नेर (Ner Diesel Shortage) : शहरात निर्माण झालेल्या डिझेल व पेट्रोल टंचाईमुळे शेतकरी, ट्रॅक्टर मालक आणि वाहनधारक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. ऐन शेती मशागतीच्या हंगामात ट्रॅक्टरद्वारे नांगरणीची कामे वेगाने सुरू असताना इंधनाचा तुटवडा निर्माण झाल्याने ग्रामीण भागात चिंतेचे वातावरण पसरले आहे. नेर शहरातील विविध पेट्रोल पंपांवर सकाळपासूनच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून आल्या. अनेक शेतकरी मोठे ड्रम, कॅन आणि इतर भांडी घेऊन डिझेल भरण्यासाठी तासन्तास प्रतीक्षा करत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
डिझेल (Ner Diesel Shortage) उपलब्ध होणार की नाही, याबाबत अनिश्चितता असल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, काही ठिकाणी वाहनधारक आणि नागरिकांची मोठी गर्दी झाल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बंदोबस्त वाढविला. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर गर्दी नियंत्रणात आणण्यात यश आले.
शेतकऱ्यांनी प्रशासनाने तातडीने इंधन पुरवठा (Ner Diesel Shortage) सुरळीत करण्याची मागणी केली आहे. “सध्या शेतीची महत्त्वाची कामे सुरू असून डिझेलअभावी ट्रॅक्टर बंद पडत आहेत. याचा थेट परिणाम शेतीच्या कामांवर होत आहे,” अशी प्रतिक्रिया काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली. इंधन टंचाई किती दिवस राहणार याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नसल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण कायम आहे.
नेरमध्ये डिझेल टंचाईचा फटका; पेट्रोल पंपांवर नागरिकांच्या लांबच लांब रांगा
Ner Diesel Shortage: नेरमध्ये डिझेल आणि पेट्रोल टंचाईने शेतकऱ्यांना, ट्रॅक्टर मालकांना आणि वाहनधारकांना मोठ्या अडचणीत ठेवले आहे.
Ner Diesel Shortage
संबंधित सामग्री
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! शेतीच्या यांत्रिकीकरणाला बळ; डिझेलचा पुरवठा वाढणार..
Farm Mechanization Diesel Supply: हार्मुझच्या सामुद्रधुनीतील संघर्षामुळे निर्माण झालेल्या जागतिक तेलपुरवठ्याच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर जी-7 देश आपत्कालीन साठ्यातील 10 कोटी बॅरल कच्चे तेल-डिझेल बाजार
डिझेल खरेदीवर मोठी मर्यादा! Jio-BP पंपांवर 50 लिटरची कमाल सीमा; Nayara Energyचाही पुरवठा नियंत्रित
Jio-BPच्या काही पंपांवर डिझेल खरेदी 50 लिटरपुरती मर्यादित; Nayara Energyवरही निर्बंध. सरकारी तेल कंपन्यांच्या पंपांवर मात्र सध्या विक्री सुरळीत.
हेलिकॉप्टरने वाचवले प्राण; घरी आणताना अॅम्ब्युलन्स चिखलात अडकली!
Gadchiroli Healthcare System: सर्पदंश झालेल्या दिपाली मडावी हिचा जीव वाचवण्यासाठी तिला गडचिरोलीहून हेलिकॉप्टरने नागपूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले. नागपूर येथे उपचारानंतर प्रकृती सुधारली...
पेरणीविना येरोळ परिसर काळाभोर; पावसाअभावी 15 गावांवर दुष्काळाची गडद छाया!
Unsown Farmland: शिरूर अनंतपाळ तालुक्यातील येरोळ व परिसरातील पंधरा गावातील शेतशिवार खरीप पेरणीविना रिकामा काळाभोर दिसत असून उजाड शिवारामुळे शेतकरी धास्तावला आहे.
जिवती येथिल २३ वर्षीय तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
Jivati Farmer Suicide: २३ वर्षीय तरुण शेतकरी पवन दत्ता राठोडने कर्जाच्या परतफेडातील अडचण आणि शेतकरी कष्टांमुळे आत्महत्या केली. त्याच्या वडिलांचे मृत्यू आणि कुटुंबाचे बोझ पालनपोषणाची जबाबदारी