लिव्ह इन रिलेशनशिप

लिव्ह इन रिलेशनशिपमधील महिलेकडून भाजपच्या माजी पदाधिकार्‍यास खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी

Live in relationship: हिंगोलीतील भाजपच्या माजी पदाधिकाऱ्यावर लिव्ह इन रिलेशनमधील महिलेने खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. महिलेवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.

लिव्ह इन रिलेशनशिपमधील महिलेकडून भाजपच्या माजी पदाधिकार्‍यास खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी

Live in relationship

हिंगोली ग्रामीण पोलिसात महिलेवर अदखलपात्र गुन्हा दाखल

हिंगोली (Live in relationship) : शहराजवळील बळसोंड  रामाकृष्णा सिटीमधील एका ४५ वर्षीय भाजपच्या माजी पदाधिकार्‍याला  लिव्ह इन रिलेशनशिपमधील  एका महिलेने २० लाख रुपये व  पाच तोळे सोने  घेवून अतिरिक्त पैशाच्या  मागणीसाठी अत्याचाराचा  खोटा  गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याने नांदेड जिल्ह्यातील एका  महिलेवर  हिंगोली ग्रामीण पोलिसात अदखल पात्र गुन्हा  दाखल करण्यात आला आहे.

या बाबत पोलिस सुत्रांनी  दिलेली माहिती अशी की, हिंगोली शहराजवळील बळसोंड रामाकृष्णा सिटीमधील आशिष  वाजपेयी  यांनी मागील काही  वर्षापुर्वी युवा  विकास सोसायटी  अंतर्गत शासनामार्फत  राबविल्या  जाणार्‍या प्रमोद महाजन कौशल्य विकास योजनेंतर्गत बेरोजगार लोकांना  रोजगारक्षम  बनविण्यासाठी नांदेड  जिल्ह्यातील एका ३५ वर्षीय महिलेला समन्वय करून नेमले होते.  हे  काम करीत  असताना आशिष वाजपेयी  यांची महिलेसोबत लिव्ह इन रिलेशनशिप झाली असताना या जवळीकतेचा फायदा घेवून सदर महिलेने वाजपेयी यांच्याकडे पैशााची मागणी केली  असल्याने  तिला यापुर्वी २० लाख रुपये पाच तोळे  सोने तसेच १० लाखाचे तीन धनादेश दिले होते.

परंतु सदर महिलेकडून वारंवार पैशाची मागणी  केली जात होते. याच पैशासाठी  १५ एप्रिल रोजी रात्री ९ च्या  सुमारास सदर महिलेने बळसोंड रामाकृष्णा सिटी भागात वाजपेयी यांच्या घरासमोर आली होती. वारंवार महिलेकडून पैशाची मागणी  होत  असल्याने आशिष वाजपेयी यांनी पैसे  देण्याकरीता  नकार दर्शविल्याने सदर महिले समाजात  बदनामी करून अत्याचाराचा  खोटा गुन्हा  दाखल केला जाईल तसेच पैसे न दिल्यास  जिवे मारण्याची धमकी दिल्याने १७ एप्रिलला हिंगोली ग्रामीण  पोलिसात आशिष वाजपेयी यांनी  दिलेल्या फिर्यादीवरून नांदेड जिल्ह्यातील एका महिलेवर अदखल पात्र  गुन्हा  दाखल करण्यात  आला. या प्रकरणाचा  पुढील तपास हिंगोली  ग्रामीण ठाण्याचे पोलिस निरीक्षक  शामकुमार   डोंगरे, बाळासाहेब खोडवे हे करीत आहेत.

संबंधित सामग्री

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

MPSC Paper Leak Case: महाराष्ट्र लोकसेवा आयोग पेपरफुटी प्रकरण, तपासाची व्याप्ती वाढवून अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेल्या डॉ. अभय वाघ यांचीही चौकशी करावी, अशी मागणी

Oct 07, 2026
महाराष्ट्रात कुष्ठरोगाचे धक्कादायक वास्तव! नऊ वर्षांत 1.57 लाख नवीन रुग्ण; शोधमोहिमेत 44 हजारांहून अधिक रुग्ण

महाराष्ट्रात कुष्ठरोगाचे धक्कादायक वास्तव! नऊ वर्षांत 1.57 लाख नवीन रुग्ण; शोधमोहिमेत 44 हजारांहून अधिक रुग्ण

Maharashtra Leprosy Detection Campaign: महाराष्ट्राला कुष्ठरोगमुक्त करण्यासाठी शासनाकडून विविध पातळ्यांवर उपाययोजना सुरू असतानाच राज्यातील कुष्ठरोगाची स्थिती चिंताजनक असल्याचे आकडेवारीतून समोर आले..

Oct 07, 2026
पश्चिम बंगालचं नाव बदलणार? ‘पश्चिम बंग’ करण्याच्या हालचालींना वेग; भाजप प्रदेशाध्यक्षांचा मोठा दावा

पश्चिम बंगालचं नाव बदलणार? ‘पश्चिम बंग’ करण्याच्या हालचालींना वेग; भाजप प्रदेशाध्यक्षांचा मोठा दावा

पश्चिम बंगालचं नाव ‘पश्चिम बंग’ करण्याच्या हालचालींना वेग? भाजप प्रदेशाध्यक्ष समीक भट्टाचार्य यांनी विधानसभेत विधेयक मांडण्याचे संकेत दिले.

Oct 07, 2026
हिंगोली फटाका गोदाम दुर्घटना: मृतांच्या वारसांना शिवसेनेकडून 5 लाखांची मदत जाहीर

हिंगोली फटाका गोदाम दुर्घटना: मृतांच्या वारसांना शिवसेनेकडून 5 लाखांची मदत जाहीर

Hingoli firecracker godown accident: शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर केली आहे. मुंबई येथे एका कार्यक्रमात सांगितले..

Oct 07, 2026
‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026