डिझेल टंचाईमुळे शेतकरी संघटनेचा महामार्गावर चक्का जाम

चिखली तालुक्यात खरीप हंगामाच्या पूर्वमशागतीची कामे वेगाने सुरू असतानाच निर्माण झालेल्या डिझेल टंचाईमुळे शेतकऱ्यांचा संताप शनिवारी रस्त्यावर उतरला.

डिझेल टंचाईमुळे शेतकरी संघटनेचा महामार्गावर चक्का जाम

Diesel Shortage

मेरा चौकी येथे पुणे–नागपूर राष्ट्रीय महामार्ग दोन तास रोखला; कॅनमध्ये डिझेल देण्याची मागणी

चिखली (Diesel Shortage): चिखली तालुक्यात खरीप हंगामाच्या पूर्वमशागतीची कामे वेगाने सुरू असतानाच निर्माण झालेल्या डिझेल टंचाईमुळे शेतकऱ्यांचा संताप शनिवारी रस्त्यावर उतरला. मेरा खुर्द येथील नायरा पेट्रोल पंपावर डिझेल संपल्याने जवळपास ५० ट्रॅक्टर चालकांना डिझेल मिळू शकले नाही. यामुळे संतप्त शेतकरी, ट्रॅक्टर चालक व मालकांनी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली मेरा चौकी येथे पुणे–नागपूर राष्ट्रीय महामार्गावर तब्बल दोन तास चक्का जाम आंदोलन केले.

आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर महामार्गावर आडवे लावून वाहतूक पूर्णपणे रोखली. “शेतकऱ्यांना कॅनमध्ये डिझेल देण्यात यावे”, “पेट्रोल पंपांवरील डिझेल टंचाई तातडीने दूर करावी” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

दरम्यान, आंदोलन सुरू असतानाच चिखलीहून छत्रपती संभाजीनगर येथे उपचारासाठी रुग्ण घेऊन जाणारी अँबुलन्स आंदोलनस्थळी पोहोचली. यावेळी आंदोलकांनी तत्काळ ट्रॅक्टर बाजूला करून अँबुलन्सला मार्ग मोकळा करून दिला. त्यामुळे आंदोलनाच्या काळातही आंदोलकांनी माणुसकीचे दर्शन घडविल्याची भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.

सध्या खरीप पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरू असून तालुक्यातील बहुतांश शेतकरी यांत्रिक शेतीवर अवलंबून आहेत. गावागावांत बैलांची संख्या कमी झाल्याने ट्रॅक्टर, रोटाव्हेटर, पेरणी यंत्र अशा यंत्रसामग्रीवर शेतीची कामे सुरू आहेत. अशा परिस्थितीत ऐन हंगामाच्या तोंडावर निर्माण झालेल्या इंधन तुटवड्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

आंदोलनाची माहिती मिळताच प्रशासन व पोलीस विभाग तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तहसीलदार सौरभ गावंडे, नायब तहसीलदार मुरलीधर गायकवाड तसेच अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार रुपेश शक्करगे यांनी आंदोलकांशी चर्चा केली. ठाणेदार शक्करगे हे चिखली येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी गेलेले असताना रास्ता रोकोची माहिती मिळताच तातडीने आंदोलनस्थळी पोहोचले.

प्रशासनाकडून पुढील दोन दिवसांत प्रत्येक पेट्रोल पंपावर दोन-दोन डिझेल टँकर उपलब्ध करून देण्यात येतील तसेच डिझेल पुरवठा सुरळीत केला जाईल, असे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास कणखर यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की, “दोन दिवसांत डिझेल पुरवठा सुरळीत झाला नाही तर जिल्हाभर तीव्र रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल.”

आंदोलनात गणेश थुट्टे, विनोद थुट्टे, भागवत थुट्टे, कृष्णा थुट्टे, शरद थुट्टे, विशाल थुट्टे, संदीप थुट्टे, समाधान थुट्टे, सतीश थुट्टे, अशोक थुट्टे, रामेश्वर शेळके, रामदास मुजमुले, आकाश पैठणे, दिपक गाडेकर, अंकुश देशमुख, विनोद देशमुख यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी झाले होते.

या आंदोलनामुळे काही काळ पुणे–नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर परिस्थिती नियंत्रणात आली.

संबंधित सामग्री

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! शेतीच्या यांत्रिकीकरणाला बळ; डिझेलचा पुरवठा वाढणार..

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! शेतीच्या यांत्रिकीकरणाला बळ; डिझेलचा पुरवठा वाढणार..

Farm Mechanization Diesel Supply: हार्मुझच्या सामुद्रधुनीतील संघर्षामुळे निर्माण झालेल्या जागतिक तेलपुरवठ्याच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर जी-7 देश आपत्कालीन साठ्यातील 10 कोटी बॅरल कच्चे तेल-डिझेल बाजार

Oct 04, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंचं आवाहन; ‘उत्सवांचा निधी शेतकऱ्यांसाठी द्या’

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंचं आवाहन; ‘उत्सवांचा निधी शेतकऱ्यांसाठी द्या’

महाराष्ट्रातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्सव साधेपणाने साजरे करून निधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी वापरण्याचं आवाहन केलं.

Oct 01, 2026
महाराष्ट्र दुष्काळ: शेतकऱ्यांना मोठा दिलासा; कर्जवसुलीला सरकारचा ब्रेक

महाराष्ट्र दुष्काळ: शेतकऱ्यांना मोठा दिलासा; कर्जवसुलीला सरकारचा ब्रेक

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जवसुलीवर निर्बंध, 43 तालुक्यांचा समावेश आणि रोजगार हमी योजनेसाठी 6,728 कोटींचा निधी.

Oct 01, 2026
ब्राह्मणवाडा येथील शेतकऱ्याची नापिकीमुळे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या

ब्राह्मणवाडा येथील शेतकऱ्याची नापिकीमुळे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या

ब्राह्मणवाडा येथील ५९ वर्षीय अल्पभूधारक शेतकरी तानाजी मोरे यांनी नापिकीच्या चिंतेत विषारी औषध प्राशन केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Sep 29, 2026
‘संपूर्ण रिपोर्ट आल्यानंतरच मदत’! दुष्काळी मदतीवर बावनकुळेंचं मोठं स्पष्टीकरण

‘संपूर्ण रिपोर्ट आल्यानंतरच मदत’! दुष्काळी मदतीवर बावनकुळेंचं मोठं स्पष्टीकरण

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पंचनामे आणि संपूर्ण अहवालानंतर मदत देण्याची भूमिका चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केली.

Sep 28, 2026