पाणीटंचाई समस्या

कंत्राटदाराच्या व कार्यकारी अभियंताच्या नाकर्तेपणामुळे काजळेश्वर वरखेड गावातील जनतेचे पाण्यासाठी हाल

Water Scarcity Problem: काजळेश्वर व वरखेड गावातील जनतेच्या पाणीटंचाईची समस्या अद्याप सुटली नाही, कंत्राटदार व कार्यकारी अभियंत्यांच्या नाकर्तेपणामुळे गावकरी त्रस्त.

कंत्राटदाराच्या व कार्यकारी अभियंताच्या नाकर्तेपणामुळे काजळेश्वर वरखेड गावातील जनतेचे पाण्यासाठी हाल

Water Scarcity Problem

शासकीय आदेश व नियमांची  ऐशीतैशी!
जिल्हा परिषद प्रशासनाकडून दोशीला वाचविण्याचे प्रयत्न
खासदार व आमदारांनी दिले सीईओ ला चौकशीचे निर्देश

बार्शीटाकळी (Water Scarcity Problem) : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीव राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे,हरघर  जल ही योजना जनतेच्या हितासाठी राबवित आहे. परंतु कंत्राटदार व पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी शासकीय आदेश व नियमाचे उल्लंघन करत "स्वतःच्या मर्जीने,वाटेल त्या पद्धतीने "पाणीपुरवठा योजनेचे काम करण्याचे प्रयत्न चालविल्याने काजळेश्वर व वरखेड गावातील जनतेचे (Water Scarcity Problem) पाण्यासाठी हाल होत आहेत. अकोल्याचे खासदार अनुपधोत्रे व मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांनी अकोला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती अनिता मेश्राम यांना तात्काळगावातील जनतेलापाणी उपलब्ध केल्यानंतर दोशीवर  कारवाई करावी . अशा प्रकारचे निर्देश दिले आहेत. 

बार्शीटाकळी तालुक्यातील काजळेश्वर व वरखेड गावातील जनतेची पाणीटंचाईची समस्या कायम स्वरूपात सुटावी म्हणून, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद अकोला अंतर्गत जलजीवन मिशनचे तीन कोटी 24 लाख 69 हजार 600 रुपये खर्चाची योजना मंजूर झाली होती. कंत्राटदार गजानन डी देशपांडे यानी सदर योजनेचे कंत्राट मिळविल्यानंतर दिनांक 10 ऑगस्ट 2022 ते 15 डिसेंबर 2023 या कालावधीत सदर योजनेचे काम पूर्ण करणे आवश्यक व बंधनकारक होते. परंतु दिनांक 18 मार्च 2026 पर्यंत सदर योजना पूर्णत्वास गेली नाही. त्यामुळे या गावातील जनतेला पाणी (Water Scarcity Problem) उपलब्ध होऊ शकले नाही. याबाबत गावातील जनतेने संबंधिताशी विचारणा केली असता ते उलट सुलट अपमानास्पद शब्दाचा वापर करून अरेरावीची भाषा करत आहेत. 

सदर योजनेचे काम हे शासकीय इस्टिमेट प्रमाणे झाले नसून, पाणीपुरवठा पाईपलाईनचे काम हे साडेतीन फूट खोलवर असणे आवश्यक असताना काही ठिकाणी जमिनीवर तर काही ठिकाणी एक ते दीड फूट खोल अंतरावर पाईपलाईन टाकल्याने, सदर पाईपलाईन फुटण्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. सदर कामाची तात्काळ चौकशी करून शासकीय इस्टिमेट प्रमाणे काम करण्यात यावे, तसेच सखोल कामाची चौकशी करून दोशीवर कारवाई करून गावातील जनतेला तात्काळ पाणी उपलब्ध करून द्यावे.

