जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

आयुष्यमान भारत योजनेची प्रभावी अंमलबजावणी व एनक्यूएएस मानांकनासाठी आरोग्य यंत्रणेने गतीने काम करावे

Collector Rahul Gupta: आयुष्यमान भारत योजना आणि राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानांकन (एनक्यूएएस)साठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता ने तालुक्यातील आरोग्य केंद्रांचे प्रभावी अंमलबजावणी करायचे निर्देश

आयुष्यमान भारत योजनेची प्रभावी अंमलबजावणी व एनक्यूएएस मानांकनासाठी आरोग्य यंत्रणेने गतीने काम करावे

Collector Rahul Gupta

हिंगोली (Collector Rahul Gupta) : आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून अधिकाधिक पात्र रुग्णांना लाभ मिळवून द्यावा तसेच राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानांकन (एनक्यूएएस) प्राप्त करण्यासाठी सर्व आरोग्य संस्थांनी नियोजनबद्ध व गुणवत्तापूर्ण काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत त्यांनी तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांचा आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तसेच एनक्यूएएसच्या अनुषंगाने सविस्तर आढावा घेतला.

या बैठकीत आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा आरोग्य संस्थानिहाय आढावा घेण्यात आला. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये पात्र रुग्णांना दाखल करून योजनेचा लाभ देण्यात यावा तसेच प्रत्येक लाभार्थ्याची पोर्टलवर वेळेत नोंदणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. खासगी रुग्णालयांमध्ये आरोग्यमित्रांची पदे भरलेली असताना शासकीय रुग्णालयांमध्ये या सेवेकडे दुर्लक्ष होऊ नये, यासाठी पुढील सात दिवसांत उपजिल्हा रुग्णालये व ग्रामीण रुग्णालयांमध्ये आरोग्यमित्रांची नियुक्ती करण्याबाबत संबंधित कंपनीला निर्देश देण्यात आले.

राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानांकन (एनक्यूएएस) संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांनी प्राधान्याने मानांकनासाठी आवश्यक निकष पूर्ण करण्यासाठी अंग झोकून काम करण्याच्या सूचना दिल्या. प्रत्येक तालुक्यातून किमान दहा उपकेंद्रांचा एनक्यूएएस मानांकनासाठी समावेश करण्यात यावा, असे ठरविण्यात आले. तसेच सर्व तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नियमित भेटी देऊन आरोग्य संस्थांमधील एनक्यूएएसच्या प्रगतीचा सातत्याने आढावा घ्यावा, असे कडक निर्देशही त्यांनी दिले.

रुग्णालयांतील सेवा अधिक गुणवत्तापूर्ण, पारदर्शक व रुग्णकेंद्री करण्यासाठी आवश्यक सुधारणा तातडीने राबविण्याच्या तसेच आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी राहुल गुप्ता (Collector Rahul Gupta) यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

या बैठकीस शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र पुरी, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. दत्ता डुडुळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन राठोड, डॉ. गंगाधर काळे, डॉ. नरवाडे, डॉ. तृप्ती पाटील, जिल्हा साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गणेश जोगदंड, डॉ. संदीप काळे, डॉ. डी. व्ही. सावंत, डॉ. नारायण शिंदे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक शंकर तावडे, जिल्हा लेखा व्यवस्थापक श्रीपाद गारुडी, डॉ. प्रशांत पुठावार यांच्यासह सर्व कार्यक्रम समन्वयक उपस्थित होते.

संबंधित सामग्री

परभणीतील विघ्नहर्ता हॉस्पिटलच्या आरोग्य योजनांची मान्यता निलंबित करण्याची शिफारस; चौकशीत अनियमितता आढळल्याचा निष्कर्ष

परभणीतील विघ्नहर्ता हॉस्पिटलच्या आरोग्य योजनांची मान्यता निलंबित करण्याची शिफारस; चौकशीत अनियमितता आढळल्याचा निष्कर्ष

सेलू शहरातील डॉ. उमेश गायकवाड यांच्या विघ्नहर्ता हॉस्पिटलला मंजूर असलेल्या विविध शासकीय आरोग्य योजनांच्या मान्यता निलंबित करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

Aug 28, 2026
हिंगोलीतील १० आरोग्य संस्थांना NQAS मधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल स्वातंत्र्यदिनी विशेष गौरव

हिंगोलीतील १० आरोग्य संस्थांना NQAS मधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल स्वातंत्र्यदिनी विशेष गौरव

Hingoli Health Institution: स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून हिंगोली जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेला मोठा मान मिळाला आहे. राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन कार्यक्रम अर्थात NQAS अंतर्गत उत्कृष्ट आरोग्य सेवा

Aug 14, 2026
महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेतील गैरव्यवहार प्रकरणी विशेष तपास पथक स्थापन करणार

महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेतील गैरव्यवहार प्रकरणी विशेष तपास पथक स्थापन करणार

CM Devendra Fadnavis: नाशिक जिल्ह्यात महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत झालेल्या कथित गैरव्यवहारांच्या चौकशी करण्यात येत आहे. विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात येणार

Jul 10, 2026
आयुष्मान कार्डधारकांसाठी खुशखबर! WhatsApp वर 'Hi' पाठवा आणि मिळवा 6 मोठे फायदे!

आयुष्मान कार्डधारकांसाठी खुशखबर! WhatsApp वर 'Hi' पाठवा आणि मिळवा 6 मोठे फायदे!

Ayushman Bharat Sarthi: आयुष्मान भारत योजनेच्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा. सरकारने व्हॉट्सॲपवर एक नवीन डिजिटल सेवा सुरू केली आहे, ज्यामुळे वापरकर्ते घरी बसून काही सेकंदात आवश्यक माहिती मिळवू शकतील.

Jul 09, 2026
जि.प. सीईओ विवेक गायकवाड यांच्या संकल्पनेतून ‘शाळा प्रवेश उत्सव’

जि.प. सीईओ विवेक गायकवाड यांच्या संकल्पनेतून ‘शाळा प्रवेश उत्सव’

जिल्हा परिषदेच्या कार्यकारी मंडळाची बैठक मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद सभागृहात पार पडली.

Jun 12, 2026