महाराष्ट्र पाणीटंचाई

महाराष्ट्रात पाणीटंचाईचा धोका! भूजल पाणीउपशावर बंदीचे निर्देश

Maharashtra Water Scarcity: राज्यातील अनेक भागांत अपेक्षित पाऊस झालेला नसल्याने पाणीटंचाईचे गंभीर सावट निर्माण झाले आहे. संभाव्य टंचाईच्या पार्श्वभूमीवर शासनाने राज्यातील भूजल उपशावर निर्बंध

महाराष्ट्रात पाणीटंचाईचा धोका! भूजल पाणीउपशावर बंदीचे निर्देश

Maharashtra Water Scarcity

मुंबई/ वर्धा (Maharashtra Water Scarcity) : सप्टेंबर महिन्याचा पंधरवडा उलटूनही राज्यातील अनेक भागांत अपेक्षित पाऊस झालेला नसल्याने पाणीटंचाईचे गंभीर सावट निर्माण झाले आहे. संभाव्य टंचाईच्या पार्श्वभूमीवर शासनाने राज्यातील भूजल उपशावर तात्पुरत्या निर्बंधांची कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच पाणीटंचाईला सामोरे जाण्यासाठी ऑक्टोबर 2026 ते जून2027 या कालावधीसाठी कृती आराखडा तयार करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

सोलापूर जिल्ह्यात आतापासूनच पाणीटंचाईची तीव्रता जाणवू लागली असून 57 गावे आणि 225 वाडी-वस्त्यांमधील सुमारे दीड लाख नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. सप्टेंबर महिन्यात अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगण्यात येत असून, आगामी काळात (Maharashtra Water Scarcity) टंचाईची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निर्देशांनुसार ऑक्टोबर 2026 ते जून 2027 या कालावधीचा पाणीटंचाई कृती आराखडा तयार करायचा आहे. त्यासाठी 15 नोव्हेंबर, 20 डिसेंबर आणि 20 जानेवारी 2027 या टप्प्यांवर आवश्यक वेळापत्रक व नियोजन सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

भूजल उपशावर निर्बंध

पिण्याच्या पाण्याचे स्रोत सुरक्षित ठेवण्यासाठी शासनाने भूजल उपशाबाबतही महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. (Maharashtra Water Scarcity) सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोताच्या 500 मीटर परिसरात पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त अन्य कारणांसाठी विहीर खोदण्यास परवानगी देऊ नये, असे निर्देश देण्यात आले आहेत.

तसेच एखाद्या विहिरीतून होणाऱ्या भूजल उपशामुळे सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतावर प्रतिकूल परिणाम होत असल्याचे आढळल्यास, संबंधित विहिरीतून भूजल उपशावर काही कालावधीसाठी मनाई करण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतापासून एक किलोमीटर अंतरातील विहिरींमधून होणाऱ्या भूजल उपशावर तात्पुरते निर्बंध आणण्याची कार्यवाही करण्याचेही निर्देश आहेत.

पीक-पाणी परिस्थितीचा आढावा

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील पीक-पाण्याच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर (Maharashtra Water Scarcity) पाणीपुरवठा विभागाने बुधवारी शासकीय परिपत्रकाद्वारे संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी जिल्हानिहाय कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे आगामी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पाणीस्थितीकडे शासनाचे विशेष लक्ष लागले आहे.

संबंधित सामग्री

बावनकुळेंनी सांगितले मंत्रिमंडळातील महत्त्वाचे निर्णय; शेगाव संस्थानाला ३.८१ हेक्टर जमीन, पाणी योजनांसाठी निधी

बावनकुळेंनी सांगितले मंत्रिमंडळातील महत्त्वाचे निर्णय; शेगाव संस्थानाला ३.८१ हेक्टर जमीन, पाणी योजनांसाठी निधी

महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय: शेगाव संस्थानाला ३.८१ हेक्टर जमीन, पाणी योजनांसाठी निधी, चारा व्यवस्था आणि ओबीसी मागण्यांवर चर्चा.

Oct 14, 2026
अंगणवाडी सेविका-मदतनीसांना दिवाळीपूर्वी भाऊबीज भेट; प्रत्येकी २ हजार रुपये मिळणार

अंगणवाडी सेविका-मदतनीसांना दिवाळीपूर्वी भाऊबीज भेट; प्रत्येकी २ हजार रुपये मिळणार

महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका व मदतनीसांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी २ हजार रुपये भाऊबीज भेट मिळणार. २ लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना लाभ; ४२.८१ कोटींचा निधी.

Oct 14, 2026
कुपटा गावात महिनाभर नळाला पाणीच नाही; ग्रामसेवक गैरहजर असल्याने नागरिकांचे हाल

कुपटा गावात महिनाभर नळाला पाणीच नाही; ग्रामसेवक गैरहजर असल्याने नागरिकांचे हाल

Kupata village Water supply issues: कुपटा गावातील नळाच्या पाणीपुरवठ्याची समस्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. गावात अनेक वेळा एक-एक महिना नळाला पाणीच येत नाही. त्यामुळे नागरिकांना घरामध्ये पाणी साठवून..

Oct 14, 2026
CJP नेत्यांच्या अटकेवरून राहुल गांधी आक्रमक; शांततापूर्ण आंदोलनाच्या अधिकारावरून केंद्रावर हल्लाबोल

CJP नेत्यांच्या अटकेवरून राहुल गांधी आक्रमक; शांततापूर्ण आंदोलनाच्या अधिकारावरून केंद्रावर हल्लाबोल

Rahul Gandhi: दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या आंदोलनावरून सुरू झालेला वाद आता राजकीयदृष्ट्या अधिक तीव्र झाला आहे. कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या दोन नेत्यांना अटक करून तिहार तुरुंगात पाठवण्यात आले..

Oct 14, 2026
नवरात्रीच्या परंपरेचे कारण देत मृत बाळापासून दूर राहिले आई-वडील; स्मशानभूमी कर्मचाऱ्यांनी केला अंत्यविधी

नवरात्रीच्या परंपरेचे कारण देत मृत बाळापासून दूर राहिले आई-वडील; स्मशानभूमी कर्मचाऱ्यांनी केला अंत्यविधी

छत्रपती संभाजीनगरमध्ये नवरात्रीच्या परंपरेचे कारण देत आई-वडिलांनी मृत बाळाला स्पर्श केला नाही. स्मशानभूमी कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेत अंत्यविधी केला.

Oct 14, 2026