Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

चिखली स्वच्छता आंदोलन

घाणीच्या ठिकाणी चिखली नगराध्यक्षांचा २ तास ठिय्या; ‘स्वच्छ चिखली, सुंदर चिखली’साठी थेट पुढाकार

Chikhali Mayor Andolan: स्वच्छ चिखली, सुंदर चिखली’चा संकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी चिखली नगरपालिकेचे नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांनी रविवारी (२३ ऑगस्ट) एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले.


घाणीच्या ठिकाणी चिखली नगराध्यक्षांचा २ तास ठिय्या ‘स्वच्छ चिखली सुंदर चिखली’साठी थेट पुढाकार

Chikhali Mayor Andolan |

चिखली (Chikhali Mayor Andolan) : स्वच्छ चिखली, सुंदर चिखली’चा संकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी चिखली नगरपालिकेचे नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांनी रविवारी (२३ ऑगस्ट) एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले. पालिका प्रशासनाकडून वारंवार आवाहन करूनही जामुवंती नदीच्या पुलाजवळ नागरिकांकडून कचरा टाकला जात असल्याने, अखेर नगराध्यक्षांनी स्वतः घाणीच्या ठिकाणी खुर्ची टाकून सुमारे दोन तास ठिय्या मांडला आणि कचरा टाकणाऱ्या नागरिकांना जाब विचारत कचरा न टाकण्याचे आवाहन केले. चिखलीच्या इतिहासात लोकप्रतिनिधीने स्वतः कचऱ्याच्या ठिकाणी बसून असा पहारा देण्याची ही पहिलीच घटना मानली जात आहे.

​वाहतुकीचा मुख्य मार्ग अन् कचऱ्याचा विळखा

चिखली शहरातून जुन्या गावाकडून जुना बुलढाणा रस्ता आणि बायपास रस्ता हा जामुवंती नदीवरील मोठ्या पुलावरून जातो. या परिसरात MSEB चे कार्यालय असून हा मार्ग साकेगाव व अनुराधा कॅम्पसकडे, बुलढाणा कडे जातो. त्यामुळे ग्रामीण व शहरातील नागरिक, नोकरदार आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांची येथे नेहमीच मोठी वर्दळ असते. नगरपालिकेने पुलावरून  नदी पात्रात व परिसरात कचरा टाकू नये म्हणून सुरक्षा कठडे उभारले आहेत आणि शहरात रोज घंटागाड्यांमार्फत कचरा संकलनही केले जाते. तरीही काही नागरिक दुचाकी, ऑटो व इतर वाहनांमधून कचरा आणून या भागात टाकत असल्याने परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरून आरोग्य धोक्यात आले होते.

​सायंकाळी ५:१५ ते ७:१५ वाजेपर्यंत ठिय्या

शहराच्या स्वच्छतेला नख लावणाऱ्या या  बाबी सोबतच नागरिक व विद्यार्थ्यांच्या आरोग्याची ही गंभीर बाब लक्षात घेऊन नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांनी रविवारी सायंकाळी ५:१५ ते ७:१५ वाजेदरम्यान थेट पुलावरील कचऱ्याच्या ठिकाणी खुर्ची टाकून ठिय्या मांडला.

​"शहरात घंटागाडी नियमित फिरत असताना नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये. शहराच्या स्वच्छता आणि सौंदर्यासाठी केवळ पालिका प्रशासन पुरेसे नसून नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे. नागरिकांनी आता तरी जागे होऊन सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे बंद करावे, यासाठीच मी येथे  बसलो आहे."यातून तरी नागरिकांनी बोध घ्यावा आसी उद्दीग्न प्रतिक्रिया देशमुख यांनी यावेळी  दिली.
-पंडितराव देशमुख, नगराध्यक्ष, चिखली

​कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

विशेष म्हणजे नगराध्यक्ष स्वतः बसलेले असतानाही काही नागरिकांनी तेथे कचरा टाकण्याचा प्रयत्न केला. पालिका कर्मचाऱ्यांनी अशा व्यक्तींना तात्काळ पकडून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. नगराध्यक्षांच्या या आक्रमक भूमिकेमुळे आतातरी नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत गांभीर्य निर्माण होऊन सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे बंद होणार का, याकडे चिखलीकरांचे लक्ष लागले आहे.