हिंगोली अवैध रेती

हिंगोलीत अवैध रेतीचे टिप्पर पकडले; गुन्हा दाखल

Hingoli illegal sand : ३ ऑगस्टच्या अखेरच्या उमेद्वारीत अप्पर पोलिस अधिक्सक्षक कमलेश मीनाच्या कारभाराखाली कामगिरी करून हिंगोलीच्या एका पथकाने इंदिरा नगरातील टिप्परवर अवैध रेतीचा ठोका

हिंगोलीत अवैध रेतीचे टिप्पर पकडले; गुन्हा दाखल

Hingoli illegal sand

 

अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्या पथकाची कामगिरी

हिंगोली (Hingoli illegal sand) : शहरामध्ये अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना यांच्या कार्यालयातून पथकाने नांदेड नाक्यावर अवैध रेतीसह टिप्पर पकडून हिंगोली शहर पोलिसात गुन्हा दाखल केला. ३ ऑगस्टला पहाटे ५ च्या सुमारास नांदेड नाक्यावर अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना यांच्या कार्यालयातील संदिप पवार, अर्जुन यादव, सतिश नरवाडे, जगन पवार  यांच्या पथकाने हिंगोली शहरातील इंदिरा नगर भागात जात असताना एका पिवळया रंगाचे टिप्पर पकडले.

हे टिप्पर रूपूर येथून अवैध रेती भरून चोरटी विक्री करण्याकरीता येत होते. कर्मचार्‍यांनी चालकाचे नाव विचारले असता शेख असलम शेख सलाम रा. रोहीदास वार्ड वाशिम असे सांगितले. या टिप्परमध्ये अवैध रेती मिळून आली. या प्रकरणी हिंगोली शहर पोलिसात अर्जुन यादव यांच्या फिर्यादीवरून शेख असलम शेख सलाम याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत १२ लाख १२ हजार ५०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिस अधिक्षक डॉ. श्रेणिक लोढा, अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

संबंधित सामग्री

पाणी बचतीचे नियम शेतकऱ्यांसाठीच का?; खडकपूर्णा प्रकल्पातील अवैध रेती उपशाच्या बोटी बंद करा!

पाणी बचतीचे नियम शेतकऱ्यांसाठीच का?; खडकपूर्णा प्रकल्पातील अवैध रेती उपशाच्या बोटी बंद करा!

Khadakpurna Project Illegal sand dumping: जिल्ह्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली असताना खडकपूर्णा प्रकल्पातील पाण्याच्या वापराबाबत प्रशासनाकडून कडक उपाययोजना केल्या जात आहेत.

Oct 06, 2026
जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण का करतो म्हणत शिवीगाळ, मारहाण 

जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण का करतो म्हणत शिवीगाळ, मारहाण 

Hingoli Police Crime Case: तू आमच्या विरोधात उपोषण का करतो या कारणावरून शिवीगाळ करून थापडा-बुक्क्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद

Oct 01, 2026
परभणीतील एका तहसील आवारातील जप्त रेती उपसा बोटीवर कटर!

परभणीतील एका तहसील आवारातील जप्त रेती उपसा बोटीवर कटर!

Parbhani Illegal sand extraction: अवैध रेती उपशाविरोधातील कारवाईत जप्त केलेल्या रेती उपसा बोटीचे लोखंडी पाइप कटरच्या साहाय्याने कापून अवजड साहित्य बोलेरो वाहनातून नेल्याचा प्रकार

Sep 29, 2026
अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर पोलिसांच्या ताब्यात; ७.०५ लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर पोलिसांच्या ताब्यात; ७.०५ लाखांचा मुद्देमाल जप्त

Illegal sand transportation: तालुक्यातील इंद्राळ येथे विनापरवाना वाळू उत्खनन करून चोरटी वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर देवणी पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत ट्रॅक्टर व ट्रॉलीतील अंदाजे एक ब्रास वाळू

Sep 28, 2026