कारगिल विजय दिन

कन्हानमध्ये कारगिल विजय दिनानिमित्त शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली

Kargil Victory Day: कारगिल विजय दिनानिमित्त कन्हान शहर विकास मंचच्या वतीने तारसा रोड येथील शहीद चौकात भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कन्हानमध्ये कारगिल विजय दिनानिमित्त शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली

Kargil Victory Day

 

कन्हान शहर विकास मंचच्या वतीने शहीद चौकात श्रद्धांजली कार्यक्रम;
वीर जवानांच्या शौर्याला कृतज्ञ अभिवादन

कन्हान (Kargil Victory Day) : कारगिल विजय दिनानिमित्त कन्हान शहर विकास मंचच्या वतीने तारसा रोड येथील शहीद चौकात भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. देशाच्या संरक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीर जवानांच्या शौर्य, पराक्रम आणि त्यागाचे स्मरण करून त्यांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात मंचाचे नवनिर्वाचित सदस्य शुभम केवट यांच्या हस्ते वीर शहीद प्रकाश देशमुख यांच्या प्रतिमेस व शहीद स्मारकास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

यावेळी मार्गदर्शक भरत सावळे यांनी कारगिल युद्धातील भारतीय सैनिकांनी दाखविलेल्या अद्वितीय शौर्य, धैर्य आणि राष्ट्रनिष्ठेचा गौरव केला. (Kargil Victory Day) शहीदांच्या बलिदानामुळेच देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षितता अबाधित राहिली असून, त्यांच्या त्यागातून प्रत्येक नागरिकाने देशभक्तीची प्रेरणा घेऊन राष्ट्रसेवेची भावना जपली पाहिजे, असे मत भरत सावळे यांनी व्यक्त केले. शहीदांचे बलिदान हे देशवासीयांसाठी सदैव प्रेरणादायी राहील, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रमाच्या शेवटी "भारत माता की जय", "वंदे मातरम्" आणि "शहीद जवान अमर रहे" या देशभक्तीपर घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आणि उपस्थितांनी वीर जवानांना कृतज्ञ अभिवादन केले. या कार्यक्रमाला कन्हान शहर विकास मंचाचे संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावनकर, मार्गदर्शक भरत सावळे, नारायण गजभिए, सूर्यभान चकोले, प्रमोद गिऱ्हे, शुभम बावनकर, मीना गिऱ्हे, सुनिता मानकर, अर्चना तांडेकर, आयुष संतापे, अर्जुन पात्रे, निखिल मेश्राम, अभिषेक साखरे, शुभम केवट, मयूर बावने, हर्षल मेश्राम, नमन रामटेके यांच्यासह अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित सामग्री

शाळेकडे जाणारा कच्चा रस्त्याचे डांबरी किंवा सिमेंट रस्त्या बनविण्याची मागणी

शाळेकडे जाणारा कच्चा रस्त्याचे डांबरी किंवा सिमेंट रस्त्या बनविण्याची मागणी

Kanhan Public School Road: पाटील नगर च्या मागे प्रभाग क्र. १७ कांद्री येथिल वच्छलागोपी पब्लिक स्कूल या शाळेत दोनशे पेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असुन शाळेकडे जाणारा रस्ता कच्चा असुन..

Oct 07, 2026
अवैध कोळसा चोरीचा ट्रक पकडुन कन्हान पोलिसांनी केली कारवाई

अवैध कोळसा चोरीचा ट्रक पकडुन कन्हान पोलिसांनी केली कारवाई

Kanhan illegal coal theft: अवैध कोळसा वाहतुकी विरोधात कन्हान पोलिसांनी धडक कारवाई करित कोळशाने भरलेला संशयित ट्रक जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिस रातील अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ

Oct 05, 2026
२५ गौवंशांची अवैध वाहतुक उघड; ८ जनावरांचा मृत्यु

२५ गौवंशांची अवैध वाहतुक उघड; ८ जनावरांचा मृत्यु

Kanhan cattle Illegal transport: स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण पोलि सांनी कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करत गौवंशांची अवैध वाहतुक करणारा टाटा चा बारा चाकी ट्रक पकडला.

Sep 30, 2026
शेतात कामावर गेलेल्या ६५ वर्षीय महिलेचा वीज पडून मृत्यू

शेतात कामावर गेलेल्या ६५ वर्षीय महिलेचा वीज पडून मृत्यू

कन्हानच्या खोपडी शिवारात ६५ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला. मुसळधार पाऊस व विजांच्या कडकडाटादरम्यान वीज पडल्याने मृत्यू झाल्याची प्राथमिक शक्यता.

Sep 19, 2026
पाच बकऱ्या चोरीला गेल्याने वयोवृद्ध कुटुंबावर उपासमारीची वेळ

पाच बकऱ्या चोरीला गेल्याने वयोवृद्ध कुटुंबावर उपासमारीची वेळ

Kanhan Goat thefts: अज्ञात चोरट्याने पाच बक-या चोरी करून सुमारे एक लाखा चे नुकसान होऊन वयोवृद्ध हौसालला पुंड यांच्यावर उदरनिर्वाहाचे मोठे संकट ओढवले असुन त्याची  परिस्थिती अत्यंत बिकट

Sep 15, 2026