हिंगोली कबड्डी स्पर्धा

हिंगोलीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मुलींच्या भव्य कबड्डी स्पर्धेचे थाटात उद्घाटन

Hingoli Kabaddi Tournament: हिंगोलीत डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित कबड्डी स्पर्धेत अनेक स्थानिक संघांनी भाग घेतला. स्पर्धेचे उद्घाटन आमदार संतोष बांगर यांच्या शुभहस्ते झाले.

हिंगोलीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मुलींच्या भव्य कबड्डी स्पर्धेचे थाटात उद्घाटन

हिंगोली (Hingoli Kabaddi Tournament) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधून हिंगोली जिल्हा हौशी सायकलिंग असोसिएशन व बहुजन क्रिडा शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर मुलींच्या भव्य दिव्य दणदणीत कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन रविवार,  १९ एप्रिल  रोजी सकाळी १० वा. आमदार संतोष बांगर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. 

यावेळी माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, युवा सेना जिल्हा प्रमुख राम कदम, शिवाजी इंगोले सर, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त प्रा. बंकटलाल यादव, दत्तराव बांगर, गजानन आडे यांच्यासह जिल्ह्यातील अनेक क्रीडा शिक्षक, पदाधिकारी व क्रीडाप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Hingoli Kabaddi Tournament) हिंगोली जिल्हा मर्यादित ५५ किलो आतील वजनी गटासाठी आयोजित या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील विविध शाळा व क्रीडा मंडळांच्या मुलींच्या संघांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे. सकाळच्या सत्रापासूनच मैदानावर खेळाडूंचा उत्साह व चुरशीचे सामने पहायला मिळाले. स्पर्धेसाठी आयोजकांनी विजेत्या संघांसाठी आकर्षक रोख बक्षिसे जाहीर केली आहेत. 

- प्रथम बक्षीस: ११,१३५/- रुपये - मा. नगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्यातर्फे
- द्वितीय बक्षीस: ७,१३५/- रुपये - जगजितजी खुराणा यांच्यातर्फे  
- तृतीय बक्षीस: ५,१३५/- रुपये - अनिल नेनवाणी यांच्यातर्फे
- चौथे बक्षीस: ३,१३५/- रुपये - प्रा. बंकट नंदलाल यादव यांच्यातर्फे
- पाचवे बक्षीस: २,१३५/- रुपये - मिलिंद कवाणे यांच्यातर्फे
- सहावे बक्षीस: १,१३५/- रुपये - प्रकाश नारायण हलगे यांच्यातर्फे

याशिवाय ७ ते १६ क्रमांकाच्या संघांना प्रत्येकी १०००/- रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. उद्घाटनप्रसंगी बोलताना आमदार संतोष बांगर म्हणाले, "डॉ. बाबासाहेबांनी दिलेला 'शिका, संघटित व्हा, संघर्ष करा' हा मंत्र मुलींनी क्रीडा क्षेत्रातही आत्मसात करावा. अशा स्पर्धांमधून ग्रामीण भागातील मुलींना हक्काचे व्यासपीठ मिळते असे सांगितले.  स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शिवाजी इंगोले , रामदास हनुमंते , गजानन आडे व इतर पदाधिकारी परिश्रम घेत आहेत. दिवसभर रंगणाऱ्या या सामन्यांसाठी क्रीडाप्रेमींनी मोठी गर्दी केली आहे.

संबंधित सामग्री

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली  येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

Oct 06, 2026
हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

Hingoli Lakshmi Life Care Hospital: हिंगोलीतील कपडा गल्ली येथे फटाका गोदामाला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या ६ रुग्णांवर लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटल, हिंगोली येथे डॉक्टर अखिल अग्रवाल

Oct 06, 2026
हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

Hingoli Firecracker Accident: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली परिसरात फटाक्यांच्या साठवणुकीच्या ठिकाणी लागलेली आग अत्यंत दुर्दैवी व गंभीर आहे. या दुर्घटनेत प्राथमिक माहितीनुसार दोन नागरिकांचा मृत्यू..

Oct 06, 2026
हिंगोली मारवाडी गल्लीतील भिषण आगीत फटाक्यांचा स्फोट, दोघांचा मृत्यू

हिंगोली मारवाडी गल्लीतील भिषण आगीत फटाक्यांचा स्फोट, दोघांचा मृत्यू

Hingoli firecracker explosion: शहरातील मारवाडी गल्ली भागामध्ये गोपाल बासटवार यांच्या घराला सोमवारी रात्री ७.४० च्या सुमारास लागलेल्या भिषण आगीत फटाक्याचा स्फोट होवुन काही जण जखमी झाल्याची घटना

Oct 06, 2026