हर घर तिरंगा-2026

हिंगोली नगरपरिषद तर्फे 'हर घर तिरंगा-2026 तिरंगा बाईक रॅली उत्साहात

Har Ghar Tricolor-2026: शासनाच्या 'हर घर तिरंगा-2026' मोहिमेअंतर्गत हिंगोली नगरपरिषदेच्या वतीने आज तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. 

हिंगोली नगरपरिषद तर्फे 'हर घर तिरंगा-2026 तिरंगा बाईक रॅली उत्साहात

Har Ghar Tricolor-2026

हिंगोली (Har Ghar Tricolor-2026) : शासनाच्या 'हर घर तिरंगा-2026' मोहिमेअंतर्गत हिंगोली नगरपरिषदेच्या वतीने आज तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले.  नगरपरिषद अध्यक्षा रेखा श्रीराम बांगर, उपाध्यक्ष माबुदभाई बागवान आणि मुख्याधिकारी श्रीमती प्रांजली मुंडे यांच्या मार्गदर्शना खाली ही रॅली काढण्यात आली. नगरपरिषद कार्यालयापासून सुरू झालेली ही रॅली अग्रसेन महाराज चौक, इंदिरा चौक, गांधी चौक, जवाहर रोड, पोस्ट ऑफिस रोड, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, जिल्हा परिषद शाळा या मार्गाने जात पुन्हा नगरपरिषद कार्यालय येथे समाप्त झाली. 

रॅलीत योग विद्याधामचे सदस्य तसेच शहरातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेत देशभक्तीचा उत्साह दाखवला. हातात तिरंगे घेऊन आणि देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

या (Har Ghar Tricolor-2026) रॅलीमध्ये नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी प्रकाश साबळे, स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर, कर व प्र.सेवा अधिकारी सचिन पवार, लेखाधिकारी स्वप्नील बोराटे, प्रभारी नगर अभियंता स्नेहल आवटे, संगणक अभियंता रामेश्वर चाटे, विद्युत अभियंता साहेब भुरके, रचना सहाय्यक गजानन काळे, स्वच्छता निरीक्षक आकाश देशमुख, विनय साहू, संदीप घुगे, शिवाजी घुगे, विजय रामेश्वरे, संजय दोडल, पंडित मस्के, संदीप गायकवाड, कैलास थिटे, विनोद शिंदे, एजाज पठाण, नितीन, प्रविण चव्हाण, पहिनकर, राजेश डहाळे, नागेश नरवाडे, मनोज बुर्से, दिनेश वर्मा, विजय शिखरे, सुरेश वाव्हळे, संजू गायकवाड, चित्रा वर्मा, अनुराधा बांगर, ललिता खंदारे, सुमन बनसोडे, पूर्वा मुदगल, शितल मुसळे, गजानन जगताप, गणेश बांगर, मनीष दराडे यांच्यासह नगरपरिषदेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

'हर घर तिरंगा' या (Har Ghar Tricolor-2026) अभियानाचा संदेश घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी अशी उपक्रम महत्त्वाचे आहेत, असे यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

संबंधित सामग्री

सार्वजनिक जीवनाला २५ वर्षे पूर्ण; ‘देशासमोर सत्ता सुख काहीही नाही’, पंतप्रधान मोदींची भावना

सार्वजनिक जीवनाला २५ वर्षे पूर्ण; ‘देशासमोर सत्ता सुख काहीही नाही’, पंतप्रधान मोदींची भावना

नरेंद्र मोदींच्या सार्वजनिक जीवनाला २५ वर्षे पूर्ण झाली. जनतेच्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी देशसेवा आणि ‘राष्ट्र प्रथम’चा दृष्टिकोन मांडला.

Oct 07, 2026
राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याविरोधात FIR; आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेशाचा आरोप

राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याविरोधात FIR; आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेशाचा आरोप

आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेश केल्याच्या आरोपावरून राहुल गांधी आणि प्रियंका गांधींसह विरोधी नेत्यांविरोधात दिल्ली पोलिसांनी FIR दाखल केला.

Oct 07, 2026
दसऱ्याआधी सोन्याच्या दरात मोठी घसरण; २४ कॅरेट सोने ₹१,४९,७०० वर

दसऱ्याआधी सोन्याच्या दरात मोठी घसरण; २४ कॅरेट सोने ₹१,४९,७०० वर

दसऱ्याआधी सोन्याच्या दरात घसरण झाली. २४ कॅरेट सोने ₹१,४९,७००, तर २२ आणि १८ कॅरेटचे दरही कमी झाले.

Oct 07, 2026
पंतप्रधान मोदींच्या २५ वर्षांच्या नेतृत्वाचा मंत्रिमंडळाकडून गौरव; ‘राष्ट्र प्रथम’च्या भूमिकेचा ठरावात उल्लेख

पंतप्रधान मोदींच्या २५ वर्षांच्या नेतृत्वाचा मंत्रिमंडळाकडून गौरव; ‘राष्ट्र प्रथम’च्या भूमिकेचा ठरावात उल्लेख

पंतप्रधान मोदींच्या २५ वर्षांच्या नेतृत्वाचा केंद्रीय मंत्रिमंडळाने गौरव केला. विकास, कल्याण, तंत्रज्ञान, सुरक्षा आणि जागतिक भूमिकेचा ठरावात उल्लेख.

Oct 07, 2026
आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर ज्ञानेश कुमारांचा दौरा स्थगित; आता राजीनामा देणार?

आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर ज्ञानेश कुमारांचा दौरा स्थगित; आता राजीनामा देणार?

ज्ञानेश कुमार यांचा छत्तीसगड दौरा स्थगित झाला असून त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Oct 07, 2026