साहित्यिक मनोहर पवार

आंब्याच्या झाडावरून पडून साहित्यिक तथा शाहीर मनोहर पवार यांचा दुर्दैवी मृत्यू

Literary Manohar Pawar: ज्येष्ठ साहित्यिक आणि शाहीर मनोहर पवार यांचा आंब्याच्या झाडावरून पडून मृत्यू झाला. त्यांचा २२ मेला दगडावर आदळून गंभीर अपघात झाला.

आंब्याच्या झाडावरून पडून साहित्यिक तथा शाहीर मनोहर पवार यांचा दुर्दैवी मृत्यू

Literary Manohar Pawar

चिखली (Literary Manohar Pawar) : केळवद येथील ज्येष्ठ साहित्यिक, कवी तथा शाहीर मनोहर पवार यांचे शुक्रवारी दुपारी झालेल्या दुर्दैवी अपघातात निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे साहित्य, शाहिरी आणि सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. मूळचे केळवद येथील व सध्या गवळीपुरा, चिखली येथे वास्तव्यास असलेले मनोहर पवार हे साहित्याशी घट्ट नाळ जोडून आयुष्यभर कार्यरत होते. दि. २२ मे रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास ते आपल्या शेतातील आंब्याच्या झाडावर आंबे तोडत असताना अचानक त्यांचा तोल गेला. झाडावरून खाली पडताना ते थेट दगडावर आदळल्याने गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.

मनोहर पवार (Literary Manohar Pawar) हे केवळ शाहीर नव्हते, तर समाजमनाला दिशा देणारे संवेदनशील साहित्यिक म्हणूनही त्यांची ओळख होती. आपल्या ओजस्वी शाहिरीतून, कवितांमधून आणि लेखणीतून त्यांनी सामाजिक प्रश्नांवर प्रखर भाष्य केले. आर्थिक परिस्थिती हलाखीची असतानाही त्यांनी साहित्याची बांधिलकी कधीच सोडली नाही. शेती आणि पेंटरचा व्यवसाय सांभाळत त्यांनी शाहिरी आणि साहित्यसेवा अखंड सुरू ठेवली. तालुका, जिल्हा, राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या विविध साहित्य संमेलनांमध्ये आणि साहित्यिक कार्यक्रमांमध्ये ते आवर्जून सहभागी होत असत. साहित्यिक चळवळीशी असलेली त्यांची निष्ठा आणि तळमळ अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली होती.

त्यांचे वडील स्वर्गीय रामभाऊ पवार हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध शाहीर होते. त्यांचाच शाहिरीचा वारसा मनोहर पवार (Literary Manohar Pawar) यांनी समर्थपणे पुढे चालवला. आपल्या वडिलांची परंपरा जपत त्यांनी ग्रामीण भागातील शाहिरी आणि लोकसाहित्य जिवंत ठेवण्याचे मोठे कार्य केले. त्यांच्या निधनाने केवळ एका साहित्यिकाचा नव्हे, तर लोककलेचा जिवंत वारसा हरपल्याची भावना साहित्यप्रेमींमध्ये व्यक्त होत आहे. विविध साहित्यिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. स्व. मनोहर पवार यांचा अंत्यविधी शनिवार दि. २३ मे रोजी सकाळी ११ वाजता केळवद येथे होणार आहे.

संबंधित सामग्री

हिंगोलीतील एकुलत्या एक मुलाचा सिरसम येथील अपघातात दुर्दैवी मृत्यू

हिंगोलीतील एकुलत्या एक मुलाचा सिरसम येथील अपघातात दुर्दैवी मृत्यू

Sirsam Accidental Death: शहरातील वंजारवाडा पोळा मारोती भागातील २२ वर्षीय एकुलत्या एक मुलाचा मंगळवारी दुपारच्या सुमारास सिरसम जवळील अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने शोककळा पसरली

Sep 01, 2026
आयशरची दुचाकीला भीषण धडक, एकाचा मृत्यू

आयशरची दुचाकीला भीषण धडक, एकाचा मृत्यू

Parbhani Bike Accident: आयशरने दुचाकीला दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू, दोघे जण जखमी झाले. वसमत -परभणी महामार्गावरील रस्त्यावरील झिरो फाटा टोल नाक्या जवळ घडली.

Aug 16, 2026
परभणीत रस्त्यातील दुभाजकाला धडकून दुचाकीस्वाराचा मृत्यू ..!

परभणीत रस्त्यातील दुभाजकाला धडकून दुचाकीस्वाराचा मृत्यू ..!

Parbhani Accidental Death: 38 वर्षीय परिक्षित लहाणे एक दुचाकीवर चालत असताना परभणी-गंगाखेड रोडवर अपघात झाला आणि मृत होऊन गेला. घटना सायंकाळी घडली,

Jul 28, 2026
भरधाव ट्रकच्या धडकेत २१ वर्षीय युवकाचा मृत्यू

भरधाव ट्रकच्या धडकेत २१ वर्षीय युवकाचा मृत्यू

Ner Youth Death: नेर शहरातील एक चिकन व्यवसायकांचे २१ वर्षीय पुत्र शेख शोएबला दारव्हा रस्त्यावर भरधाव ट्रकने धडका दिला. जखमामुळे त्याने प्राण गमवले, कुटुंबात मोठा आघात झाला.

Jul 13, 2026
परभणीत अपघातातील जखमी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू 

परभणीत अपघातातील जखमी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू 

Parbhani Accidental Death: परभणीतील शाहूनगर पाथरीत रात्रीच्या दुचाकी अपघातामुळे जखमी झालेल्या सुमनबाई खिल्लारेचा उपचारानंतर मृत्यू झाला.

Jul 05, 2026