Cow Protection

गोवंश प्रकरणी उपनगराध्यक्षाचे पद हटवून कठोर कारवाईची मागणी

महाराष्ट्रात गोहत्या बंदी कायदा लागू असतानाही गोवंशांना बेकायदेशीररीत्या डांबून ठेवून त्यांचा छळ करण्यात आल्याचा आरोप बजरंग दलाने केला आहे.

गोवंश प्रकरणी उपनगराध्यक्षाचे पद हटवून कठोर कारवाईची मागणी

Cow Protection

व्हीएचपी व बजरंग दलाचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना निवेदन

 

हिंगोली : वसमत येथे पोलिसांनी उघडकीस आणलेल्या गोवंश छळ प्रकरणात वसमत नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष सय्यद इम्रान नाशेर अली यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांना सार्वजनिक पदावरून हटविण्याची मागणी विश्व हिंदू परिषद (व्हीएचपी), बजरंग दल तसेच हिंदू समाजाच्या नागरिकांनी केली आहे. यासंदर्भात शुक्रवारी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनानुसार, २९ जुलै रोजी रात्री वसमत–पूर्णा कारखाना मार्गावरील जवळा खंदारबन शिवारातील गट क्रमांक ३२ मधील एका शेतावर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईदरम्यान शेतात १९ गोवंश जनावरे चारा व पाणी न देता क्रूर पद्धतीने बांधून ठेवण्यात आल्याचे आढळल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात गोहत्या बंदी कायदा लागू असतानाही गोवंशांना बेकायदेशीररीत्या डांबून ठेवून त्यांचा छळ करण्यात आल्याचा आरोप बजरंग दलाने केला आहे. जनावरांना उपाशी ठेवून त्यांचे हिमोग्लोबिन कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचाही आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

सार्वजनिक पदावर असलेल्या व्यक्तीकडून कायद्याचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करत, या प्रकरणातील दोषी सय्यद इम्रान नाशेर अली यांना उपनगराध्यक्ष पदावरून हटवून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

यावेळी बद्रीभाऊ सारडा, प्रकाश सोनी, राजेंद्र हलवाई, कैलास श्रीनाथ, दीपक निमोदिया, गणेश जाधव, नामदेव मस्के, प्रदीप उपाध्ये, सीमा हवालदार, वासुदेव शांडील्य, विजय शिंदे, चंद्रशेखर लांडगे, सचिन करवंदे, लक्ष्मण सुरदूसे, गणेश सोळंके आदी उपस्थित होते.

संबंधित सामग्री

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली  येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

Oct 06, 2026
हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

Hingoli Lakshmi Life Care Hospital: हिंगोलीतील कपडा गल्ली येथे फटाका गोदामाला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या ६ रुग्णांवर लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटल, हिंगोली येथे डॉक्टर अखिल अग्रवाल

Oct 06, 2026
हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

Hingoli Firecracker Accident: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली परिसरात फटाक्यांच्या साठवणुकीच्या ठिकाणी लागलेली आग अत्यंत दुर्दैवी व गंभीर आहे. या दुर्घटनेत प्राथमिक माहितीनुसार दोन नागरिकांचा मृत्यू..

Oct 06, 2026
हिंगोली मारवाडी गल्लीतील भिषण आगीत फटाक्यांचा स्फोट, दोघांचा मृत्यू

हिंगोली मारवाडी गल्लीतील भिषण आगीत फटाक्यांचा स्फोट, दोघांचा मृत्यू

Hingoli firecracker explosion: शहरातील मारवाडी गल्ली भागामध्ये गोपाल बासटवार यांच्या घराला सोमवारी रात्री ७.४० च्या सुमारास लागलेल्या भिषण आगीत फटाक्याचा स्फोट होवुन काही जण जखमी झाल्याची घटना

Oct 06, 2026