Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

Vighnaharta Hospital,

परभणीतील विघ्नहर्ता हॉस्पिटलच्या आरोग्य योजनांची मान्यता निलंबित करण्याची शिफारस; चौकशीत अनियमितता आढळल्याचा निष्कर्ष

सेलू शहरातील डॉ. उमेश गायकवाड यांच्या विघ्नहर्ता हॉस्पिटलला मंजूर असलेल्या विविध शासकीय आरोग्य योजनांच्या मान्यता निलंबित करण्याची शिफारस करण्यात आली आहे.


परभणीतील विघ्नहर्ता हॉस्पिटलच्या आरोग्य योजनांची मान्यता निलंबित करण्याची शिफारस चौकशीत अनियमितता आढळल्याचा निष्कर्ष

तक्रारीनंतर कागदपत्रांची तपासणी; आयुष्मान भारत, पीएम-जेएवाय आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा समावेश

परभणी : सेलू शहरातील डॉ. उमेश गायकवाड यांच्या विघ्नहर्ता हॉस्पिटलला मंजूर असलेल्या विविध शासकीय आरोग्य योजनांच्या मान्यता निलंबित करण्याची शिफारस करण्यात आली आहे. तक्रारीच्या अनुषंगाने झालेल्या चौकशीत अनियमितता आढळल्याचे नमूद करण्यात आले असून, जिल्हाधिकारी तथा जिल्हा संनियंत्रण व तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष यांनी राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे ही शिफारस केली आहे. या निर्णयामुळे सेलूसह परभणी जिल्ह्यातील आरोग्य क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे.

सेलू शहरातील हेमंतनगर परिसरातील रहिवासी पठाण रहीम खान गुलाब खान यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती. पोटदुखीचा त्रास होत असल्याने ते १९ जानेवारी २०२६ रोजी विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले होते. त्यांना किडनी स्टोन असल्याचे सांगून शस्त्रक्रियेची गरज असल्याची माहिती देण्यात आली होती. तसेच ही शस्त्रक्रिया शासकीय आरोग्य योजनेअंतर्गत करता येईल, असे सांगण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.

तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, प्रत्यक्षात शस्त्रक्रिया न करताच ती झाल्याचे दाखवून संबंधित शासकीय योजनेअंतर्गत शासनाकडून रक्कम घेण्यात आली. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतरही पोटदुखीचा त्रास कायम राहिल्याने त्यांनी संबंधित डॉक्टरांकडे उपचार घेतले. त्यानंतर परभणीतील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार छत्रपती संभाजीनगर येथे उपचार घेतले असता, तेथे शस्त्रक्रिया झालेली नसल्याचे निदर्शनास आल्याचा दावा पठाण रहीम खान यांनी केला आहे.

या प्रकारानंतर त्यांनी परभणीचे जिल्हा शल्यचिकित्सक तसेच राज्य आरोग्य हमी सोसायटी, मुंबई यांच्याकडे संबंधित कागदपत्रांसह तक्रार केली. तक्रारीची दखल घेत जिल्हा शल्यचिकित्सकांनी चौकशी समिती स्थापन करून प्रकरणाशी संबंधित कागदपत्रांची तपासणी केली.

या तपासणीदरम्यान संबंधित कागदपत्रांमध्ये खाडाखोड आणि ओव्हररायटिंग आढळून आल्याचे चौकशी अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर १८ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रारदाराच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. जिल्हाधिकारी तथा समितीचे अध्यक्ष, जिल्हा शल्यचिकित्सक तथा सदस्य सचिव आणि संबंधित अधिकारी या बैठकीस उपस्थित होते. बैठकीत प्रकरणाची पुढील चौकशी करण्यात आली आणि त्यामध्ये अनियमितता आढळल्याचे नमूद करण्यात आले.

यानंतर २० ऑगस्ट रोजी डॉ. उमेश गायकवाड यांच्या विघ्नहर्ता हॉस्पिटलला मंजूर असलेल्या आयुष्मान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना या तिन्ही योजनांची एकत्रित मान्यता निलंबित करण्याची शिफारस राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

हॉस्पिटल प्रशासनाची प्रतिक्रिया

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना विघ्नहर्ता हॉस्पिटलचे डॉ. उमेश गायकवाड यांनी देशोन्नतीशी बोलताना, “माझ्या हॉस्पिटल बाबत जर अशा आदेश निघाला असेल तर या आदेशाचा मी सन्मान करेल,” अशी प्रतिक्रिया दिली.

Related to this topic: