परभणी अपघाती मृत्यू

परभणीत रस्त्यातील दुभाजकाला धडकून दुचाकीस्वाराचा मृत्यू ..!

Parbhani Accidental Death: 38 वर्षीय परिक्षित लहाणे एक दुचाकीवर चालत असताना परभणी-गंगाखेड रोडवर अपघात झाला आणि मृत होऊन गेला. घटना सायंकाळी घडली,

परभणीत रस्त्यातील दुभाजकाला धडकून दुचाकीस्वाराचा मृत्यू ..!

Parbhani Accidental Death

 

परभणी-गंगाखेड रोडवर ब्राम्हणगाव शिवारात अपघात

परभणी (Parbhani Accidental Death) : गंगाखेड ते परभणी रोडवरील ब्राम्हणगाव शिवारात रस्त्यातील दुभाजकाला धडकून गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. अपघाताची ही घटना सोमवार २७ जुलै रोजी सायंकाळी सातच्या सुमारास घडली. या प्रकरणी परभणी ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पंढरीनाथ लहाणे यांनी फिर्याद दिली आहे. परिक्षित लहाणे वय ३८ वर्ष, असे मयताचे नाव आहे. फिर्यादी यांचा मुलगा परिक्षित हा २७ जुलैच्या सायंकाळी त्याच्या ताब्यातील दुचाकी एम.एच. ०६ सी.जी. ३२४५ या वाहनाने घरी परभणीकडे येत होता. ब्राम्हणगाव शिवारात त्याचा दुचाकीवरील ताबा सुटला. सदर दुचाकी रस्त्यातील दुभाजकाला धडकली. यात परिक्षितच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला. स्वत:च्या अपघाती मृत्युस कारणीभूत ठरल्या प्रकरणी परभणी ग्रामीण पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. घटनास्थळाला महामार्ग पोलीस, ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोनि. सुरेश थोरात, पोलीस पाटील विकास सोनवणे आदींनी भेट दिली.

संबंधित सामग्री

आयशरची दुचाकीला भीषण धडक, एकाचा मृत्यू

आयशरची दुचाकीला भीषण धडक, एकाचा मृत्यू

Parbhani Bike Accident: आयशरने दुचाकीला दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू, दोघे जण जखमी झाले. वसमत -परभणी महामार्गावरील रस्त्यावरील झिरो फाटा टोल नाक्या जवळ घडली.

Aug 16, 2026
परभणीत बुलेट - थारच्या धडकेत एकाचा मृत्यू

परभणीत बुलेट - थारच्या धडकेत एकाचा मृत्यू

Parbhani Accidental Death: परभणीत नांदेड रोडवरील ३१ जुलैच्या शुक्रवारी एक सध्या मृत असलेल्या संतोष बालाजी सावळे याला दुचाकी थार वाहनातून पाठीमागून बुलेटची धडक झाली.

Aug 02, 2026
परभणीत सिंगणापूर टोलनाक्याजवळ भीषण अपघात; 24 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

परभणीत सिंगणापूर टोलनाक्याजवळ भीषण अपघात; 24 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

Singnapur terrible accident: परभणीमध्ये ॲपे रिक्षा आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात २४ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातात एक जखमी झाला

Jun 04, 2026