपली आश्वासने पूर्ण केली नाहीत..

Aug 06, 2026
नागपुरातील व्हेरायटी चौकात युवक काँग्रेसचे ‘अमित शाह जवाब दो’ बॅनर झळकले..

नागपुरातील व्हेरायटी चौकात युवक काँग्रेसचे ‘अमित शाह जवाब दो’ बॅनर झळकले..

Nagpur Youth Congress Protest: आंदोलनादरम्यान ‘अमित शाह जवाब दो’ असे शीर्षक असलेले मोठे बॅनर उड्डाणपुलावरून झळकविण्यात आले. बॅनरवरील ‘मोदी ने मरवा दिया’ आणि ‘Gen Z से डर गया बूमर मोदी’

Aug 05, 2026