निलंगा महामार्ग अपघात

महामार्गाच्या भेगात दुचाकी अडकून बसवकल्याण येथील व्यक्ती गंभीर जखमी 

Nilanga Highway Accident: लातूर - जहीराबाद महामार्गावर बसवकल्याण येथील व्यक्ती गंभीररित्या जखमी झाली. त्याची दुचाकी महामार्गाच्या भेगात टायर अडकल्याने अपघात झाला.

महामार्गाच्या भेगात दुचाकी अडकून बसवकल्याण येथील व्यक्ती गंभीर जखमी 

Nilanga Highway Accident

केळगाव पाटी येथील घटना 

निलंगा (Nilanga Highway Accident) : निलंगा तालुक्यातून जात असलेले लातूर - जहीराबाद महामार्गावर 4 एप्रिल सायंकाळी साडेसहा वाजता बसवकल्याण येथील दुचाकीस्वार दुचाकी क्रमांक के. ए.56 इ.109 ही दुचाकी केळगाव पाठीच्या जवळ लातूर जहीराबाद महामार्गाच्या भेगांमध्ये टायर अडकल्याने गंभीर दुखापत होऊन रस्त्याच्या कडेला पडली. स्थानिक नागरिकांनी व (Nilanga Highway Accident) महामार्गावरून जात असलेल्या प्रवाशांनी मदतीचा हात देऊन दुचाकी व या व्यक्तीला रस्त्याच्या कडेला घेतल्याने मोठी घटना टळली. व 108 या रुग्णवाहिकेला संपर्क करून माहिती सांगितली. मात्र एक तास वाट बघितल्यानंतर सुद्धा 108 हे रुग्णवाहिका आली नाही. पत्रकार जावेद मुजावर यांनी संबंधित व्यक्तीच्या त्यांच्या फोन मधून त्यांचे शिरूर अनंतपाळ येथील संबंधित नातेवाईकाला संपर्क करून घटनेची माहिती दिली असता, त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन पुढील उपचार करतो म्हणून सांगितले.

अतिशय दयनीय अवस्था या महामार्गाची झाली आहे.काही दिवसा अगोदरच या महामार्गाच्या भेगांची दुरुस्ती झाली होती. मात्र (Nilanga Highway Accident) महामार्गाच्या भेगांची दुरुस्ती न करताच दुरुस्ती झाली असल्याचे वावडे या महामार्गाने उधळले व  प्रशासनाची दिशाभूल केली मात्र प्रशासन झोपेचे सोंग घेऊन डोळे करत आहे. सर्वसामान्य नागरिकांचा या महामार्गावर बळी जात आहे. अपघात होत आहेत गंभीर जखमी होत आहेत.

याकडे सरकार मायबाप सुद्धा बघायला तयार नाही संबंधित महामार्ग प्रशासनाने वारंवार होणाऱ्या घटनेची गांभीर्य लक्षात घेता या महामार्गावर ठिकठिकाणी निटूर मोड येथे वळण व्यवस्थित करावे संपूर्ण महामार्गाच्या भेगांची दुरुस्ती (Nilanga Highway Accident) करून लांबोटा मोड व ठिकठिकाणी वळणाच्या ठिकाणी दिशादर्शक फलक व महामार्ग सूचनादर्शक फलक लावने गरजेचे आहे. जेणेकरून या अपघाताच्या घटना काही अंशी कमी होतील, अशी दुचाकी स्वरांची प्रतिक्रिया येत आहे

संबंधित सामग्री

उसाला प्रति टन ५ हजाराचा भाव द्या : शेतकरी संघटना 

उसाला प्रति टन ५ हजाराचा भाव द्या : शेतकरी संघटना 

Latur Farmers' Organization: गाळप हंगामामध्ये किमान पाच हजार रुपयांचा ऊस दर प्रति मॅट्रिक टन देण्यात यावा, अशी एकमुखी मागणी सर्व शेतकरी संघटनांनी केली. तर मांजरा परिवाराने प्रत्येक गाळप हंगाम..

Oct 06, 2026
मिनीडोर-मोटारसायकलच्या भीषण धडकेत एक ठार

मिनीडोर-मोटारसायकलच्या भीषण धडकेत एक ठार

Mini Truck-Motorcycle Accident: शहरातून जाणाऱ्या हिंगोली-नांदेड या मुख्य रस्त्यावर ग्रीनपार्कजवळ सोमवारी (दि. ५) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास मिनीडोर आणि मोटारसायकलची समोरासमोर जोरदार धडक झाली.

Oct 05, 2026
लैंगिक अत्याचारप्रकरणी २० वर्षे सश्रम कारावास!

लैंगिक अत्याचारप्रकरणी २० वर्षे सश्रम कारावास!

Latur Sexual Assault Case: नागझरी येथे आरोपीने १२ वर्षीय मुलीच्या भोळसर स्वभावाचा गैरफायदा घेत तिला लातूर शहर फिरवून आणण्याचे सांगितले. त्यानंतर तिला दुचाकीवरून पुणे

Oct 02, 2026
नांदेड उप महानिरीक्षकांच्या पथकाने घातले, लातूर पोलिसांच्या डोळ्यात झणझणीत अंजन 

नांदेड उप महानिरीक्षकांच्या पथकाने घातले, लातूर पोलिसांच्या डोळ्यात झणझणीत अंजन 

Latur Matka-Gambling Raid: लातूरचे पोलीस हेल्मेट सक्तीच्या कामगिरीत गुंतले असताना दुसरीकडे नांदेडच्या पोलीस उप महानिरीक्षकांच्या पथकाने लातूर शहर जिल्ह्यात राजरोस चालणाऱ्या मटका व जुगारांवर धाड..

Oct 01, 2026
हेल्मेट सक्तीमुळे अपघाती मृत्युसंख्येत घट

हेल्मेट सक्तीमुळे अपघाती मृत्युसंख्येत घट

Latur Helmet Rule Mandatory: गेल्या महिनाभरात झालेल्या अपघाती मृत्यूच्या आकडेवारीतून लातूर पोलिसांच्या हेल्मेट सक्तीचा सकारात्मक परिणाम झाल्याचा दावा पोलीस प्रशासनाने केला. ऑगस्ट मधील ३३ अपघाती मृत्यू

Oct 01, 2026