ST Bus Accident

स्टेअरिंग लॉक झाल्याने बस पलटली; ३८ प्रवासी जखमी, गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील घटना

गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील शिवणी गावाजवळ एसटी बस पलटली.

स्टेअरिंग लॉक झाल्याने बस पलटली; ३८ प्रवासी जखमी, गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील घटना

ST Bus Accident

शिवणी गावाजवळ MH 06 8848 क्रमांकाची बस पलटी; 29 प्रवाशांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्याच्या हालचाली

गडचिरोली : गडचिरोलीहून चामोर्शीकडे जाणाऱ्या एसटी बसला शिवणी गावाजवळ अपघात झाला. रस्त्यावरील खड्डे आणि बसचे स्टेअरिंग जाम झाल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याची माहिती असून, त्यानंतर बस रस्त्यावर पलटी झाली. या दुर्घटनेत ३८ प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे.

१८ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास गडचिरोली-चामोर्शी मार्गावर हा अपघात घडला. अपघाताच्या वेळी बसमध्ये एकूण ६७ प्रवासी प्रवास करत होते. त्यामध्ये एका लहान चिमुकल्याचाही समावेश होता.

अपघातानंतर जखमी प्रवाशांना उपचारासाठी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. जखमींमध्ये काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती आहे.

बस सुरू असताना रस्त्यावरील खड्ड्यांमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत अचानक स्टेअरिंग जाम झाल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे बस रस्त्यावरच पलटी झाली.

या घटनेनंतर गडचिरोली जिल्ह्यातील जुन्या आणि भंगार एसटी बसेसचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. यापूर्वीही बसचे चाक निखळल्यामुळे दोन वेळा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

दरम्यान, चामोर्शी-गडचिरोली राष्ट्रीय मार्गाच्या दुरवस्थेचाही मुद्दा या अपघातामुळे समोर आला आहे. मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, खराब रस्त्यामुळे वाहनचालक आणि प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

या पार्श्वभूमीवर रस्त्याच्या दुरवस्थेला जबाबदार असलेल्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातील संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. तसेच जुन्या बसगाड्यांची सुरक्षितता आणि रस्त्यांची स्थिती याबाबत प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

संबंधित सामग्री

एसटी प्रवाशांनो लक्ष द्या! NCMC कार्डसाठी मिळाली आणखी मुदत, जाणून घ्या नवी तारीख

एसटी प्रवाशांनो लक्ष द्या! NCMC कार्डसाठी मिळाली आणखी मुदत, जाणून घ्या नवी तारीख

एसटीच्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना दिलासा! NCMC कार्ड सक्तीला 1 जानेवारी 2027 पर्यंत मुदतवाढ; ग्रामीण भागात विशेष नोंदणी शिबिरे होणार.

Nov 06, 2026
महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे १२ मोठे निर्णय! पाहा संपूर्ण यादी

महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे १२ मोठे निर्णय! पाहा संपूर्ण यादी

महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे १२ मोठे निर्णय! ओबीसी विद्यार्थ्यांचा भत्ता वाढला, वाहनधारकांना ई-चलनात सवलत आणि नागपूरमध्ये ६४४ कोटींच्या कृषी प्रकल्पाला मंजुरी.

Nov 04, 2026
मनोज जरांगेंच्या ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपची SIT चौकशी; क्लिप देण्यास तयारी, मात्र जरांगेंनी घातली मोठी अट!

मनोज जरांगेंच्या ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपची SIT चौकशी; क्लिप देण्यास तयारी, मात्र जरांगेंनी घातली मोठी अट!

मनोज जरांगेंच्या ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपची SIT चौकशी! क्लिप देण्यास तयारी, मात्र स्रोत सांगण्यापूर्वी सुरक्षेची हमी मागितली.

Nov 04, 2026
अनिल अंबानींच्या अडचणीत मोठी वाढ! ED कडून ५१० कोटींची मालमत्ता जप्त; दोन खासगी विमानांचाही समावेश

अनिल अंबानींच्या अडचणीत मोठी वाढ! ED कडून ५१० कोटींची मालमत्ता जप्त; दोन खासगी विमानांचाही समावेश

अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपवर ED ची मोठी कारवाई! ५१० कोटींची मालमत्ता आणि दोन खासगी विमाने जप्त; एकूण जप्ती २३ हजार कोटींवर.

Nov 04, 2026
पुणेकरांनो सावधान! डेंग्यूचा वाढता धोका, महापालिका ॲक्शन मोडवर

पुणेकरांनो सावधान! डेंग्यूचा वाढता धोका, महापालिका ॲक्शन मोडवर

पुण्यात ऑक्टोबरमध्ये डेंग्यूचे ८४३ रुग्ण; औंध-बाणेरमध्ये सर्वाधिक १५२ रुग्ण. महापालिका आरोग्य विभागाकडून विशेष पाहणी आणि प्रतिबंधात्मक कारवाई.

Nov 04, 2026