हिंगोली नाले सफाई

हिंगोलीत नाले सफाईचे पितळ पडले उघड, जलेश्वर तलावात जाणार्‍या पाण्यावर कचराच कचरा

Hingoli Drains Cleaning: हिंगोलीतील नाल्यांचा संपूर्ण सफाई केल्यानंतरही कचरा जलेश्वर तलावात सीधं प्रवाहतो, घरगुती अवशेष पिशव्या, थर्माकॉल इत्यादी दूषित करत आहे.

हिंगोलीत नाले सफाईचे पितळ पडले उघड, जलेश्वर तलावात जाणार्‍या पाण्यावर कचराच कचरा

Hingoli Drains Cleaning

हिंगोली (Hingoli Drains Cleaning) : पावसाळ्यापूर्वी मोठ्या गाजावाजात करण्यात आलेल्या नाला सफाई मोहिमेची हवा निघाली आहे. हिंगोली शहरातील प्रसिद्ध जलेश्वर तलावाकडे जाणार्‍या मुख्य नाल्याची अवस्था पाहता प्रशासनाच्या दाव्यांची पोलखोल झाली आहे. सध्या या नाल्यातून जाणार्‍या पाण्यावर जागोजागी कचराच कचरा तरंगताना दिसत आहे.

गेल्या काही दिवसांपासून होणार्‍या पावसामुळे नाल्यातील पाण्याचा प्रवाह वाढला आहे. मात्र हा प्रवाह स्वच्छ पाण्याचा नसून प्लास्टिक बाटल्या, पिशव्या, थर्माकोल, घरगुती कचरा आणि गाळाने भरलेला आहे. नाल्याच्या संपूर्ण पृष्ठभागावर कचर्‍याचा जाड थर साचला असून त्यामुळे पाणी पुढे जाण्यास अडथळा होत आहे. याच कचर्‍यासह सर्व घाण थेट जलेश्वर तलावात मिसळत आहे. नगर परिषदेकडून एप्रिल आणि मे महिन्यात नाले सफाईसाठी लाखो रुपये खर्च झाल्याचा दावा करण्यात आला होता.

जेसीबी आणि मजुरांद्वारे सफाई करण्यात आली होती. परंतु प्रत्यक्षात जलेश्वर तलावाकडे जाणार्‍या या महत्वाच्या नाल्याकडे कोणीही फिरकले नसल्याचे चित्र आहे. कागदावर सफाई झाली, परंतु प्रत्यक्षात एकही टन कचरा उचलला गेला नाही हे आता स्पष्ट झाले आहे. जलेश्वर तलाव हे शहराचे भूषण असून धार्मिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. अशा तलावात जर नाल्यातील सर्व कचरा आणि सांडपाणी सोडले गेले तर तलावाचे पाणी दूषित होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे तलावाच्या परिसरात दुर्गंधी पसरली आहे आणि डासांचा प्रादुर्भाव देखील वाढला आहे. स्थानिक नागरिकांनी याबाबत प्रशासनाला वारंवार निवेदन दिले होते. मात्र तरीही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही.

आता पावसाळा सुरू झाल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. येत्या काही दिवसात जर जोराचा पाऊस झाला तर हा सर्व कचरा एकाच वेळी तलावात जाऊन तलावाची पूर्ण वाट लागेल अशी भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने या नाल्यातील कचरा उचलून जळेश्वर तलाव वाचवावा अशी मागणी हिंगोलीतील नागरिक करत आहेत. अन्यथा पावसाळ्यापूर्वी नाले सफाई केली असे सांगणार्‍या अधिकार्‍यांना नागरिकांचा रोष सहन करावा लागेल.

संबंधित सामग्री

नळातून मीटरभराचा नाळू; कोरचीच्या ‘शुद्ध पाण्या’च्या दाव्याला धक्का!

नळातून मीटरभराचा नाळू; कोरचीच्या ‘शुद्ध पाण्या’च्या दाव्याला धक्का!

कोरचीच्या वार्ड क्रमांक १६ मध्ये नगरपंचायतीच्या नळातून मीटरभराचा नाळू निघाल्याचा प्रकार समोर आला असून, पाणीपुरवठ्याच्या स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Sep 24, 2026
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक- ३६१वरील भाटेगाव कालव्यावरील वळणावर पुन्हा अपघात

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक- ३६१वरील भाटेगाव कालव्यावरील वळणावर पुन्हा अपघात

National Highway Accident: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वरील अपघाताची मालिका सुरूच असताना जिल्हा प्रशासकीय यंत्रणा अद्यापही कुंभकर्णी झोपेमध्येच दिसून येत आहे.

Aug 31, 2026
घाणीच्या ठिकाणी चिखली नगराध्यक्षांचा २ तास ठिय्या; ‘स्वच्छ चिखली, सुंदर चिखली’साठी थेट पुढाकार

घाणीच्या ठिकाणी चिखली नगराध्यक्षांचा २ तास ठिय्या; ‘स्वच्छ चिखली, सुंदर चिखली’साठी थेट पुढाकार

Chikhali Mayor Andolan: स्वच्छ चिखली, सुंदर चिखली’चा संकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी चिखली नगरपालिकेचे नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांनी रविवारी (२३ ऑगस्ट) एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले.

Aug 23, 2026
लातूर महापालिकेतील काम बंद आंदोलन स्थगित!

लातूर महापालिकेतील काम बंद आंदोलन स्थगित!

Latur Municipal Protest: लातूर महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त देविदास जाधव यांच्या कक्षामध्ये पालिका नगररचना विभागाचे प्रमुख अक्षय तळदकर यांना झालेल्या कथित मारहाणीच्या निषेधार्थ

Aug 19, 2026
मूलभूत सुविधा पुरविण्या चे मागणीसाठी ढोल बजाओ आंदोलन

मूलभूत सुविधा पुरविण्या चे मागणीसाठी ढोल बजाओ आंदोलन

Dhol Bajao Andolan : शहरातील वाढती अस्वच्छता, अनियमित पाणीपुरवठा, बंद पथदिवे, कचरा व्यवस्थापनाचा अभाव आणि बंद पडलेल्या उद्यानांच्या प्रश्नांकडे नगरपरिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी समस्त कळमनुरी शहर..

Aug 13, 2026