लातूर : उदगीर तालुक्यातील तोंडार येथील विलास सहकारी साखर कारखाना लि., युनिट-२ कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रम शुक्रवारी (दि. २५) कारखान्याच्या चेअरमन वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. तत्पूर्वी कारखान्याचे संचालक श्री. नितीन पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. आशा पाटील यांच्या हस्ते विधिवत सत्यनारायण पूजा करून होमहवन करण्यात आले.
तोंडार येथील विलास साखर कारखाना युनिट-२ ने गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये ५ लाख मे. टन गाळप केले असून गाळपास आलेल्या उसाला प्रति मे. टन रु. ३१३१ प्रमाणे ऊस बिल अदा केले आहे. कारखान्याने गळीत हंगाम २०२६-२७ सुरू करण्याच्या दृष्टीकोनातून पूर्ण तयारी केली आहे.
याप्रसंगी कारखान्याचे व्हा. चेअरमन, माजी आ. वैजनाथराव शिंदे, कारखान्याचे संचालक सर्वश्री रविंद्र काळे, अमृत जाधव, सतीश पाटील, अनंत बारबोले, नरसिंग बुलबुले, गोवर्धन मोरे, रंजीत पाटील, तात्यासाहेब पालकर, रामराव सांळुके, दिपक बनसोडे, लताताई देशमुख, शाम बरुरे, सुभाष माने, निमंत्रित संचालक कल्याण पाटील, ज्ञानोबा गोडभरले, मारोती पांडे, पंडीत ढगे, संदिप पाटील, उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजीराव हुडे, कार्यकारी संचालक ए. आर. पवार, चिफ इंजिनिअर रविकिरण सोमवंशी, मुख्य शेतकी अधिकारी श्रीराम पाटील, चिफ अकौंटंट ओ. एच. चांडक, चिफ केमिस्ट बी. आर. खरात, डिस्टीलरी मॅनेजर शेख एस. ई., सिव्हिल इंजिनिअर एस. एच. देशमुख, संतोष मुंढे, परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी वाहतूक ठेकेदार, कर्मचारी आदी उपस्थित होते.