चिखली रक्तदान शिबिर

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर उत्साहात; ४५ रक्तदात्यांचा सहभाग

Chikhali Blood Donation: जुने गाव येथे निलकमल गणेश मंडळ व आई तुळजाभवानी मित्र मंडळच्या संयुक्त प्रयासात आयोजित रक्तदान शिबिरात ४५ रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने दान केले. रक्तदान समाज सर्वश्रेष्ठ दान

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर उत्साहात; ४५ रक्तदात्यांचा सहभाग

Chikhali Blood Donation Camp

 

नीलकमल गणेश मंडळ व आई तुळजाभवानी मित्र मंडळाचा सातत्यपूर्ण सामाजिक उपक्रम

चिखली (Chikhali Blood Donation Camp) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त जुने गाव येथील श्री अंधेरा महादेव मंदिर परिसरात निलकमल गणेश मंडळ, आई तुळजाभवानी मित्र मंडळ व समस्त जुने गाव मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न झाले. शिबिरात ४५ रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून समाजाप्रती आपली बांधिलकी जपली.

रक्तदान (Chikhali Blood Donation Camp) हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. एका रक्तदात्यामुळे अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळू शकते. अपघातग्रस्त, शस्त्रक्रियेसाठी दाखल रुग्ण, थॅलेसेमिया बाधित बालके तसेच विविध आजारांवर उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी रक्ताची सातत्याने आवश्यकता असते. विशेषतः उन्हाळ्यात अनेक रक्तपेढ्यांमधील रक्तसाठा कमी होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत रक्तदान शिबिरांमधून जमा होणारा रक्तसाठा अनेक गरजू रुग्णांसाठी मोठा आधार ठरतो.

विशेष म्हणजे, निलकमल गणेश मंडळ आणि आई तुळजाभवानी मित्र मंडळ गेल्या सात वर्षांपासून नियमितपणे रक्तदान शिबिरांचे आयोजन करीत असून सामाजिक सेवेत आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. युवकांमध्ये रक्तदानाबाबत जागृती निर्माण करण्यासह समाजहिताचे विविध उपक्रमही ही मंडळे राबवत असतात.

या (Chikhali Blood Donation Camp) शिबिरात कार्तिक अशोक वाघ, गोपाल मदन महाजन, रविंद्र मदन महाजन, ऋषिकेश नंदकिशोर देशमुख, वैभव विष्णू चव्हाण, गोपाल सुभाष चव्हाण, जीवन विलास चिडे, रामेश्वर साहेबराव देशमुख, संतोष निबराव देशमुख, शेखर दिलीप कराळे, रोहन विनोद देशमुख, लोकेश रंगराव देशमुख, सुमित गजानन देशमुख, गोपाल रामकिसन मिसाळ, विलास परसराम चव्हाण, अजय गजानन देशमुख, दुर्गादास भगवान मोरे, ईशात शशांक उदावंत, अभिषेक जगदीश मंडलिक, मंगेश सुनील देशमुख, निखिल राजेश सोनुने, गणेश उद्धवराव देशमुख, ओमप्रकाश रामेश्वर लेंढे, चेतन सुभाष चव्हाण, विजय विष्णू सपकाळ, रितेशकुमार हंसराज भोजवाणी, विकास दिलीप साळवे, मयूर सुनील पवार, दत्तात्रय बळीराम मोळवणे, शुभम अरुण शिगंणे, राजेश रंगराव देशमुख, चेतन बाबुराव निर्मळे, जगदीश नंदकिशोर जगताप, मनीष शिवाजी कुटे, रविंद्र किशोर कराळे, राहुल कुडलिक देशमुख, अमोल नंदकिशोर कळसकर, सागर नामदेवराव देशमुख आदींनी रक्तदान केले. रक्तदात्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे शिबिर यशस्वी ठरले असून या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.

संबंधित सामग्री

FDAच्या कारवाईने ‘सूरज लामा मोमोज’ चर्चेत; कधीकाळी सेलिब्रिटींचे ड्रायव्हर होते मालक

FDAच्या कारवाईने ‘सूरज लामा मोमोज’ चर्चेत; कधीकाळी सेलिब्रिटींचे ड्रायव्हर होते मालक

तुकाराम मुंढेंच्या FDAकडून कारवाई; ‘सूरज लामा मोमोज’सह ८ दुकानांचे परवाने निलंबित. कधीकाळी सेलिब्रिटी ड्रायव्हर असलेल्या सूरज लामांचा संघर्ष पुन्हा चर्चेत.

Oct 07, 2026
९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले. त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य प्रवेशाच्या जुन्या चर्चांना या दौऱ्यामुळे पुन्हा जोर आला आहे.

Oct 07, 2026
MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

पुण्यातील MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेऊन अभ्यासावर लक्ष द्यावे, असे न्यायालयाने सांगितले.

Oct 07, 2026
सिंधुदुर्गातील शाळांच्या वेळा बदलण्याची मागणी; वाढत्या उन्हामुळे वैभव नाईकांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

सिंधुदुर्गातील शाळांच्या वेळा बदलण्याची मागणी; वाढत्या उन्हामुळे वैभव नाईकांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

सिंधुदुर्गात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याची मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.

Oct 07, 2026