देवजना शिवार ऊस

देवजना शिवारात एक एकर ऊस जळून खाक; शेतकऱ्याच मोठं नुकसान

Devjana Shiwar sugarcane: प्रतिनिधी कळमनुरी तालुक्यातील मौजे देवजना येथील अल्पभूधारक शेतकरी रमेश पुंजाजी कल्याणकर यांचा एक एकर ऊस गुरुवारी दुपारी अचानक आग लागून जळून खाक झाला.

देवजना शिवारात एक एकर ऊस जळून खाक; शेतकऱ्याच मोठं नुकसान

Devjana Shiwar sugarcane

आखाडा बाळापूर (Devjana Shiwar sugarcane) : प्रतिनिधी कळमनुरी तालुक्यातील मौजे देवजना येथील अल्पभूधारक शेतकरी रमेश पुंजाजी कल्याणकर यांचा एक एकर ऊस गुरुवारी दुपारी अचानक आग लागून जळून खाक झाला. वेळीच शेतकरी ग्रामस्थांनी व अग्निशामक दलाच्या पथकाने आग आटोक्यात आणली यामुळे मोठा अनर्थ नुकसान टळले. देवजना येथील शेतकरी रमेश कल्याणकर यांचा  एक एकर ऊस 17 रोजी 2026  विजेच्या शॉट सर्कीटमुळे अचानक आग लागली ऊस जळुन खाक झाला आहे तरी बाजुला असलेल्या शेतकऱ्यांचा ऊसाकडे आग जात होती मात्र गावातील अनेक शेतकरी नागरिकांनी घेतलेल्या मेहनती मुळे पुढील अनर्थ टळला.

यामध्ये ग्रामपंचायत कर्मचारी रामराव कल्याणकर यांनी व परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अभय पाटील सावंत यांनी आमदार  संतोष बांगर व कळमनुरी नगरपालिका अध्यक्ष प्रतिनिधी आर.आर.पाटील यांना फोनद्वारे संपर्क साधून अग्निशमन दलाची गाडी पाठवा हि विनंती केली  लगेच पुलीस प्रशासन व अग्निशमन शमन दलाची गाडी थेट शेतकऱ्यांच्या शेतावर ताबडतोब आली.

त्यामुळे देवजना येथील शेतकऱ्यांचे बरेच होनारे नुकसान वाचले  पेटलेला ऊस विझविण्यासाठी गावातील तंटामुक्ती अध्यक्ष शिवरामजी कल्याणकर, प्रदीप कल्याणकर, कैलासराव कल्याणकर,सुनिल वाघमारे अरविंद चोपडे ,चंचळ कल्याणकर, बालाजी माधवराव, हरिदास कल्याणकर, राजेश कल्याणकर,भागवत कल्याणकर,माणिकराव देशमुख,रूस्तुमराव कल्याणकर सह अनेक शेतकरी व गावातील तरुणांनी  आग विझवण्यासाठी धावपळ केली अस रामराव कल्याणकर यांनी सांगितले. बिट प्रमुख गजानन राठोड यांनी तात्काळ घटनास्थळी होमगार्ड व पोलीस पथकासह धाव घेतली व आग विझवण्यासाठी पावले उचलली.

अचानक लागलेल्या (Devjana Shiwar sugarcane) आगीत अल्पभूधारक शेतकरी रमेश पुंजाजी कल्याणकर यांचा ऊस जळून अतोनात नुकसान झाले आहे.सदर शेतकऱ्यास आर्थिक संकटांतून बाहेर काढण्यासाठी शासनाने तातडीने मदत देण्याची गरज आहे.

संबंधित सामग्री

साखरेच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता; शंभरीपार जाण्याची भीती

साखरेच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता; शंभरीपार जाण्याची भीती

ऊस उत्पादन घटल्याने, कमी स्टॉक आणि इथेनॉल निर्मितीमुळे साखरेचे दर शंभरीपार जाण्याची शक्यता; दिवाळीच्या फराळावर महागाईची झळ बसू शकते.

Oct 01, 2026
दुष्काळात जपलेला तीन एकर ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी; काटेजवळ शिवारातील घटना

दुष्काळात जपलेला तीन एकर ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी; काटेजवळ शिवारातील घटना

Sugarcane field fire: दुष्काळी परिस्थितीत पाण्याची कमतरता असतानाही मोठ्या कष्टाने जपलेला तीन एकर ऊस अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याची घटना. प्रशांत लांबोटे यांच्या ऊस जळून खाक

Sep 27, 2026
विलास युनिट-२ चा बॉयलर अग्निप्रदीपन

विलास युनिट-२ चा बॉयलर अग्निप्रदीपन

तोंडार येथील विलास साखर कारखाना युनिट-२ च्या बॉयलर अग्निप्रदीपनाचा कार्यक्रम संपन्न झाला. २०२६-२७ गळीत हंगामासाठी कारखाना सज्ज झाला आहे.

Sep 26, 2026
ऊस उत्पादकांच्या माथी बसणार, चार-पाच कांड्यांचे नुकसान!

ऊस उत्पादकांच्या माथी बसणार, चार-पाच कांड्यांचे नुकसान!

Latur Sugarcane Growers: साखरेचे वाढते दर नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि केंद्र सरकारच्या सूचनेनुसार यंदा साखर कारखान्यांचा गळीत हंगाम नेहमीच्या वेळेपेक्षा एक महिना आधी म्हणजे १५ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू

Sep 22, 2026
फडणवीस सरकारचे ७ मोठे निर्णय; ऊस उत्पादकांना सॉफ्ट लोन, हरेगावच्या जमिनी शेतकऱ्यांना परत

फडणवीस सरकारचे ७ मोठे निर्णय; ऊस उत्पादकांना सॉफ्ट लोन, हरेगावच्या जमिनी शेतकऱ्यांना परत

फडणवीस सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत ऊस उत्पादकांना सॉफ्ट लोन, हरेगावची जमीन शेतकऱ्यांना परत करण्यासह ७ महत्त्वाचे निर्णय घेतले.

Sep 15, 2026