CJP Abhijit Deepke: कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दिपके यांच्या २० ऑगस्ट रोजी झालेल्या लातूर जिल्हा दौऱ्यादरम्यान औसा शहरातील जिल्हा परिषद शाळेत विनापरवानगी प्रवेश करून शासकीय कामकाजात अडथळा
अभिजीत दिपकेंसह पाच जणांवर औसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
औसा (CJP Abhijit Deepke) : कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दिपके यांच्या २० ऑगस्ट रोजी झालेल्या लातूर जिल्हा दौऱ्यादरम्यान औसा शहरातील जिल्हा परिषद शाळेत विनापरवानगी प्रवेश करून शासकीय कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी औसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात (CJP Abhijit Deepke) अभिजीत दिपके, पक्षाचे कार्यकर्ते अजिंक्य शिंदे आणि इतर चार ते पाच जणांचा समावेश असल्याचे पोलिसांत दाखल तक्रारीत नमूद आहे.
पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, २० ऑगस्ट रोजी दुपारी सव्वा एकच्या सुमारास दिपके (CJP Abhijit Deepke) व त्यांच्यासोबत असलेल्या व्यक्तींनी औसा येथील जिल्हा परिषद शाळेत प्रवेश केला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये बसून विविध प्रश्न विचारल्याचा आरोप आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या नियमित शिक्षणात तसेच शासकीय कामकाजात अडथळा निर्माण झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, शाळेत दुसऱ्या शाळेतील विद्यार्थी बसविण्यात आल्याचा आरोप करत शाळेची बदनामी केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तसेच शिक्षकांशी आक्षेपार्ह भाषेत बोलून ‘तुम्हाला निलंबित करायला लावतो’, अशी धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे. शाळेतील संपूर्ण प्रकाराचे चित्रीकरण करून ते माध्यमांवर प्रसारित केल्याचाही आरोप पोलिसांच्या नोंदीत करण्यात आला आहे.
या (CJP Abhijit Deepke) प्रकरणी शाळेतील शिक्षिकेने दिलेल्या तक्रारीवरून औसा पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १३२, ३२९(३), ३५१(२), ३५६(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास औसा पोलिसांकडून सुरू आहे.
अभिजीत दिपके (CJP Abhijit Deepke) यांनी यापूर्वी औसा शहरातील जिल्हा परिषद शाळेची पाहणी केली होती. शाळेतील स्वच्छतागृहांची अवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेल्या मूलभूत सुविधांबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केले होते. यावेळी त्यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांकडेही सुविधांबाबत जाब विचारला होता. मात्र, शाळेतील मूलभूत सुविधांचा मुद्दा उपस्थित करण्यासाठी केलेल्या या पाहणीदरम्यान विनापरवानगी प्रवेश, शासकीय कामात अडथळा आणि शिक्षकांना धमकी दिल्याचे आरोप झाल्याने आता या प्रकरणाला कायदेशीर वळण मिळाले आहे. पोलिसांच्या तपासानंतर या प्रकरणातील आरोपांची पुढील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.