कत्तलीकरीता तेलंगणात नेणार्‍या २७ जणावरांची केली पोलीसांनी सुटका

कत्तलीकरीता तेलंगणात नेणार्‍या २७ जणावरांची केली पोलीसांनी सुटका

Cattle Smuggling

बजरंग दलाच्या कार्यकर्त्यास मारहाण

पांढरकवडा (Cattle Smuggling) : २९ रोजी पहाटे ४ वाजता दरम्यान पोलीसांनी पांढरकवडा येथील टोल टॅक्स जवळ जनावरे भरुन असलेले एक आयचर वाहन पकडुन त्यातील २७ जणावरांची सुटका केली आहे. याच कार्यवाही दरम्यान जनावरांच्या वाहनांची पायलटिंग करणार्‍या काहींनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यास जनावरांचे वाहन अडविल्या प्रकरणी मारहाण केली आहे. या कार्यवाहीमध्ये पोलीसांनी २९ लाख ४५ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. राष्ट्रीय महामार्गाने मोठ्या प्रमाणात जनावरांची तस्करी सुरु आहे. पोलीसांच्या वतीने अधुन,मधुन जणावरांच्या वाहनांवर कार्यवाही करण्यात येत आहे. मात्र जनावरांच्या वाहनांची पायलटिंग करणारे दैंनदिन जनावर भरुन असलेले अनेक वाहने पायलटिंग करुन तेलंगणात पास करीत आहे.

२९ रोजी नागपुर-वडकी-पांढरकवडा मार्गे जनावरांची तस्करी तेलंगणात सुरु असल्याची माहिती येथील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती. त्यांनी याची माहिती पोलीसांना सुध्दा दिली. त्यांनी सर्वप्रथम पांढरकवडा येथील टोल टॅक्सवर जनावर भरुन असलेले एक वाहन अडविले होते. मात्र जनावरांच्या वाहनांची पायलटिंग करीत असलेल्या अमिर उर्फ भुर्‍या मुनिर मलनस रा मोमीनाबाद कॉलनी पांढरकवडा व ईतर दोन ते तिन इसमांनी एका बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांशी हुज्जत घालुन तो ट्रक पळवुन नेला. त्या पकडलेल्या ट्रकासोबत ईतर पाच ते सहा ट्रक सुध्दा त्यांनी त्यावेळी पोलीस येईपर्यत पास केल्याचे बोलल्या जात आहे. काही वेळाने घटनास्थळी ठाणेदार एल डी तावरे व पोलीस पथक दाखल झाले.

पोलीस पथक बघताच नागपुरकडुन आलेल्या एम एच ४० सिटी १३१८ या आयचर वाहन चालकाने गाडी सोडुन अंधाराचा फायदा घेवुन तेथुन पळ काढला. पोलीसांनी आयचर वाहनाची तपासणी केली असता, त्यामध्ये २७ जणावरांना दोरखंडाने अमानुषपणे बांधुन असल्याचे आढळुन आले. पोलीसांनी ते सर्व जनावरे ताब्यात घेवुन त्यांची पांढरकवडा नगर परिषदेच्या कोंडवाड्यामध्ये रवानगी केली आहे. पोलीसांनी या कार्यवाहीमध्ये ९ लाख ४५ हजार रुपये किमतीचे जनावरे व २० लाख रुपये किमतीचा आयचर असा एकुण २९ लाख ४५ हजाराचा मुद्देमाल जप्त करुन अज्ञात आरोपी विरुध्द विविध कलामन्वये गुन्हे दाखल केले आहे.

बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांने दिली मारहाणीची तक्रार

पांढरकवडा बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी टोल टॅक्स जवळ एम एच ३१ डीएस ७७८६ या क्रमांकाचे जनावर भरुन असलेले वाहन पकडले होते. ते वाहन का पकडले म्हणुन भुर्‍या मनलस व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांमध्ये हुज्जत झाली होती. यावेळी भुर्‍यासोबत असलेल्या दोन ते तिन अज्ञातांनी जनावरांची ईतर पाच ते सहा वाहने पास केली. त्यानंतर सकाळी ८.३० वाजता दरम्यान बजरंग दलाचे कार्यकर्ते टोल टॅक्सजवळ गेले असता, त्यांच्या मागुन पांढर्‍या रंगाच्या स्विप्ट कारमध्ये आलेल्या अमिर उर्फ भुर्‍या मलनस व त्याच्या दोन ते तिन अज्ञात सहकार्यानी विवेक शंकर अक्केवार ३१ रा पांढरकवडा याची जनावरांचे वाहन अडविल्याच्या कारणावरुन कॉलर पकडुन मारहाण केली. त्याला व त्याच्या ईतर सहकार्र्यांना धमकावुन जिवे मारण्याची व अंगावर वाहन चढविण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमुद आहे.

संबंधित सामग्री

अवैध धंद्यांवर कळमनुरी पोलिसांचा कारवाईचा धडाका; अवैधधंदे चालकांचे धाबे दणाणले

अवैध धंद्यांवर कळमनुरी पोलिसांचा कारवाईचा धडाका; अवैधधंदे चालकांचे धाबे दणाणले

Kalamnuri Police Action: कळमनुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. पोलीस उपाधीक्षक मयूर रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कळमनुरी पोलिसांकडून जुगार अड्डे

Oct 04, 2026
चोरीस गेलेल्या पिकअपचा हिंगोली ग्रामीण पोलिसांनी लावला शोध;अवघ्या काही तासात आरोपी जेरबंद

चोरीस गेलेल्या पिकअपचा हिंगोली ग्रामीण पोलिसांनी लावला शोध;अवघ्या काही तासात आरोपी जेरबंद

Hingoli Rural Police Action: शहरातील अकोला बायपास परिसरातील दुकानासमोर उभा केलेला सुमारे आठ लाख रुपये किमतीचा महिंद्रा पिकअप चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस

Oct 02, 2026
परभणीत मोटार वायर चोरणारे सहा चोरटे ताब्यात

परभणीत मोटार वायर चोरणारे सहा चोरटे ताब्यात

Daithana Police Action: डफवाडी शिवारातील शेतातून मोटारचे वायर चोरी गेल्याच्या प्रकरणात दैठणा पोलिसांनी तपास करत चोरट्यांना ताब्यात घेतले. वायर वितळवून मिळविलेले दोन किलो तांबे..

Sep 29, 2026
नागपूरनंतर बेडगावची धडक कारवाई; आता कोंबडा बाजारांकडेही पोलिसांचे लक्ष कधी?

नागपूरनंतर बेडगावची धडक कारवाई; आता कोंबडा बाजारांकडेही पोलिसांचे लक्ष कधी?

Bedgaon Police Action: गडचिरोली जिल्ह्यात अवैध व्यवसाय व जुगारावर अंकुश आणण्यासाठी पोलिसांकडून कारवाईची मोहीम सुरू असताना कोरची तालुक्यातील कोंबडा बाजारांकडेही आता लक्ष देण्याची मागणी

Sep 21, 2026
चिखली येथील आयटीआयच्या गेटवर चार दिवस गाडी; अखेर पोलिसांनी नेली ठाण्यात!

चिखली येथील आयटीआयच्या गेटवर चार दिवस गाडी; अखेर पोलिसांनी नेली ठाण्यात!

चिखलीत आयटीआय व जिल्हा परिषद शाळेचा रस्ता चार दिवस बंद; मनसेच्या मागणीनंतर पोलिसांनी गाडी ताब्यात घेतली. जागेच्या मालकीवरूनही वाद निर्माण झाला आहे.

Sep 21, 2026