रिसोड तहसील कार्यालयाचे 'समाधान शिबीर': एकाच छताखाली मिळणार सर्व शासकीय योजनांचा लाभ

रिसोड तहसील कार्यालयाचे 'समाधान शिबीर': एकाच छताखाली मिळणार सर्व शासकीय योजनांचा लाभ

Government Schemes

रिसोड (Government Schemes) : सामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांच्या तक्रारींचा निपटारा स्थानिक पातळीवर व्हावा आणि त्यांना विविध शासकीय योजनांची माहिती एकाच ठिकाणी मिळावी, या उद्देशाने रिसोड तहसील कार्यालयाच्या वतीने ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराचे’ आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी केले आहे.

प्रमुख सेवा आणि योजनांचा समावेश

या शिबिरामध्ये विविध सरकारी विभागांचे स्टॉल्स असून खालील सेवा तत्काळ उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत —
पीएम किसान लँड सिडिंग, नैसर्गिक आपत्ती ई-केवायसी, डिजिटल ७/१२ व फेरफार वाटप, अ‍ॅग्रीस्टॅक फार्मर आयडी, पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांना घरासाठी ५ ब्रास मोफत वाळू मंजुरी, नवीन आधार नोंदणी, मतदार कार्ड-आधार लिंकिंग, रेशन कार्ड दुरुस्ती आणि विविध शासकीय दाखले.

आरोग्य सेवा

आभा (ABHA) कार्ड, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, मोफत आरोग्य तपासणी व लसीकरण, तसेच संजय गांधी निराधार योजनेचे प्रलंबित अर्ज आणि जॉबकार्ड वितरण यांचा समावेश आहे.

शासनाचे महत्त्वपूर्ण निर्णय व मार्गदर्शन

या शिबिरात शासनाने घेतलेल्या नव्या निर्णयांची सविस्तर माहिती दिली जाणार आहे. जमिनीच्या अकृषिक वापरासाठी आता वारंवार परवानगीची गरज नाही; केवळ एकदाच रूपांतरण शुल्क भरून काम होणार असून वार्षिक करही रद्द करण्यात आला आहे. तसेच जुन्या खरेदी-विक्री व्यवहारांमधील तांत्रिक त्रुटी आता अतिरिक्त दंड न भरता नियमित करता येणार आहेत.

पाणंद रस्ते योजना

‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना’ अंतर्गत शेतरस्ते पक्के करून शेतकऱ्यांची वाहतूक व्यवस्था सुलभ करण्यात येणार आहे.

तहसीलदारांचे आवाहन

“नागरिकांना आपल्या कामासाठी विविध कार्यालयांत चकरा माराव्या लागू नयेत, यासाठी हे शिबीर आयोजित केले आहे. कृषी, महसूल, आरोग्य आणि ग्रामविकास विभागाशी संबंधित सर्व कामे या ठिकाणी मार्गी लावली जातील. तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा.”
— प्रतीक्षा तेजनकर, तहसीलदार, रिसोड

संबंधित सामग्री

रिसोड तहसील कार्यालयाचा उपक्रम: महसूल लोक अदालतीतून ८ शेतरस्त्यांचे वाद सामंजस्याने निकाली

रिसोड तहसील कार्यालयाचा उपक्रम: महसूल लोक अदालतीतून ८ शेतरस्त्यांचे वाद सामंजस्याने निकाली

Risod Revenue Lok Adalat: शेतात ये-जा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या शेतरस्त्यांचे प्रलंबित वाद 'महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियाना'अंतर्गत रिसोड तहसील कार्यालयात सामंजस्य

Oct 06, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

अलनिनोच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात जलसंकटाची शक्यता; 16 ऑक्टोबरपासून 10% पाणीकपात आणि धरणांमध्ये 10% आपत्कालीन बफर साठा.

Oct 05, 2026
महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

राज्यात तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; संजय खंदारे वन विभागात, संजय यादव पर्यटन विभागात तर वैष्णवी बी. नागपूरच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्त.

Oct 05, 2026
रिसोड तालुक्यात दुष्काळी सावटाखाली पीक पंचनामे युद्धपातळीवर सुरू

रिसोड तालुक्यात दुष्काळी सावटाखाली पीक पंचनामे युद्धपातळीवर सुरू

Risod Taluka Drought: यंदाच्या खरीप हंगामात पावसाच्या अनियमिततेमुळे रिसोड तालुक्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, महसूल प्रशासनाने नुकसानीच्या पीक पंचनाम्यांना गती दिली आहे.

Oct 05, 2026