हिंगोली पाणी संकट

हिंगोली शहरातील गवळीपुरा भागात नागरीकांना पाण्यासाठी वनवास; जलकुंभ उशाला कोरड घशाला

Hingoli water crisis: हिंगोली शहरातील गवळीपुरा भागात पाणी पुरवठा अपुर्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. नगरपालिकेकडून उत्तर न मिळाल्याने नागरिकांमध्ये संताप वाढत आहे.

हिंगोली शहरातील गवळीपुरा भागात नागरीकांना पाण्यासाठी वनवास; जलकुंभ उशाला कोरड घशाला

Hingoli water crisis

हिंगोली (Hingoli water crisis) : शहराच्या शेवटचे टोक असलेल्या गवळीपुरा भागात नगर पालिका पाणी पुरवठा विभागातर्फे अपुरा पाणी पुरवठा  सोडला जात आहे. २३ एप्रिल रोजी बर्‍याच दिवसानंतर पाणी पुरवठा सोडला असता काही नळांना पाणी आलेच नाही तर काही नळांना कमी दाबाचा पाणी पुरवठा झाल्याने पाणी भरण्यासाठी घरातील सर्व सदस्यांना तारेवरची कसरत करावी लागली. हिंगोली शहरामध्ये सध्या पाणी पुरवठ्या संदर्भात मोठी ओरड सुरू आहे. शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याने नागरीकांना टँकरव्दारे पाणी उपलब्ध करून घ्यावे लागत आहे. 

हिंगोली शहरातील गवळीपुरा हा भाग जुना असुन शहराच्या शेवटच्या टोकाला आहे. या भागामध्ये (Hingoli water crisis) अपुरा पाणी पुरवठा होत आहे. विशेष म्हणजे गवळीपुरा भागापासून काही अंतरावरच मंगळवारा बाजारात नगर पालिकेचे जलकुंभ उभारण्यात आलेले आहे. अशा परिस्थितीत चांगल्या दाबाचा पाणी पुरवठा होणे अपेक्षित असताना गवळीपुरा भागातील नागरीकांचा पाण्यासाठी वनवास सुरू आहे. गवळीपुरा हा भाग नेहमीच संवेदनशील म्हणुन ओळखला जातो, पाणी पुरवठ्याच्या संदर्भात मागील काही वर्षापूर्वी या भागातून मोठे आंदोलनही उभारण्यात आले होते. आज परिस्थितीमध्ये या भागातील अपुरा पाणी पुरवठा हा नागरीकांसाठी त्रासदायक ठरत आहे. 

२३ एप्रिल रोजी आठ दिवसानंतर गवळीपुरा भागात नगर पालिकेच्या (Hingoli water crisis) पाणी पुरवठा विभागाने पाणी सोडले परंतु काही नळांना पाणी आले नाही तर काही नळांना कमी दाबाचा पाणी पुरवठा झाला. नागरीकांनी पालिका प्रशासनाकडे संपर्क साधूनही नगर पालिकेचे अधिकारी व कर्मचारी या बाबीकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे पाणी प्रश्नाकरीता भविष्यात एखादे आंदोलन उभे टाकू शकते असे नागरीकातून बोलले जात आहे.

संबंधित सामग्री

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली  येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

Oct 06, 2026
हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

Hingoli Lakshmi Life Care Hospital: हिंगोलीतील कपडा गल्ली येथे फटाका गोदामाला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या ६ रुग्णांवर लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटल, हिंगोली येथे डॉक्टर अखिल अग्रवाल

Oct 06, 2026
हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

Hingoli Firecracker Accident: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली परिसरात फटाक्यांच्या साठवणुकीच्या ठिकाणी लागलेली आग अत्यंत दुर्दैवी व गंभीर आहे. या दुर्घटनेत प्राथमिक माहितीनुसार दोन नागरिकांचा मृत्यू..

Oct 06, 2026
हिंगोली मारवाडी गल्लीतील भिषण आगीत फटाक्यांचा स्फोट, दोघांचा मृत्यू

हिंगोली मारवाडी गल्लीतील भिषण आगीत फटाक्यांचा स्फोट, दोघांचा मृत्यू

Hingoli firecracker explosion: शहरातील मारवाडी गल्ली भागामध्ये गोपाल बासटवार यांच्या घराला सोमवारी रात्री ७.४० च्या सुमारास लागलेल्या भिषण आगीत फटाक्याचा स्फोट होवुन काही जण जखमी झाल्याची घटना

Oct 06, 2026