लातूर बँक कर्मचारी आंदोलन

लातूरमध्ये बँक अधिकारी, कर्मचाऱ्यांची तीव्र निदर्शने!

Latur Bank Employees' Protest: लातूर आणि परिसरातील बँक कर्मचारी आणि अधिकारी यांनी बुधवारी (दि.12) स्टेट बँक ऑफ इंडिया परिसरात तीव्र आंदोलन करून विविध घोषणाद्वारे हा परिसर दणाणून सोडला.

लातूरमध्ये बँक अधिकारी, कर्मचाऱ्यांची तीव्र निदर्शने!

Latur Bank Employees' Protest

 

सरकारला भानावर आणण्यासाठी आंदोलन जनतेत घेऊन जाऊ : कॉ. होळीकर

लातूर (Latur Bank Employees' Protest) : "बाराव्या द्विपक्ष कराराला 900 दिवस होऊनही केंद्र सरकार अंमलबजावणी करीत नाही. हे म्हणजे जुमलेबाज व खोटारडे असून पाच दिवसांचा आठवडा करण्याचा करार करून तो तब्बल दोन वर्षाहून अधिक काळ अंमलबजावणी करीत नाही. त्यामुळे आता आपणास शेतकरी आंदोलन आणि जंतर मंतर वरील जेन झी आंदोलनाने निर्वाणीचा लढा कसा द्यावा, ते शिकविले आहे. या मुजोर सत्तेला जोवर धक्का दिला जात नाही, तोवर हे निगरगट्ट सत्ताधारी भानावर येणार नाहीत. म्हणून आपले आंदोलन तीव्र आणि सर्व जनतेत घेऊन जाऊ या", असे आवाहन लातूर बँक कर्मचाऱ्यांचे नेते कॉ. उत्तम होळीकर यांनी केले.

लातूर आणि परिसरातील बँक कर्मचारी (Latur Bank Employees' Protest) आणि अधिकारी यांनी बुधवारी (दि.12) स्टेट बँक ऑफ इंडिया परिसरात तीव्र आंदोलन करून विविध घोषणाद्वारे हा परिसर दणाणून सोडला. या आंदोलनात भारतीय मजदूर संघ याचे शी संलग्न अशा अत्यंत नगण्य सभासद असलेल्या एन ओ बी डब्ल्यू आणि एन ओ बी ओ या भाजप धार्जिण्या संघटनांनी अपप्रचार करून निर्मला सीतारामन यांचेशी साटेलोटे केल्यामुळे या दोन्ही संघांना युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) या बँकेतून एकत्र आलेल्या फोरम मधून काढून टाकण्यात आल्याची माहिती युवा बँक कर्मचारी नेते कॉ.दीपक माने यांनी भारतीय मजदुर संघाच्या सर्व कटकारस्थानासह समजावून सांगितले.  

याप्रसंगी अधिकारी संघटनेचे नेते कॉ.विवेक पदरे, कॉ.जयप्रकाश, तसेच स्टेट बँक कर्मचारी नेत्या कॉ.अंजली स्वामी यांनी आपल्या मागण्या आणि भारत सरकारच्या जुमलेबाजीचा खरपूस समाचार घेऊन सर्वांनी एकजुटीने प्रदीर्घ संघर्ष करण्याची तयारी ठेवण्याचे आवाहन केले.

या प्रसंगी युनायटेड फोरमचे आक्रमक युवा नेते कॉ.परमेश्वर बडगिरे यांच्या आक्रमक घोषणांनी एक चैतन्य निर्माण केले तर कॉ. आकांक्षा, कॉ.ज्युली या तरुण युवतींनी बँकिंग क्षेत्रातील जेन झी चे कल्पक रूप दाखवून आंदोलक युवकांना आक्रमक घोषणाबाजीतून नृत्य करण्यास प्रोत्साहित केले. याप्रसंगी कॉ.अस्मिता वाघमारे, कॉ.उदय मोरे, कॉ.रेश्मा भवरे कॉ. सुधीर मोरे, कॉ.जयमाला शिंदे, कॉ.राधिका मुंदडा, कॉ.महेश घोडके यांचेसह जवळपास 150 कर्मचारी आणि अधिकारी यांनी सहभाग घेतला.

संबंधित सामग्री

बँकांचा संप अखेर स्थगित झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा

बँकांचा संप अखेर स्थगित झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा

Bank strike called off: बँक कर्मचार्‍यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी २८ ते ३० सप्टेंबर या कालावधीत पुकारण्यात आलेला तीन दिवसीय देशव्यापी संप अखेर स्थगित करण्यात आला आहे.

Sep 28, 2026
बँक कर्मचाऱ्यांचा २८ ते ३० सप्टेंबरचा देशव्यापी संप पुढे ढकलला; सोमवारपासून बँका नियमित सुरू

बँक कर्मचाऱ्यांचा २८ ते ३० सप्टेंबरचा देशव्यापी संप पुढे ढकलला; सोमवारपासून बँका नियमित सुरू

२८ ते ३० सप्टेंबरचा बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप पुढे ढकलला. IBA-UFBU चर्चेनंतर सोमवारपासून बँकांचे नियमित कामकाज सुरू राहणार.

Sep 28, 2026
बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! ११ सप्टेंबरचा देशव्यापी संप कायम; पुढील बैठकीत तोडगा न निघाल्यास आंदोलन तीव्र होणार

बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! ११ सप्टेंबरचा देशव्यापी संप कायम; पुढील बैठकीत तोडगा न निघाल्यास आंदोलन तीव्र होणार

बँक कर्मचारी संघटना आणि इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) यांच्यात आठवड्यातील बँकिंग कामकाज पाच दिवस करण्यासह विविध मागण्यांवर झालेली चर्चा अद्याप निर्णायक ठरलेली नाही.

Sep 05, 2026
ममता बॅनर्जींच्या भाचीचा घरात आढळला मृतदेह

ममता बॅनर्जींच्या भाचीचा घरात आढळला मृतदेह

Mamata Banerjee: तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भाची बृष्टी मुखर्जी हिचा मंगळवारी बीरभूम जिल्ह्यातील घरात मृत्यू झाला.

Sep 01, 2026