Parbhani Youth Suicide: मराठा आरक्षण कधी मिळणार या विवंचनेत ३४ वर्षीय तरूणाने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शनिवार २९ ऑगस्ट रोजी सकाळी देवगाव फाटा शिवारात उघडकीस आली.
शेतातील लिंबाच्या झाडाला घेतला गळफास; चारठाणा पोलिसात नोंद
परभणी (Parbhani Youth Suicide) : चारठाणा येथील मराठा आरक्षण कधी मिळणार या विवंचनेत ३४ वर्षीय तरूणाने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शनिवार २९ ऑगस्ट रोजी सकाळी देवगाव फाटा शिवारात उघडकीस आली. या प्रकरणी चारठाणा पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
या (Parbhani Youth Suicide) घटनेबाबत अधिक माहिती अशी की, जगन्नाथ उत्तमराव मोरे वय - ३४ वर्ष व्यवसाय शेती, रा.देवगाव फाटा ता.सेलू असे मयताचे नाव आहे. सदर प्रकरणी शिवाजी उत्तमराव मोरे, यांनी खबर दिली आहे. जगन्नाथ मोरे याने मराठा आरक्षण कधी मिळणार, आपल्याला आरक्षण मिळाले नाही तर लेकरांना नोकरी लागणार नाही, याच तणावात २८ ऑगस्टच्या रात्री साडे दहा ते २९ ऑगस्टच्या सकाळी सहा या दरम्यान देवगाव फाटा शिवारातील शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
चारठाणा पोलिस ठाण्यातील सपोउपनि.पिंपळे यांनी आकस्मिक मृत्यू दाखल केली असून तपास सपोनि. बालाजी पुंड करत आहेत. मराठा आरक्षण कधी मिळेल या नैराश्यात तरूण शेतकर्याने आत्महत्या केल्याने देवगाव फाटा परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.