हिंगोली बस स्थानक

हिंगोली बस स्थानकात ऑटोचालकांची दादागिरी, बसचालक- वाहक त्रस्त 

Hingoli Bus Station: हिंगोली बस स्थानकात ऑटोचालकांच्या मनमानीमुळे बसचालक व वाहकांना अडचणी उद्भवल्या आहेत. नियम धाब्यावर बसवत असलेल्या ऑटोचालकांविरुद्ध कारवाईची मागणी उठली आहे.

हिंगोली बस स्थानकात ऑटोचालकांची दादागिरी, बसचालक- वाहक त्रस्त 

Hingoli Bus Station

हिंगोली (Hingoli Bus Station) : हिंगोली शहरातील मध्यवर्ती बस स्थानकात ऑटोचालकांच्या मनमानी कारभारामुळे बसचालक व वाहक अक्षरशः हैराण झाले आहेत. बस स्थानकाच्या आवारात प्रवाशांना घेण्यासाठी ऑटोचालक थेट बसच्या दारापर्यंत ऑटो आणत असल्याने दररोज गोंधळाची स्थिती निर्माण होत आहे. 

प्राप्त माहितीनुसार, हिंगोली आगारात एखादी बस फलाटावर येताच ,3- 4 ऑटो चालक वेगाने बसच्या मागे-पुढे ऑटो लावतात. प्रवासी उतरताच त्यांच्या सामानासाठी ओढाताण केली जाते. यामुळे वृद्ध, महिला व लहान मुलांना धक्काबुक्कीचा सामना करावा लागतो. अनेकदा बस व ऑटोचालकांमध्ये शाब्दिक चकमकीही होतात. 
 
बसस्थानक (Hingoli Bus Statio)n हे एसटी महामंडळाच्या अखत्यारीतील क्षेत्र आहे. येथे खाजगी वाहनांना प्रवेशबंदी असतानाही ऑटोचालक सर्रास नियम धाब्यावर बसवत आहेत. अरुंद फलाटावर बस, प्रवासी आणि ऑटोंची गर्दी होत असल्याने कधीही मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. गेल्या आठवड्यात एका ज्येष्ठ नागरिकाला ऑटोची धडक बसता-बसता वाचली होती. 

बस फलाटावर लावायच्या आधीच ऑटोवाले घेराव घालतात. हॉर्न वाजवला तरी बाजूला होत नाहीत. वेळेवर बस काढता येत नाही. वरिष्ठांना सांगूनही कारवाई होत नाही,” असे नाव न सांगण्याच्या अटीवर एका वाहकाने सांगितले. प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याने चालकांमध्येही नाराजी आहे. या (Hingoli Bus Station) प्रकाराकडे आगार प्रशासन व वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप प्रवाशांकडून होत आहे. बसस्थानकात सुरक्षा रक्षक असूनही ऑटोचालकांवर नियंत्रण नाही. फलाट क्रमांक 1 व 2 वर तर कायमच ऑटोंचा वेढा असतो. 

बसस्थानक परिसरात ‘नो पार्किंग झोन’चे फलक लावावेत, ऑटोसाठी स्वतंत्र थांबा निश्चित करावा व नियम मोडणाऱ्या ऑटोचालकांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी प्रवासी संघटनांनी केली आहे. आगार प्रमुखांनी तातडीने बैठक घेऊन वाहतूक पोलिसांच्या मदतीने हा प्रश्न सोडवावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा बसचालक-वाहक संघटनेने दिला आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने तात्काळ पावले उचलणे गरजेचे आहे, अन्यथा बसस्थानकातील ही दादागिरी एखाद्या मोठ्या दुर्घटनेला कारणीभूत ठरू शकते.

संबंधित सामग्री

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली  येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

Oct 06, 2026
हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

Hingoli Lakshmi Life Care Hospital: हिंगोलीतील कपडा गल्ली येथे फटाका गोदामाला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या ६ रुग्णांवर लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटल, हिंगोली येथे डॉक्टर अखिल अग्रवाल

Oct 06, 2026
हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

Hingoli Firecracker Accident: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली परिसरात फटाक्यांच्या साठवणुकीच्या ठिकाणी लागलेली आग अत्यंत दुर्दैवी व गंभीर आहे. या दुर्घटनेत प्राथमिक माहितीनुसार दोन नागरिकांचा मृत्यू..

Oct 06, 2026
हिंगोली मारवाडी गल्लीतील भिषण आगीत फटाक्यांचा स्फोट, दोघांचा मृत्यू

हिंगोली मारवाडी गल्लीतील भिषण आगीत फटाक्यांचा स्फोट, दोघांचा मृत्यू

Hingoli firecracker explosion: शहरातील मारवाडी गल्ली भागामध्ये गोपाल बासटवार यांच्या घराला सोमवारी रात्री ७.४० च्या सुमारास लागलेल्या भिषण आगीत फटाक्याचा स्फोट होवुन काही जण जखमी झाल्याची घटना

Oct 06, 2026