Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

सिरसम अपघाती मृत्यू

हिंगोलीतील एकुलत्या एक मुलाचा सिरसम येथील अपघातात दुर्दैवी मृत्यू

Sirsam Accidental Death: शहरातील वंजारवाडा पोळा मारोती भागातील २२ वर्षीय एकुलत्या एक मुलाचा मंगळवारी दुपारच्या सुमारास सिरसम जवळील अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने शोककळा पसरली


हिंगोलीतील एकुलत्या एक मुलाचा सिरसम येथील अपघातात दुर्दैवी मृत्यू

Sirsam Accidental Death |

हिंगोली (Sirsam Accidental Death) : शहरातील वंजारवाडा पोळा मारोती भागातील २२ वर्षीय एकुलत्या एक मुलाचा मंगळवारी दुपारच्या सुमारास सिरसम जवळील अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने शोककळा पसरली आहे. 

याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, हिंगोली तालुक्यातील सिरसम शिवारात शुभम मधुकर बांगर  (२२) रा. पोळा मारोती वंजारवाडा हा युवक ट्रॅक्टर अपघातात १ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास गंभीररित्या जखमी झाल्याने त्याला तात्काळ हिंगोलीतील जिल्हा शासकीय रूग्णालयात आणण्यात आले. डॉक्टरांनी तपासल्यानंतर मृत घोषित केले. यावेळी मयत शुभमचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. त्याच्यावर हिंगोलीतील कयाधू नदीच्या तिरावरील स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात आले.

मयत शुभम बांगर हा घरामध्ये एकुलता एक मुलगा होता. त्याचा (Sirsam Accidental Death) अपघातात मृत्यू झाल्याने शोककळा पसरली आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, दोन बहिणी असा परिवार असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.