कळमनुरी पोलिस कारवाई

अवैध धंद्यांवर कळमनुरी पोलिसांचा कारवाईचा धडाका; अवैधधंदे चालकांचे धाबे दणाणले

Kalamnuri Police Action: कळमनुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. पोलीस उपाधीक्षक मयूर रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कळमनुरी पोलिसांकडून जुगार अड्डे

अवैध धंद्यांवर कळमनुरी पोलिसांचा कारवाईचा धडाका; अवैधधंदे चालकांचे धाबे दणाणले

Kalamnuri Police Action

 

पोलीस उपाधीक्षक मयूर रसाळ यांची अवैध धंद्यावर करडी नजर

कळमनुरी (Kalamnuri Police Action) : कळमनुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. पोलीस उपाधीक्षक मयूर रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कळमनुरी पोलिसांकडून जुगार अड्डे, मटका, अवैध वाळू वाहतूक तसेच बेकायदेशीर देशी-विदेशी दारूविक्रीविरोधात सातत्याने कारवाई केली जात आहे. अवैध धंद्यांवर होत असलेल्या या कारवायांमुळे संबंधित व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अनेक अवैध धंद्यांना आळा बसल्याचे चित्र आहे.

विशेषतः अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांकडून लक्ष केंद्रित करण्यात आले असून, वाहनांसह मुद्देमाल जप्त करून गुन्हे दाखल केले जात आहेत. पोलीस उपाधीक्षक मयूर रसाळ यांना कळमनुरी येथील प्रभारी पदभार दिल्यानंतर त्यांनी सातत्यपूर्ण कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, आगामी काळातही अशा कारवाया सुरू राहणार असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक मयूर रसाळ यांनी दिली आहे

विना नंबर कागदपत्र नसलेले वाहनावर मोठ्या प्रमाणात करावे
कळमनुरी शहरातील मोठे प्रमाणात अनेक वाहनावर नंबर नसलेले तसेच कागदपत्र नसलेले दुचाकीवर पोलीस प्रशासन गेले एक महिन्यापासून शेकडो वाहनावर कार्य करून त्यांना दंड लावले आहे यामुळे मोठे आवाज करणारे वाहने शहरातून गायब झाल्यासारखे दिसत आहेत तसेच कागदपत्रे नसलेले गाड्या व विना नंबरचे गाड्या रस्त्यावर दिसत नाही

टैग्स: Kalamnuri Police Action