Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

मानोरा भटकी कुत्रे

मानोरा शहरात भटक्या कुत्र्याचा धुमाकूळ; २५ ते ३० जणांना चावा घेतल्याने खळबळ

Manora stray dogs:


मानोरा शहरात भटक्या कुत्र्याचा धुमाकूळ २५ ते ३० जणांना चावा घेतल्याने खळबळ

Manora stray dogs |

मानोरा (Manora stray dogs) : मानोरा शहरात सोमवार, ३१ ऑगस्ट रोजी सकाळपासून भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या बातम्यांनी संपूर्ण शहरात खळबळ माजली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे ८ वाजल्यापासून एका भटक्या कुत्र्याने अचानक दहशत माजवली. या कुत्र्याने शहरातील वेगवेगळ्या भागात फिरत सुमारे २५ ते ३० लोकांना चावा घेऊन जखमी केले आहे. या (Manora stray dogs) घटनेमुळे शहरवासीयांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. कुत्र्याच्या हल्ल्यात वृद्ध, महिला आणि पादचारी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

अचानक झालेल्या हल्ल्यामुळे लोकांमध्ये एकच घबराट उडाली. अनेकजण स्वतःचा बचाव करण्यासाठी सैरावैरा पळताना दिसले. कुत्रा चावल्याने जखमी झालेल्यांना तातडीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मोठ्या संख्येने लोक कुत्र्याच्या हल्ल्याला बळी पडल्याने आरोग्य यंत्रणेवरही ताण वाढण्याची शक्यता आहे. शहरवासीयांनी नगरपंचायत प्रशासनाकडे भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या दहशतीवर तात्काळ नियंत्रण मिळवण्याची आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलण्याची मागणी केली आहे. या (Manora stray dogs) घटनेनंतर पालकांमध्येही मुलांच्या सुरक्षेबाबत चिंता वाढली आहे. कुत्रा चावणाऱ्या नागरिकांना सामान्य ग्रामीण रुग्णालयात भरती करून कुटुंबियांकडून उपचार सुरू आहे.

Related to this topic: