Divider Collision

मानोरा येथे भीषण अपघात : अंत्यविधी आटपून परतताना कार डिव्हायडरला धडक; ४ जण गंभीर जखमी

चार जणांच्या कारचा बुधवारी (15 जुलै) पहाटे मानोरा शहराजवळ भीषण अपघात झाला.

मानोरा येथे भीषण अपघात : अंत्यविधी आटपून परतताना कार डिव्हायडरला धडक; ४ जण गंभीर जखमी

Divider Collision

मानोरा : लेह-लडाख येथे झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झालेल्या रिसोड येथील युवा वकील ॲड. कुणाल चोपडे (वय 24) यांच्या अंत्यविधीस उपस्थित राहून परत येत असलेल्या चार जणांच्या कारचा बुधवारी (15 जुलै) पहाटे मानोरा शहराजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील चारही जण गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दिग्रस येथील दीपक फिरके यांच्यासह इतर तिघेजण रविवारी रिसोड येथे ॲड. कुणाल चोपडे यांच्या अंत्यविधीस उपस्थित राहण्यासाठी गेले होते. अंत्यविधी आटोपल्यानंतर ते MH-29 V-1919 क्रमांकाच्या कारने दिग्रसकडे परत निघाले होते.

बुधवारी पहाटे सुमारे 3.30 वाजताच्या सुमारास मानोरा शहरातील सृष्टी गार्डनसमोर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कारने रस्त्यावरील डिव्हायडरला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कारचे मोठे नुकसान झाले असून वाहनातील चारही जण जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच मानोरा येथील शिवसेना तालुकाप्रमुख रवींद्र पवार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तत्काळ बाहेर काढून मानोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी सर्व जखमींना दिग्रस येथील रुग्णालयात रेफर करण्यात आले.

अंत्यविधी आटपून परतत असताना झालेल्या या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून मानोरा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.

संबंधित सामग्री

रिसोड तहसील कार्यालयाचा उपक्रम: महसूल लोक अदालतीतून ८ शेतरस्त्यांचे वाद सामंजस्याने निकाली

रिसोड तहसील कार्यालयाचा उपक्रम: महसूल लोक अदालतीतून ८ शेतरस्त्यांचे वाद सामंजस्याने निकाली

Risod Revenue Lok Adalat: शेतात ये-जा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या शेतरस्त्यांचे प्रलंबित वाद 'महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियाना'अंतर्गत रिसोड तहसील कार्यालयात सामंजस्य

Oct 06, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
रिसोड तालुक्यात दुष्काळी सावटाखाली पीक पंचनामे युद्धपातळीवर सुरू

रिसोड तालुक्यात दुष्काळी सावटाखाली पीक पंचनामे युद्धपातळीवर सुरू

Risod Taluka Drought: यंदाच्या खरीप हंगामात पावसाच्या अनियमिततेमुळे रिसोड तालुक्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, महसूल प्रशासनाने नुकसानीच्या पीक पंचनाम्यांना गती दिली आहे.

Oct 05, 2026
उन्हाच्या तीव्रतेसोबतच रिसोड तालुक्यात पाणीटंचाईचे सावट; पळसखेड प्रकल्पात केवळ ४.०८ टक्के साठा

उन्हाच्या तीव्रतेसोबतच रिसोड तालुक्यात पाणीटंचाईचे सावट; पळसखेड प्रकल्पात केवळ ४.०८ टक्के साठा

Risod Taluka Water Scarcity: उन्हाचा पारा दिवसागणिक वाढत चालल्याने रिसोड तालुक्यातील जलसाठ्यांची स्थिती अत्यंत चिंताजनक झाली आहे. वाढत्या तापमानामुळे आगामी काळात तीव्र पाणीटंचाईचे स्पष्ट संकेत

Oct 04, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026