मादी अस्वल यशस्वी रेस्क्यू

मृत्यूच्या दाढेतून सुटका; ६० फूट खोल विहिरीत पडलेल्या मादी अस्वलाचे यशस्वी रेस्क्यू

Bear Rescue Successful: मृत्यूचा धाकटा आघाडीवर उभ्या राहून, ६० फूट गडद खोलात जामलेल्या दोन वर्षाच्या मादीचा वन्यजिव बचाव झाला. चिंचोली येथील वनविभागाचे आरआरटी पथक

मृत्यूच्या दाढेतून सुटका; ६० फूट खोल विहिरीत पडलेल्या मादी अस्वलाचे यशस्वी रेस्क्यू

Bear Rescue Successful

वर्धा (Bear Rescue Successful) : कारंजा (घा.) तालुक्यातील चिंचोली परिसरात ६० फूट खोल कोरड्या विहिरीत पडून मृत्यूशी झुंज देत असलेल्या दोन वर्षे वयोगटातील मादी अस्वलाला वनविभागाच्या बचाव पथकाने थरारक मोहिम राबवत सुरक्षितपणे बाहेर काढले. आरोग्य तपासणीनंतर या अस्वलीला तिच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. वनविभागाच्या तत्परतेमुळे एका वन्यजीवाचे प्राण वाचल्याने परिसरात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

वनपरिक्षेत्राधिकारी विनोद कोहळे यांना १७ जून रोजी दुपारी चिंचोली येथील गणेश रामकृष्ण तांबूस्कर यांच्या शेतातील कोरड्या विहिरीत अस्वल पडल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच वनविभागाचे आरआरटी (रॅपिड रिस्पॉन्स टीम) पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

सुमारे ६० फूट खोल, पूर्णपणे कोरडी व जीर्ण अवस्थेतील विहिरीत अडकलेल्या अस्वलीला बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नव्हता. अशा परिस्थितीत बचावकार्य करणे मोठे आव्हान होते. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर वनविभागाने विशेष पिंजऱ्याच्या साहाय्याने रेस्क्यू ऑपरेशन (Bear Rescue Successful) सुरू केले. अत्यंत संयम आणि खबरदारी बाळगत पिंजरा विहिरीत उतरविण्यात आला. काही वेळ प्रयत्न केल्यानंतर अस्वली पिंजऱ्यात शिरली आणि पथकाने तिला सुरक्षितपणे विहिरीबाहेर काढले.

बाहेर काढल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी अस्वलीची सखोल आरोग्य तपासणी केली. तपासणीत ती कोणत्याही गंभीर दुखापतीशिवाय सुरक्षित असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर वनविभागाने तिला जंगलातील नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.

ही (Bear Rescue Successful) संपूर्ण बचावमोहीम उपवनसंरक्षक हरवीर सिंह व सहाय्यक वनसंरक्षक ज्ञानेश्वर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. मोहिमेत एस. बी. केकान, ए. के. गरे, दीपक कंडीकर, सी. एस. उईके, एस. बी. नागोसे, व्ही. एस. अंबोलकर, एस. व्ही. बुट्टे, वाय. पी. अरसड, सूरज कौरती, पुरुषोत्तम कळसाईत, गौरव कौरती, आयुष सातपुरे, गणेश काळे, स्वप्नील कौरती आणि भावेश नासरे यांनी सक्रिय सहभाग घेतला. कारंजा पोलिसांचेही या मोहिमेस मोलाचे सहकार्य लाभले. वन्यजीव संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या वनविभागाच्या तत्परतेचे हे आणखी एक यशस्वी उदाहरण ठरले.

संबंधित सामग्री

ओडिशाच्या जंगलात सापडले पाच ऑरंगुटान; तस्करीचा संशय

ओडिशाच्या जंगलात सापडले पाच ऑरंगुटान; तस्करीचा संशय

Odisha Orangutan Trafficking: ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील जंगल परिसरात पाच तरुण ऑरंगुटान आढळून आल्याने वन विभागासह वन्यजीवप्रेमींमध्ये खळबळ उडाली आहे. भारतात नैसर्गिकरित्या आढळत नसलेल्या

Sep 10, 2026
इसरूळ शिवारात वाघ-बिबट्याची दहशत; कुत्र्यांच्या शिकारीमुळे शेतकरी भयभीत

इसरूळ शिवारात वाघ-बिबट्याची दहशत; कुत्र्यांच्या शिकारीमुळे शेतकरी भयभीत

चिखली तालुक्यातील इसरूळ परिसरातील शिवारात वाघ किंवा बिबट्यासदृश हिंस्र वन्यप्राण्याचा वावर असल्याच्या चर्चेने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Sep 05, 2026
मोकळ्या जंगलातून जाळीत अडकला बिबट्या; वन विभागाच्या तत्परतेने वाचला जीव

मोकळ्या जंगलातून जाळीत अडकला बिबट्या; वन विभागाच्या तत्परतेने वाचला जीव

मोकळ्या जंगलात मुक्तपणे वावरणारा बिबट्या अचानक संरक्षक जाळीत अडकला. बाहेर पडण्यासाठी त्याची सुरू असलेली धडपड पाहून परिसरात चिंता निर्माण झाली.

Aug 29, 2026
हिंगोलीत महिलांवर हल्ला करणारी दोन माकडे वनविभागाच्या जाळ्यात; नैसर्गिक अधिवासात सोडणार

हिंगोलीत महिलांवर हल्ला करणारी दोन माकडे वनविभागाच्या जाळ्यात; नैसर्गिक अधिवासात सोडणार

शहरातील नारायण नगर परिसरात दहशत माजवून दोन महिलांवर हल्ला करणाऱ्या दोन माकडांना वनविभागाच्या रेस्क्यू पथकाने अखेर पिंजरा लावून पकडले आहे.

Jun 30, 2026
हिंगोलीत वनविभागाची तत्परता; शेततळ्यात अडकलेल्या चार निलगायांना जीवदान

हिंगोलीत वनविभागाची तत्परता; शेततळ्यात अडकलेल्या चार निलगायांना जीवदान

हिंगोली तालुक्यातील माळहिवरा येथे पाण्याच्या शोधात आलेल्या चार निलगाय शेततळ्यात पडल्याची घटना घडली.

Jun 26, 2026