हिंगोली जनगणना 2027

हिंगोलीत जनगणना 2027 च्या कामाला सुरुवात, नागरिकांना ‘स्वगणने’द्वारे सहभागाची संधी

Hingoli Census 2027: हिंगोलीमध्ये जनगणना 2027 च्या कामाची सुरुवात झाली आहे. नागरिकांना स्वत:ची माहिती ऑनलाईन भरण्याची संधी देण्यात आली आहे. डिजिटल पद्धतीमुळे

हिंगोलीत जनगणना 2027 च्या कामाला सुरुवात, नागरिकांना ‘स्वगणने’द्वारे सहभागाची संधी

Hingoli Census 2027

हिंगोली (Hingoli Census 2027) : भारत सरकारने जनगणना 2027 चा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर हिंगोली नगरपरिषदेने तयारीला वेग दिला आहे. याचाच एक भाग म्हणून आजपासून तीन दिवसीय विशेष प्रशिक्षणाला सुरुवात झाली. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा चार्ज ऑफिसर श्री. अरविंद मुंढे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे प्रशिक्षण सुरू झाले. या प्रशिक्षणात एकूण 85 प्रगणक व पर्यवेक्षक सहभागी झाले असून, पहिल्याच दिवशी सर्वांची 100 टक्के उपस्थिती नोंदवली गेली.

जनगणनेचा (Hingoli Census 2027) पहिला टप्पा, म्हणजेच घरांची यादी व घर गणना, 16 मे 2026 ते 14 जून 2026 या कालावधीत पार पडणार आहे. यासाठी फिल्ड ट्रेनर, पर्यवेक्षक व प्रगणक यांची नेमणूक करण्यात आली असून, त्यांना डिजिटल पद्धतीने जनगणना कशी करावी याचे सविस्तर प्रशिक्षण दिले जात आहे.

यंदाच्या जनगणनेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे नागरिकांना ‘स्वगणना’ म्हणजेच Self Enumeration ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांना दि. 1 मे 2026 ते 15 मे 2026 या कालावधीत http://se.census.gov.in या संकेतस्थळावर स्वतःची व कुटुंबाची माहिती भरता येणार आहे. मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांनी नागरिकांना या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. स्वगणना जनतेतूनच होणार असल्याने प्रगणक व पर्यवेक्षकांनी याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करावी, असेही त्यांनी सांगितले. कोणतेही घर गणनेपासून वगळले जाणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

आज सुरू झालेल्या प्रशिक्षणाला फिल्ड ट्रेनर श्री. सुनिल कांबळे, अण्णाजी मडावे, अनिल परसावळे, प्रमोद कांबळे तसेच नगर अभियंता प्रतिक नाईक, जनगणना विभाग प्रमुख सचिन पवार व इतर कर्मचारी उपस्थित होते. डिजिटल पद्धतीमुळे जनगणनेचे काम अधिक अचूक आणि जलद होण्यास मदत होणार असून, (Hingoli Census 2027) हिंगोलीत जनगणना 2027 यशस्वीपणे पार पाडली जाईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

संबंधित सामग्री

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली  येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

Oct 06, 2026
हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

Hingoli Lakshmi Life Care Hospital: हिंगोलीतील कपडा गल्ली येथे फटाका गोदामाला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या ६ रुग्णांवर लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटल, हिंगोली येथे डॉक्टर अखिल अग्रवाल

Oct 06, 2026
हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

Hingoli Firecracker Accident: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली परिसरात फटाक्यांच्या साठवणुकीच्या ठिकाणी लागलेली आग अत्यंत दुर्दैवी व गंभीर आहे. या दुर्घटनेत प्राथमिक माहितीनुसार दोन नागरिकांचा मृत्यू..

Oct 06, 2026
हिंगोली मारवाडी गल्लीतील भिषण आगीत फटाक्यांचा स्फोट, दोघांचा मृत्यू

हिंगोली मारवाडी गल्लीतील भिषण आगीत फटाक्यांचा स्फोट, दोघांचा मृत्यू

Hingoli firecracker explosion: शहरातील मारवाडी गल्ली भागामध्ये गोपाल बासटवार यांच्या घराला सोमवारी रात्री ७.४० च्या सुमारास लागलेल्या भिषण आगीत फटाक्याचा स्फोट होवुन काही जण जखमी झाल्याची घटना

Oct 06, 2026