उदगीरमध्ये पेट्रोल पंपांवर उसळली गर्दी

इराण–अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य इंधनटंचाईच्या अफवांनी उदगीर शहरात मोठी घबराट पसरली असून पेट्रोल पंपांवर पहाटेपासूनच वाहनधारकांची मोठी गर्दी उसळल्याचे चित्र दिसून आले.

उदगीरमध्ये पेट्रोल पंपांवर उसळली गर्दी

Fuel Shortage Fear

इराण–अमेरिका तणावाचा परिणाम; ‘पॅनिक’मुळे इंधन टंचाईची भीती

उदगीर (Fuel Shortage Fear) : इराण–अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य इंधनटंचाईच्या अफवांनी उदगीर शहरात मोठी घबराट पसरली असून पेट्रोल पंपांवर पहाटेपासूनच वाहनधारकांची मोठी गर्दी उसळल्याचे चित्र दिसून आले. “पेट्रोल मिळणार नाही” या भीतीने नागरिकांनी दुचाकी व चारचाकी वाहनांसह पंपांवर रांगा लावल्या.

आज सकाळपासून अनेक पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. काही ठिकाणी नागरिकांनी अतिरिक्त कॅनमध्येही पेट्रोल साठवण्याचा प्रयत्न केल्याने परिस्थिती अधिकच तणावपूर्ण झाली. दरम्यान, काही पंपांवर इंधन संपल्याने ‘नो पेट्रोल’चे फलक लावून पंप तात्पुरते बंद ठेवावे लागल्याचेही समोर आले.

स्थानिक नागरिकांच्या मते, सोशल मीडियावर फिरणाऱ्या संदेशांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. “युद्धामुळे इंधनपुरवठा खंडित होणार” अशा चर्चांमुळे लोकांनी घाईघाईत इंधन भरण्यासाठी धाव घेतली. परिणामी, नेहमीपेक्षा अनेकपटीने मागणी वाढल्याने काही पंपांवर तात्पुरती टंचाई जाणवली.

दरम्यान, प्रशासन व पेट्रोलियम वितरकांकडून नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. इंधनाचा पुरवठा नियमित सुरू असून अनावश्यक साठेबाजी टाळावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

प्रशासनाने नागरिकांना संयम बाळगण्याचे व आवश्यक तेवढेच इंधन भरण्याचे आवाहन केले आहे. अनावश्यक गर्दीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यामुळे सहकार्य करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

कांही पेट्रोल पंपावर रांगाच रांगा तर काही पेट्रोल पंप बंद

उदगीर शहरातील कांही पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा दिसून येत आहेत तर कांही पेट्रोल पंपावर नो पेट्रोल चे फलक दिसुन येत आहेत त्यामूळे वाहनधारकात चिंता पसरली आहे. परस्थिती जाणून घेण्यासी प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आसता संपर्क होवू शकलाा नसल्याने प्रतीक्रीया कळे शकली नाहि.

संबंधित सामग्री

शेतकरी पुत्राची आभाळाला झेप; चार पिढ्यांनंतर नळगीर तांड्यात पहिला डॉक्टर!

शेतकरी पुत्राची आभाळाला झेप; चार पिढ्यांनंतर नळगीर तांड्यात पहिला डॉक्टर!

रोहित दिलीप पवार नीट परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवला आहे.

Sep 05, 2026
उदगीर तालुक्यातील ४८ जि.प. शाळांमधील १२६ वर्गखोल्या धोकादायक; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

उदगीर तालुक्यातील ४८ जि.प. शाळांमधील १२६ वर्गखोल्या धोकादायक; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरणात शिक्षण मिळावे, ही शिक्षण विभागाची प्राथमिक जबाबदारी असताना उदगीर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांबाबत चिंताजनक वास्तव समोर आले आहे.

Aug 28, 2026
उदगीरमध्ये वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; पाच महिला पीडितांची सुटका

उदगीरमध्ये वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; पाच महिला पीडितांची सुटका

उदगीर तालुक्यातील नांदेड रोडवरील अशोका पॅलेस हॉटेलमध्ये आर्थिक फायद्यासाठी महिलांना बोलावून वेश्याव्यवसाय करवून घेतल्याचा प्रकार उदगीर ग्रामीण पोलिसांनी उघडकीस आणला.

Aug 14, 2026
परभणीत पहाटे तीन संशयितांची घरांची रेकी; सीसीटीव्ही फुटेज व्हायरल...!

परभणीत पहाटे तीन संशयितांची घरांची रेकी; सीसीटीव्ही फुटेज व्हायरल...!

Parbhani house recce case: शहरातील दत्तधाम परिसरातील सत्कार कॉलनी, श्रेयश कॉलनी व शिवरस्ता परिसरात 16 जुलै रोजी पहाटे सुमारे 1.45 वाजता तीन संशयित व्यक्ती फिरत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Jul 17, 2026