Breaking News
  • दिल्लीतील अनेक शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी
  • लखलख चमकणारा महाराष्ट्राचा एकमेव काचेचा गणपती पुण्यात!
  • धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम
  • मराठा बांधवांचा मुंबईकडे ‘गनिमी कावा’; धाराशिवमधून 5 हजार कार्यकर्ते जाणार
  • शिरूरमध्ये कांदा लागवडीला वेग; महिलांनी पावसासाठी घातले साकडे
  • मनोज जरांगे पाटील यांचा पाटोदा येथे पहिला मुक्काम; सात लाख मराठा बांधवांसाठी जेवणाची व्यवस्था
  • सुरगाणा तालुक्यातील शासकीय रुग्णालयात सोनोग्राफी मशीन दाखल
  • अनेकांना कुणबी प्रमाणपत्र दिले - एकनाथ शिंदे
  • नांदेडच्या किनवट तालुक्यातील इस्लापूर शहर कडकडीत बंद

होम > आपले शहर > विदर्भ > अकोला

बेंजो कंपनी कामगार मृत्यू

रासायनिक पाणी अंगावर उडाल्यानंतर कामगाराचा मृत्यू; बेंजो कंपनीतील सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

Benjo Company Worker Death: बेंजो केमिकल कंपनीत काम करत असताना ईटीपीमधील रासायनिकयुक्त पाणी अंगावर व तोंडावर उडाल्याने एका ३३ वर्षीय कायमस्वरूपी कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना


रासायनिक पाणी अंगावर उडाल्यानंतर कामगाराचा मृत्यू बेंजो कंपनीतील सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

Benjo Company Worker Death |

मलकापूर (Benjo Company Worker Death) : बेंजो केमिकल कंपनीत काम करत असताना ईटीपीमधील रासायनिकयुक्त पाणी अंगावर व तोंडावर उडाल्याने एका ३३ वर्षीय कायमस्वरूपी कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे औद्योगिक कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मृत कामगाराचे नाव ललित वाघ (वय ३३, रा. मलकापूर) असल्याची माहिती कंपनीतील ढाके यांच्याकडून मिळाली.

मिळालेल्या माहितीनुसार, ललित वाघ हे कंपनीत कायमस्वरूपी कामगार म्हणून कार्यरत होते. (Benjo Company Worker Death) कामादरम्यान ईटीपीमधील रासायनिकयुक्त पाणी अचानक त्यांच्या अंगावर तसेच तोंडावर उडाले. त्यानंतर काही काळ त्यांना अस्वस्थता जाणवली व काही वेळातच त्यांची प्रकृती खालावली.

प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, त्यांचा मृत्यू नेमका रासायनिक पाण्याच्या संपर्कामुळे झाला की हृदयाचे ठोके बंद पडल्याने झाला, याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळे शवविच्छेदन अहवाल आणि पोलिसांच्या चौकशीनंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणी व शवविच्छेदनासाठी मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदन विभागात दाखल करण्यात आला आहे.

कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
या (Benjo Company Worker Death) घटनेनंतर औद्योगिक आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक सुरक्षा साधने, रासायनिक पदार्थ हाताळताना घेतली जाणारी खबरदारी, सुरक्षात्मक पोशाख व आपत्कालीन वैद्यकीय व्यवस्था याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. कंपनीकडून सर्व आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, संबंधित कर्मचाऱ्याला आवश्यक सुरक्षा साधने उपलब्ध होती का आणि घटना घडल्यानंतर तातडीची वैद्यकीय मदत किती वेळात मिळाली, याची चौकशी होणे आवश्यक आहे. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी ही कोणत्याही औद्योगिक आस्थापनासाठी अत्यंत महत्त्वाची असते. त्यामुळे या घटनेची संबंधित औद्योगिक व कामगार सुरक्षा यंत्रणेकडून निष्पक्ष चौकशी होऊन वस्तुस्थिती समोर यावी, अशी मागणी होत आहे.

बेंजो कंपनीबाबत यापूर्वीही तक्रारी
दरम्यान, बेंजो केमिकल कंपनीविरोधात (Benjo Company Worker Death) यापूर्वीही मलकापूर शहरातील काही राजकीय पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांकडून विविध तक्रारी करण्यात आल्याचे सांगण्यात येते. या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर कंपनीला यापूर्वी आर्थिक दंडालाही सामोरे जावे लागल्याचे संबंधितांकडून सांगितले जात आहे. मात्र या पूर्वीच्या तक्रारींचा सद्य घटनेशी थेट संबंध आहे का, हे अधिकृत चौकशीतूनच स्पष्ट होणार आहे.

आता ललित वाघ यांच्या मृत्यूच्या घटनेची सखोल चौकशी करून कंपनीतील सुरक्षा व्यवस्थेत काही त्रुटी होत्या का, रासायनिक पदार्थांपासून कर्मचाऱ्यांच्या संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या होत्या का आणि अपघातास कोणाची जबाबदारी आहे, याचा तपास होणे महत्त्वाचे ठरणार आहे. शवविच्छेदन अहवाल, पोलिस तपास आणि संबंधित शासकीय यंत्रणांच्या चौकशीनंतरच या दुर्दैवी मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

Related to this topic: