घोटला न्याय कधी..? ४० वर्षांपासून प्रतीक्षेत घोट तालुका; अन्यायाविरोधात संतापाची लाट

जिल्ह्याच्या केंद्रस्थानी व भौगोलिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या घोट परिसराला तालुक्याचा दर्जा मिळावा, ही मागणी तब्बल चाळीस वर्षांपासून प्रलंबित आहे.

घोटला न्याय कधी..? ४० वर्षांपासून प्रतीक्षेत घोट तालुका; अन्यायाविरोधात संतापाची लाट

Ghot Taluka Demand

घोट (Ghot Taluka Demand) : जिल्ह्याच्या केंद्रस्थानी व भौगोलिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या घोट परिसराला तालुक्याचा दर्जा मिळावा, ही मागणी तब्बल चाळीस वर्षांपासून प्रलंबित आहे. 1989 व 1991 मध्ये या मागणीसाठी भव्य मोर्चे काढण्यात आले होते. मात्र तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या कार्यकाळात घोटचा विचार न करता इतर ठिकाणी नवीन तालुका जाहीर करण्यात आल्याने घोट परिसरावर अन्याय झाल्याची भावना नागरिकांमध्ये आजही कायम आहे.

त्यानंतरच्या काळातही घोट तालुक्यासाठी सातत्याने चाळीस वर्षात  महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले मनोहर जोशी ते देवेंद्र फडणवीस सर्वांना भेटी घेऊन व  मोर्चे, आंदोलने,बाजारपेठ बंद, निवेदन सादरीकरण असे विविध मार्गांनी लढा उभारण्यात आला.परंतु चार दशकांनंतरही हा प्रश्न मार्गी लागलेला नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व संतापाची लाट पसरली आहे.

मागील आठवड्यात झालेल्या बैठकीत प्रशासनाने न्याय न दिल्यास मोठ्या जनआंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच घोट परिसरातील आदिवासी व दुर्गम भागाचा विचार करून स्वतंत्र तालुका घोषित करावा,अशी एकमुखी मागणी करण्यात आली.

घोट तालुक्यासाठी 19 ग्रामपंचायतींनी ठराव मंजूर करून  घोट, पेटतळा, सिमुलतला,भाडभिडी बी, हळदवाही, मक्केपल्ली चेक, मक्केपल्ली माल, माडेआमगाव,रेगडी, विकासल्ली,चापलवाडा, वरूर,नेताजीनगर,वसंतपुर, बहादुरपुर,सुभाषग्राम, येडानुर,राममोहनपुर, पावीमुरांडा आदी ग्रामपंचायतीच्या पाठिंबा दर्शविला असून, या ग्रामपंचायत मध्ये अनेक गावे आदिवासी व पेसा क्षेत्रातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात घोट तालुक्यासाठी ठराव पारित केले असून  प्रशासन महाराष्ट्र शासनानेया ठरावांची दखल घेऊन तातडीने घोट तालुक्याच्या निर्णय घेऊन   घोट तालुकाच्या मार्ग सुकर करावा अशी अपेक्षा जनसामान्य नागरिकात केली जात आहे.

संबंधित सामग्री

स्टेअरिंग लॉक झाल्याने बस पलटली; ३८ प्रवासी जखमी, गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील घटना

स्टेअरिंग लॉक झाल्याने बस पलटली; ३८ प्रवासी जखमी, गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील घटना

गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील शिवणी गावाजवळ एसटी बस पलटली.

Sep 18, 2026
गडचिरोलीत स्कार्पिओमध्ये वैद्यकीय महाविद्यालयातील कर्मचाऱ्याचा मृतदेह; मृत्यूचे गूढ कायम

गडचिरोलीत स्कार्पिओमध्ये वैद्यकीय महाविद्यालयातील कर्मचाऱ्याचा मृतदेह; मृत्यूचे गूढ कायम

स्कार्पिओ वाहनात वैद्यकीय महाविद्यालयात सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत असलेले केतन पोचमपल्लीवार मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली.

Sep 06, 2026
गडचिरोलीत पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के; सिरोंच्यात ३.६ तीव्रतेची नोंद

गडचिरोलीत पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के; सिरोंच्यात ३.६ तीव्रतेची नोंद

गडचिरोली जिल्ह्यात गुरुवारी (दि. ३ सप्टेंबर) पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास ३.६ तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली.

Sep 03, 2026
कोरचीतील रस्ते खड्डेमय; ३ कोटींच्या निधीच्या ‘तुकड्यां’वर सवाल!

कोरचीतील रस्ते खड्डेमय; ३ कोटींच्या निधीच्या ‘तुकड्यां’वर सवाल!

नगरपंचायतीचा दर्जा मिळून दशक पूर्ण होण्याच्या मार्गावर असतानाही कोरची शहरातील रस्त्यांची अवस्था मात्र दिवसेंदिवस बिकट होत आहे.

Aug 27, 2026
प्रसूतीसाठी रेफर केल्यानंतर २१ वर्षीय मातेचा बाळासह मृत्यू; चामोर्शी रुग्णालयावर उपचारात दिरंगाईचे आरोप

प्रसूतीसाठी रेफर केल्यानंतर २१ वर्षीय मातेचा बाळासह मृत्यू; चामोर्शी रुग्णालयावर उपचारात दिरंगाईचे आरोप

चामोर्शी तालुक्यातील जामगिरी येथील २१ वर्षीय गर्भवती महिलेचा आणि तिच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

Aug 24, 2026