सिंगणापूर भीषण अपघात

परभणीत सिंगणापूर टोलनाक्याजवळ भीषण अपघात; 24 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

Singnapur terrible accident: परभणीमध्ये ॲपे रिक्षा आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात २४ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातात एक जखमी झाला

परभणीत सिंगणापूर टोलनाक्याजवळ भीषण अपघात; 24 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

Singnapur terrible accident

 

ॲपे रिक्षाची दुचाकीला जोरदार धडक; एक जखमी, चालकाविरुद्ध दैठणा पोलिसांत गुन्हा

परभणी (Singnapur terrible accident) : गंगाखेड महामार्गावरील सिंगणापूर टोलनाक्याजवळ ॲपे रिक्षा आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात 24 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात आणखी एक जण जखमी झाला असून निष्काळजीपणे वाहन चालवल्याप्रकरणी ॲपे चालकाविरुद्ध दैठणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगाखेड तालुक्यातील इनामी तांडा येथील आकाश काशिनाथ राठोड (वय 24) आणि त्यांचे नातेवाईक बळीराम दगडू जाधव हे दोघे कामानिमित्त परभणी येथे आले होते. मंगळवार (दि. 2 जून) रोजी दुपारी सुमारे 4 वाजता ते मोटारसायकल (क्र. एमएच-22 बीए-9478) वरून गावाकडे परतत असताना सिंगणापूर टोलनाक्याजवळ गंगाखेडकडून परभणीकडे येणाऱ्या ॲपे रिक्षा (क्र. एमएच-22 यू-3703) चालकाने भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवत त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

या (Singnapur terrible accident) अपघातात आकाश राठोड यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तर बळीराम जाधव यांचा डावा हात फ्रॅक्चर झाला. जखमींना तातडीने परभणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना बुधवारी (दि. 3 जून) रात्री 11.33 वाजता आकाश राठोड यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान, मृत आकाश राठोड यांचे मामा शामराव शिवाजी चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ॲपे चालकाविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात घडविल्याप्रकरणी दैठणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल सूर्यवंशी करीत आहेत.

संबंधित सामग्री

अपघातांची वाढती संख्या आणि जीवितहानी; राज्यात तीन वर्षांत अपघातांत तब्बल 50 हजारांहून अधिक मृत्यू

अपघातांची वाढती संख्या आणि जीवितहानी; राज्यात तीन वर्षांत अपघातांत तब्बल 50 हजारांहून अधिक मृत्यू

Maharashtra Road Accident: राज्य रस्ते सुरक्षा परिषद बैठक, या तीन वर्षांच्या कालावधीत राज्यात 1.17 लाखांहून अधिक रस्ते अपघात झाले असून, त्यात 50 हजार 488 जणांचा मृत्यू झाला आहे.

Sep 28, 2026
मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; उभ्या ट्रकला इर्टिगा कारची धडक, ४ ठार तर ६ जखमी

मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; उभ्या ट्रकला इर्टिगा कारची धडक, ४ ठार तर ६ जखमी

शहापूरच्या आटगाव येथे मुंबई-नाशिक महामार्गावर इर्टिगा कारचा भीषण अपघात झाला. उभ्या ट्रकला धडकून चार जणांचा मृत्यू, तर सहा जण जखमी झाले.

Sep 16, 2026
आयशरची दुचाकीला भीषण धडक, एकाचा मृत्यू

आयशरची दुचाकीला भीषण धडक, एकाचा मृत्यू

Parbhani Bike Accident: आयशरने दुचाकीला दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू, दोघे जण जखमी झाले. वसमत -परभणी महामार्गावरील रस्त्यावरील झिरो फाटा टोल नाक्या जवळ घडली.

Aug 16, 2026
मिसिंग लिंकवर पहाटे 1.20 वाजता भीषण अपघात; काँग्रेस कार्यकर्ता तुषार भूमकर यांचा मृत्यू

मिसिंग लिंकवर पहाटे 1.20 वाजता भीषण अपघात; काँग्रेस कार्यकर्ता तुषार भूमकर यांचा मृत्यू

पिंपरी-चिंचवडमधील काँग्रेसचे स्थानिक कार्यकर्ते तुषार भूमकर यांचा पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवरील ‘मिसिंग लिंक’वर झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला.

Aug 07, 2026
परभणीत रस्त्यातील दुभाजकाला धडकून दुचाकीस्वाराचा मृत्यू ..!

परभणीत रस्त्यातील दुभाजकाला धडकून दुचाकीस्वाराचा मृत्यू ..!

Parbhani Accidental Death: 38 वर्षीय परिक्षित लहाणे एक दुचाकीवर चालत असताना परभणी-गंगाखेड रोडवर अपघात झाला आणि मृत होऊन गेला. घटना सायंकाळी घडली,

Jul 28, 2026