CCTV Wire Cut

परभणीत व्यापार्‍याने तोडली शासकीय सीसीटीव्ही कॅमेर्‍याची वायर...!

शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी बसविण्यात आलेल्या शासकीय सीसीटीव्ही कॅमेर्‍याची वायर विनापरवाना तोडण्यात आली.

परभणीत व्यापार्‍याने तोडली शासकीय सीसीटीव्ही कॅमेर्‍याची वायर...!

CCTV Wire Cut

सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी नानलपेठ पोलिसांत गुन्हा दाखल...!

परभणी : शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी बसविण्यात आलेल्या शासकीय सीसीटीव्ही कॅमेर्‍याची वायर विनापरवाना तोडण्यात आली. सदर शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याचा प्रकार ७ ऑगस्ट रोजी दुपारी छत्रपती शिवाजी चौक परिसरात घडला. याप्रकरणी व्यापार्‍याविरुध्द नानलपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परभणी शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या कॅमेर्‍यांची सायबर पोलिस पथकाकडून तपासणी सुरू असताना छत्रपती शिवाजी चौक येथील न्यू ब्रॉन बेबी किडस वेअर या दुकानासमोरील कॅमेर्‍याची वायर तोडलेली आढळून आली.

या प्रकरणी सायबर पोलिस अधीक्षक कार्यालयातील पोलिस शिपाई किशोर भिंगोले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून व्यापारी शेख जावेद शेख नबी याच्याविरुध्द नानलपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना ७ ऑगस्ट रोजी दुपारी सव्वातीनच्या सुमारास घडली. शासकीय मालमत्तेचे नुकसान करण्याच्या उद्देशाने सीसीटीव्ही कॅमेर्‍याची वायर तोडण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस हवालदार इरशाद करीत आहेत.

कडक कारवाई करणार - पोनि. गजेंद्र सरोदे

परभणी शहरामध्ये शासकीय सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे वायर तोडण्याचा प्रकार समोर आला आहे. शासकीय कॅमेरे हे जनतेच्या सेवेसाठी आहेत. तेंव्हा याची काळजी घेणे नागरिकाचे कर्तव्य आहे. परंतु काहीजण शासकीय कॅमेर्‍याचे वायर तोडत असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल झाला असून असा प्रकार इतर कोणी केल्यास यापेक्षाही कडक कारवाई केली जाईल, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांनी दिली.

संबंधित सामग्री

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

MPSC Paper Leak Case: महाराष्ट्र लोकसेवा आयोग पेपरफुटी प्रकरण, तपासाची व्याप्ती वाढवून अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेल्या डॉ. अभय वाघ यांचीही चौकशी करावी, अशी मागणी

Oct 07, 2026
‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
अवैध धंद्यांवर कळमनुरी पोलिसांचा कारवाईचा धडाका; अवैधधंदे चालकांचे धाबे दणाणले

अवैध धंद्यांवर कळमनुरी पोलिसांचा कारवाईचा धडाका; अवैधधंदे चालकांचे धाबे दणाणले

Kalamnuri Police Action: कळमनुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. पोलीस उपाधीक्षक मयूर रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कळमनुरी पोलिसांकडून जुगार अड्डे

Oct 04, 2026