बँक लॉकरचा वापर करणार्‍या ग्राहकांची  सुरक्षितता जपा

बँक लॉकरचा वापर करणार्‍या ग्राहकांची  सुरक्षितता जपा

Bank Locker Safety

खा. डॉ. नामदेव किरसान यांची संसदेत मागणी

गडचिरोली (Bank Locker Safety) : बँक लॉकरचा  वापर करणार्‍या ग्राहकांच्या सुरक्षेस प्रथम प्राधान्य देऊन योग्य प्रमाणात नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी खा.डॉ. नामदेव किरसान यांनी संसदेत केली. खा. डॉ. नामदेव किरसान यांनी लोकसभेतील अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान बँक लॉकरच्या सुरक्षेचा आणि ग्राहकांना मिळणार्‍या तुटपुंज्या नुकसानभरपाईचा मुद्दा उपस्थित केला.

खा. डॉ. किरसान यांनी निदर्शनास आणून दिले की, नागरिक आपले मौल्यवान दागिने व वस्तू सुरक्षित राहतील या विश्वासाने बँकेच्या लॉकरमध्ये ठेवतात. मात्र, बँकेच्या हलगर्जीपणामुळे या वस्तूंचे नुकसान झाले किंवा चोरी झाली, तरी बँकांची जबाबदारी केवळ लॉकरच्या वार्षिक भाड्याच्या १०० पट एवढीच मर्यादित राहते. ही रक्कम ग्राहकांच्या प्रत्यक्ष नुकसानीच्या तुलनेत अत्यंत नगण्य असल्याचे त्यांनी सांगितले.

ग्राहकांना त्यांच्या वस्तूंसाठी स्वतंत्रपणे विमा काढण्यावर अवलंबून न ठेवता, सरकारने सर्व बँक लॉकरसाठी ‘अनिवार्य आणि व्यापक विमा धोरण’ लागू करावे, अशी  मागणी  खा.डॉ. किरसान यांनी केली. दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकेला लॉकरमधील वस्तूंबाबत माहिती नसते, असे कारण मांडले. त्यावर डॉ. किरसान यांनी पर्याय सुचवत सांगितले की, ग्राहकांनी स्वेच्छेने लॉकरमधील मौल्यवान वस्तूंची माहिती बँक अधिकार्‍यांना दिल्यास, त्या आधारावर विमा संरक्षण देणे शक्य होऊ शकते असेही खा.डॉ. किरसान यांनी निदर्शनास आणुन दिले.

संबंधित सामग्री

भगव्या-निळ्याचे शिलेदार असे अकाली जाणे...

भगव्या-निळ्याचे शिलेदार असे अकाली जाणे...

चिखली तालुक्यात गत आणि चालू आठवड्यात घडलेल्या तीन दुःखद घटनांनी राजकीय, सामाजिक तसेच चळवळीतील कार्यकर्त्यांना अंतर्मुख केले आहे.

Aug 29, 2026
१३ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया खाते आता पालकांच्या संमतीशिवाय नाही; ‘शील्ड’ विधेयकात कडक तरतुदी

१३ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया खाते आता पालकांच्या संमतीशिवाय नाही; ‘शील्ड’ विधेयकात कडक तरतुदी

लहान मुलांच्या वाढत्या डिजिटल वापरामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा आणि गोपनीयतेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

Aug 08, 2026
पीकविम्याकरिता दहा दिवसांची मुदतवाढ

पीकविम्याकरिता दहा दिवसांची मुदतवाढ

Crop Insurance Scheme: शासनाने पिकविमा काढण्यासाठी १० ऑगस्ट सोमवार पर्यंत मुदतवाढ दिली आहे. या मुदतवाढमुळे शेतकर्‍यांना फायदा होणार आहे.

Aug 02, 2026
स्मार्ट मिटर विरोधात राकाँ (श.प.) पक्षाचे तुडवा आंदोलन

स्मार्ट मिटर विरोधात राकाँ (श.प.) पक्षाचे तुडवा आंदोलन

Smart meter Andolan: महावितरण कंपनीने खाजगीकरणाच्या वाटचालीत स्मार्ट मिटर बसवण्याची योजना राबविली आहे. विज दरवाढ, स्मार्ट मिटरच्या  रुपाने महावितरण ग्राहकांच्या खिशातून पैसे वसुल

Jul 16, 2026
सायबर फसवणुकीत गोठलेले बँक खाते अनफ्रीज करणे झाले सोपे!

सायबर फसवणुकीत गोठलेले बँक खाते अनफ्रीज करणे झाले सोपे!

सायबर फसवणुकीच्या तपासादरम्यान अनेक निष्पाप नागरिकांची बँक खाती गोठविली (फ्रीज) जातात.

Jul 16, 2026