सेनगाव (Short Circuit Fire) : सेनगाव तालुक्यातील दाताडा बुद्रुक येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत शेतकऱ्याच्या गोठ्याचे मोठे नुकसान झाल्याची घटना शनिवारी दि. १८ मार्चला दुपारी उघडकीस आली. या (Short Circuit Fire) आगीत शेतीपयोगी साहित्य जळून खाक झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून तात्काळ पंचनामा करून नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दाताडा बुद्रुक येथील शेतकरी साहेबराव देविदास गायकवाड यांच्या आजेगाव शिवारातील शेतातील गोठ्याला दुपारी सुमारे ३ ते ४ वाजण्याच्या दरम्यान शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, (Short Circuit Fire) आगीची तीव्रता मोठी असल्याने गोठ्यातील बहुतांश साहित्य जळून खाक झाले.
या (Short Circuit Fire) आगीत तुषार सिंचन संच, टिन पत्रे, विविध शेती अवजारे, फवारणी पंप, डायनामा इंजिन तसेच जनावरांचा चारा आदी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या घटनेत सुमारे दीड ते दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आधीच निसर्गाच्या लहरीपणामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांवर या घटनेने दुहेरी संकट कोसळले आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करावा आणि शेतकऱ्याला त्वरित आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी ग्रामस्थ व शेतकरीवर्गातून होत आहे.
शॉर्टसर्किटने पेटला गोठा; दाताडा बुद्रुकमध्ये शेतकऱ्याचे सुमारे २ लाखांचे नुकसान
Short Circuit Fire: सेनगाव तालुक्यातील दाताडा बुद्रुकमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागून शेतकऱ्याच्या गोठ्याचे सुमारे २ लाखांचे नुकसान झाले. ग्रामस्थांची मदतीची मागणी.
Short Circuit Fire
संबंधित सामग्री
हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी
Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.
उसाला प्रति टन ५ हजाराचा भाव द्या : शेतकरी संघटना
Latur Farmers' Organization: गाळप हंगामामध्ये किमान पाच हजार रुपयांचा ऊस दर प्रति मॅट्रिक टन देण्यात यावा, अशी एकमुखी मागणी सर्व शेतकरी संघटनांनी केली. तर मांजरा परिवाराने प्रत्येक गाळप हंगाम..
फटाक्यांचा अवैध साठा व विक्री करू नका; पोलिस प्रशासनाचे व्यापार्यांना आवाहन
Illegal firecracker stockpile: हिंगोली शहरातील कपडा गल्ली येथे फटाक्याच्या गोदामाला आग लागून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कळमनुरी पोलीस स्टेशनकडून जाहीर सूचना जारी करण्यात आली आहे.
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग
Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.
हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ
Hingoli Firecracker Accident: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली परिसरात फटाक्यांच्या साठवणुकीच्या ठिकाणी लागलेली आग अत्यंत दुर्दैवी व गंभीर आहे. या दुर्घटनेत प्राथमिक माहितीनुसार दोन नागरिकांचा मृत्यू..