अशा प्रकारची तक्रार गावचे उपसरपंच तथा बार्शीटाकळी तालुका भारतीय जनता पार्टीचे तालुका सरचिटणीस योगेश कोंदनकार यांनी अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम यांच्याकडे दिनांक 27 फेब्रुवारीलाकेली होती .परंतु अकोला जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता अतुल सोनवणे व कंत्राटदाराची मिली भगत असल्याने,अद्याप पर्यंत गावातील जनतेला पाणी मिळाले नाही, आणि या योजनेच्या कामाची कोणतीच चौकशी झाली नाही. त्यामुळे त्यांनी जिल्ह्याचे खासदार अनुप धोत्रे व आमदार हरीश पिंपळे यांच्याकडे तक्रार केल्यानंतर संबंधितांनी अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्राद्वारे चौकशी करून कारवाईचे व गावातील जनतेला तात्काळ पाणी उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत.

गावातील जनतेला लवकरच पाणी मिळेल...
या गंभीर प्रकरणासंदर्भात जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता अतुल सोनवणे यांच्याशी चर्चा केली असता लवकरच या गावातील जनतेला पाणी मिळेल. असे त्यांनी यावेळी सांगितले.

संबंधित सामग्री

विविध विभागांच्या प्रलंबित प्रकरणाचा सीईओ विवेक गायकवाड यांच्याकडून आढावा

विविध विभागांच्या प्रलंबित प्रकरणाचा सीईओ विवेक गायकवाड यांच्याकडून आढावा

Hingoli Water Scarcity Plan: जिल्हा परिषदेच्या सभागृहात ५ ऑक्टोबर सोमवार रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.बैठकीच्या प्रारंभी २ ऑक्टोबर रोजी घेण्यात आले

Oct 05, 2026
उन्हाच्या तीव्रतेसोबतच रिसोड तालुक्यात पाणीटंचाईचे सावट; पळसखेड प्रकल्पात केवळ ४.०८ टक्के साठा

उन्हाच्या तीव्रतेसोबतच रिसोड तालुक्यात पाणीटंचाईचे सावट; पळसखेड प्रकल्पात केवळ ४.०८ टक्के साठा

Risod Taluka Water Scarcity: उन्हाचा पारा दिवसागणिक वाढत चालल्याने रिसोड तालुक्यातील जलसाठ्यांची स्थिती अत्यंत चिंताजनक झाली आहे. वाढत्या तापमानामुळे आगामी काळात तीव्र पाणीटंचाईचे स्पष्ट संकेत

Oct 04, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंचं आवाहन; ‘उत्सवांचा निधी शेतकऱ्यांसाठी द्या’

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंचं आवाहन; ‘उत्सवांचा निधी शेतकऱ्यांसाठी द्या’

महाराष्ट्रातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्सव साधेपणाने साजरे करून निधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी वापरण्याचं आवाहन केलं.

Oct 01, 2026
वरखेडमध्ये बिबट्याची दहशत: रात्रीची वीज बनली शेतकऱ्यांच्या जीवावर उठणारी

वरखेडमध्ये बिबट्याची दहशत: रात्रीची वीज बनली शेतकऱ्यांच्या जीवावर उठणारी

Varkhed Leopard Terror: पावसाने दिलेली ओढ आणि दुष्काळजन्य परिस्थितीमुळे विहिरीतील उपलब्ध पाण्यावर सोयाबीन व इतर पिकांना जिवंत ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे.

Sep 21, 2026
महाराष्ट्रात पाणीटंचाईचा धोका! भूजल पाणीउपशावर बंदीचे निर्देश

महाराष्ट्रात पाणीटंचाईचा धोका! भूजल पाणीउपशावर बंदीचे निर्देश

Maharashtra Water Scarcity: राज्यातील अनेक भागांत अपेक्षित पाऊस झालेला नसल्याने पाणीटंचाईचे गंभीर सावट निर्माण झाले आहे. संभाव्य टंचाईच्या पार्श्वभूमीवर शासनाने राज्यातील भूजल उपशावर निर्बंध

Sep 20, 2026