हिंगोली वाटर कुलर

हिंगोली येथील संकटमोचन हनुमान मंदिरात वाटर कुलरचे लोकार्पण

Hingoli Water Cooler: हिंगोली येथील संकटमोचन हनुमान मंदिरात मंत्री परिवाराने थंड पाण्याचा वाटर कुलर लोकार्पण केला. सुविधा भाविकांसाठी उपलब्ध करून दिली गेली

हिंगोली येथील संकटमोचन हनुमान मंदिरात वाटर कुलरचे लोकार्पण

Hingoli Water Cooler

 

मंत्री परिवारातर्फे दर्शनार्थीं साठी सोय

हिंगोली (Hingoli Water Cooler) : श्री संकटमोचन हनुमान मंदिर मंडल, हिंगोली येथे स्व. कृष्णमुरारी गोविंदलाल मंत्री यांच्या कुटुंबीयांच्या वतीने भाविकांसाठी थंड पाण्याच्या वाटर कुलरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. आज 20 मे रोजी सायंकाळी 6.30 वाजता झालेल्या दैनंदिन आरतीनंतर या वाटर कुलरचे पूजन करून लोकार्पण करण्यात आले. 

मंत्री परिवाराच्या हस्ते आरती संपन्न झाल्यानंतर मंदिर परिसरात वाटर कुलरची विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी श्री संकटमोचन हनुमानजी मंदिर मंडळाचे सर्व सदस्य, पदाधिकारी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पूजाविधी पूर्ण झाल्यावर उपस्थित सर्व भाविकांना थंड पाण्याचे वाटप करण्यात आले. 

उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये. या उदात्त हेतूने मंत्री परिवाराने ही सुविधा उपलब्ध करून दिली. (Hingoli Water Cooler) मंदिर मंडळाने मंत्री परिवाराच्या या उपक्रमाचे स्वागत करून आभार मानले. दररोज सायंकाळी 6.30 वाजता होणाऱ्या दैनंदिन आरतीस सर्व भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मंदिर मंडळ हिंगोलीच्या वतीने करण्यात आले आहे.

संबंधित सामग्री

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली  येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

Oct 06, 2026
हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

Hingoli Lakshmi Life Care Hospital: हिंगोलीतील कपडा गल्ली येथे फटाका गोदामाला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या ६ रुग्णांवर लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटल, हिंगोली येथे डॉक्टर अखिल अग्रवाल

Oct 06, 2026
हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

Hingoli Firecracker Accident: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली परिसरात फटाक्यांच्या साठवणुकीच्या ठिकाणी लागलेली आग अत्यंत दुर्दैवी व गंभीर आहे. या दुर्घटनेत प्राथमिक माहितीनुसार दोन नागरिकांचा मृत्यू..

Oct 06, 2026
हिंगोली मारवाडी गल्लीतील भिषण आगीत फटाक्यांचा स्फोट, दोघांचा मृत्यू

हिंगोली मारवाडी गल्लीतील भिषण आगीत फटाक्यांचा स्फोट, दोघांचा मृत्यू

Hingoli firecracker explosion: शहरातील मारवाडी गल्ली भागामध्ये गोपाल बासटवार यांच्या घराला सोमवारी रात्री ७.४० च्या सुमारास लागलेल्या भिषण आगीत फटाक्याचा स्फोट होवुन काही जण जखमी झाल्याची घटना

Oct 06, 2026