हिंगोली जलतरण तलाव

निम्मा उन्हाळा सरला; जलतरण तलाव सुरू झालाच नाही...

Hingoli Swimming Pool: हिंगोलीत अर्धा उन्हाळा संपला तरी जलतरण तलाव सुरू न झाल्याने नागरिक व पालकांमध्ये नाराजी. शासनाने खर्च केलेल्या निधीचा काहीच उपयोग न झाल्याने तीव्र निषेध.

निम्मा उन्हाळा सरला; जलतरण तलाव सुरू झालाच नाही...

Hingoli Swimming Pool

जलतरण तलाव बंदच; कोट्यावधींचा निधी पाण्यात

सुधीर गोगटे
हिंगोली (Hingoli Swimming Pool) :
एप्रिल महिना संपत आला, अर्धा उन्हाळा उलटला तरी हिंगोली शहरातील बहुप्रतिक्षित जलतरण तलावाचा दरवाजा अद्याप उघडलेला नाही. दरवर्षी कडक उन्हाळ्यात नागरिक आणि विशेषतः लहान मुलांना दिलासा देणारा हा तलाव यंदा मात्र बंदच असल्याने जलतरणपटू व पालक वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या जलतरण तलावाच्या बांधकाम व नूतनीकरणासाठी मागील काही वर्षांत शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. अत्याधुनिक फिल्टर प्लांट, चेंजिंग रूम, प्रेक्षक गॅलरी अशा सुविधांसाठी मोठी तरतूद झाली. मात्र प्रत्यक्षात तलाव सुरू न झाल्याने 'कोट्यवधींचा निधी पाण्यात गेला' अशी चर्चा शहरात रंगली आहे. उन्हाळी सुट्ट्या लागूनही पोहण्याचा आनंद मुलांना घेता येत नसल्याने पालक हताश झाले आहेत. 

स्थानिक जलतरणपटू (Hingoli Swimming Pool) व प्रशिक्षकांचे म्हणणे आहे की, दरवर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तलाव खुला होतो. यंदा मात्र तांत्रिक कारणे, देखभाल-दुरुस्तीची कामे अपूर्ण असल्याचे सांगत प्रशासनाने वेळ मारून नेली. फिल्टरेशन यंत्रणा, पाणी शुद्धीकरण, सुरक्षा रक्षकांची नियुक्ती यांसारखी कामे रखडल्याने तलाव सुरू करता आलेला नाही, असे सूत्रांकडून समजते. परिणामी उन्हाळी प्रशिक्षण शिबिरेही रद्द करावी लागली असून जिल्ह्यातील उदयोन्मुख जलतरणपटूंचे नुकसान होत आहे.

या संपूर्ण प्रकरणाकडे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. 'जिल्हाधिकार्‍यांनी प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने तलाव सुरू करण्याचे आदेश द्यावेत. कोट्यवधी रुपये खर्चूनही सुविधा मिळत नसेल तर याला जबाबदार कोण?' असा सवाल क्रीडा प्रेमींनी उपस्थित केला आहे. नगर परिषद प्रशासनाकडून मात्र 'लवकरच तांत्रिक बाबी पूर्ण करून तलाव नागरिकांसाठी खुला करू' असे सांगण्यात येत आहे, परंतु निश्चित तारीख जाहीर केलेली नाही.  दरम्यान, वाढत्या तापमानामुळे लहान मुलांना व नागरिकांना पोहण्याचा पर्याय उपलब्ध नसल्याने नाराजी वाढत आहे. खासगी (Hingoli Swimming Pool) जलतरण तलावांचे दर परवडणारे नसल्याने सर्वसामान्य कुटुंबीय शासकीय तलावावरच अवलंबून आहेत. त्यामुळे प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून उन्हाळा संपण्यापूर्वी तरी तलाव सुरू करावा, अशी आग्रही मागणी होत आहे. अन्यथा खर्च केलेला निधी वाया गेला, असा ठपका कायम राहील, अशी भावना व्यक्त होत आहे.

संबंधित सामग्री

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली  येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

Oct 06, 2026
हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

Hingoli Lakshmi Life Care Hospital: हिंगोलीतील कपडा गल्ली येथे फटाका गोदामाला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या ६ रुग्णांवर लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटल, हिंगोली येथे डॉक्टर अखिल अग्रवाल

Oct 06, 2026
हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

Hingoli Firecracker Accident: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली परिसरात फटाक्यांच्या साठवणुकीच्या ठिकाणी लागलेली आग अत्यंत दुर्दैवी व गंभीर आहे. या दुर्घटनेत प्राथमिक माहितीनुसार दोन नागरिकांचा मृत्यू..

Oct 06, 2026
हिंगोली मारवाडी गल्लीतील भिषण आगीत फटाक्यांचा स्फोट, दोघांचा मृत्यू

हिंगोली मारवाडी गल्लीतील भिषण आगीत फटाक्यांचा स्फोट, दोघांचा मृत्यू

Hingoli firecracker explosion: शहरातील मारवाडी गल्ली भागामध्ये गोपाल बासटवार यांच्या घराला सोमवारी रात्री ७.४० च्या सुमारास लागलेल्या भिषण आगीत फटाक्याचा स्फोट होवुन काही जण जखमी झाल्याची घटना

Oct 06, 2026